19 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

19 May 2019 Current Affairs In Marathi

19 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 मे 2019)

इस्रो करणार शुक्र ग्रहाची वारी :

 • मंगळ या ग्रहावर अंतराळ यान पाठवण्याची मोहीम यशस्वी केल्यानंतर आता इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तसेच शुक्राशी संबंधित माहिती या यानाद्वारे घेतली जाईल. शुक्र हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह आहे.
 • पुढील 10 वर्षात सात अंतराळ मोहीमा काढण्याचा इस्रोचा मानस आहे. त्यातली एक मोहीम शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.
 • 2023 मध्ये ही मोहीम काढली जाण्याची शक्यता आहे.
 • तर इस्रोच्या मंगळयान मोहीमेला मिळालेल्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • शुक्र ग्रहावर कसं वातावरण आहे? शुक्र आणि पृथ्वी यांच्यात साम्यस्थळं आहेत ती नेमकी काय आहेत? विविध थर, वातावरण, सूर्याशी असणारा संबंध या सगळ्याबाबत या मोहीमेत अभ्यास केला जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 मे 2019)

अमेरिकेच्या स्थलांतरविषयक धोरणांतील बदल भारतीयांच्या फायद्याचे :

 • गुणवत्तेवर आधारित असलेल्या अमेरिकेच्या स्थलांतरविषयक धोरणांमधील बदल हे भारतीयांसाठी फायद्याचे ठरणार असून त्यामुळे भारतीय तरुणांना आणि उच्च कौशल्य असणाऱ्यांना ‘बिल्ट अमेरिका’ व्हिसा मिळण्याच्या टक्केवारीत वाढ होणार आहे.
 • तसेच नव्या धोरणांमुळे 12 ते 57 टक्क्यांपर्यंत भारतीय तरुण आणि उच्च कौशल्य धारकांना नवीन व्हिसा मिळण्याची शक्यता असल्याने त्याचा फायदा हजारो भारतीय व्यावसायिकांना होणार आहे.
 • तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरविषयक धोरणांमध्ये मोठे बदल केले असून अमेरिकेतील वास्तव्य परवाना हा गुणवत्तेवर अवलंबून असेल. ही गुणवत्ता वय, माहिती, नोकरीच्या संधी आणि नागरी कर्तव्य या मुद्दय़ांवर आधारित
  असेल. तसेच पूर्वी इंग्रजी भाषेची माहिती आणि नागरी कर्तव्य या दोन मुद्दय़ांवरच कायम वास्तव्याचा परवाना दिला जायचाय.
 • देशाच्या सीमा अधिक सुरक्षित करण्याच्या हेतूने तसेच ग्रीन कार्ड किंवा कायमस्वरूपी निवास यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ट्रम्प यांचे जावई रेजेड कुशनर यांनी हे नवीन धोरण प्रामुख्याने बनवले आहे.

समलिंगी विवाहाला मान्यता देणारा हा आहे पहिला आशियाई देश :

 • समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा तैवान हा आशिया खंडातला पहिला देश ठरला आहे. तैवानच्या संसदेने समलिंगी विवाहांना कायदेशी मान्यता दिली आहे.
 • तसेच समलिंगी जोडप्यांनी त्यांची एक संघटना स्थापन करावी असी संमती देशाच्या विधीमंडळाने दिली आहे.
 • तर ज्या समलिंगी जोडप्यांना विवाह करायचा असेल त्यांना शासकीय विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज करता येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
 • दरम्यान हा निर्णय तैवान या देशाच्या घटनेचं उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे 24 मे पर्यंत या संदर्भातली घटना दुरूस्ती करण्याची मुदत तैवानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
 • तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर समलिंगी जोडपी रहातात. समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी अशी या सगळ्यांचीच इच्छा होती. यासाठी जे मतदान झालं त्यामध्ये 67 टक्के लोकांनी समलिंगी विवाहांना मान्यता देण्याच्या बाजूने मतदान केलं. देशाने समानतेच्या दृष्टीने एक मोठं पाऊल उचललं आहे अशी प्रतिक्रिया समलिंगी जोडप्यांनी या निर्णयानंतर दिली आहे.

दिनविशेष :

 • 19 मे 1743 मध्ये जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
 • हॅले धुमकेतुचे शेपूट 19 मे 1910 मध्ये पृथ्वीला चाटुन गेले.
 • पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा 19 मे 1911 मध्ये सुरु झाली.
 • 19 मे 1910 मध्ये नथुराम गोडसे यांचा जन्म.
 • संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी 19 मे 1297 मध्ये एदलाबाद येथे समाधी घेतली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मे 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.