19 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs
19 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 मार्च 2022)
जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर :
- संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते.
- वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते.
- जगभरातल्या एकूण 150 देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं.
- यंदाच्या वर्षी अर्थात 2022 ची यादी तयार करताना एकूण 146 देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे.
- या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे 80 आणि 98व्या स्थानावर आहेत.
- या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे.
- फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्विडन, नॉर्वे, इस्त्रायल आणि न्यूझीलंड या 9 देशांचा क्रम लागतो.
- जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान मात्र बरचसं मागे आहे.
- 146 देशांच्या यादीमध्ये भारत थेट 136व्या क्रमांकावर म्हणजे शेवटून 11व्या क्रमांकावर आहे.
Must Read (नक्की वाचा):
कर्नाटकमधील शाळांत भगवद्गीतेचे धडे देण्याचा विचार :
- मुलांमधील सांस्कृतिक मूल्ये लोप पावत असल्याने ते थांबविण्यासाठी कर्नाटकमधील शाळांत भगवद्गीतेचे पाठ शिकविण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे.
- शालेय अभ्यासक्रमात नीतिशास्त्र शिकविले जावे, अशी अनेक नागरिकांची मागणी आहे, असे राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.
- विशेष म्हणजे गुजरात सरकारही शाळांमध्ये भगवद्गीता शिकविण्याचे नियोजन करीत आहे.
- त्यानंतर आता कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी तसे सूतावाच केले.
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धात ऑस्ट्रेलियापुढे भारतीयांचा कस :
- भारतीय संघाला महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेला पुन्हा रुळावर आणायचे असल्यास शनिवारी बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या लढतीत सर्वच विभागांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
- न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेपूर्वी झालेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती.
- त्यानंतर आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खात्यावर दोन विजय आणि दोन पराभव आहेत.
- भारताला अजून तीन लीग सामने खेळायचे आहेत आणि आघाडीच्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास संघाला कामगिरी उंचवावी लागणार आहे.
- ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चारही सामने जिंकले आहेत.
एमबीए, एमसीए सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणीस झाली सुरूवात :
- पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या “एमबीए’ आणि “एमसीए’ सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया शुक्रवार पासून सुरू झाली आहे.
- या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत 7 एप्रिलपर्यंत आहे.
- राज्य सीईटी सेलमार्फत मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) आणि मास्टर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिेकशन (एमसीए) या दोन्ही अभ्यासक्रमची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते.
- या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिल्यांदा सीईटी देणे अनिवार्य आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
दिनविशेष:
- 19 मार्च सन 1674 रोजी शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन झाले.
- लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र सन 1848 मध्ये मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
- मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्म 19 मार्च 1900 मध्ये झाला होता.
- सन 1931 मध्ये अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
- 1932 यावर्षी सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.