19 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

न्या. भूषण धर्माधिकारी
न्या. भूषण धर्माधिकारी

19 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 मार्च 2020)

मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. भूषण धर्माधिकारी :

  • मुंबईउच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी न्या. भूषण धर्माधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानुसार, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने आज नियुक्तीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध जाहीर केली.
  • तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग हे 23 फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले.
  • त्यानंतर न्या. भूषण धर्माधिकारी यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची अधिसूचना मंत्रालयाने 24 फेब्रुवारीला जारी केली होती. आज केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मार्च 2020)

‘YES’ यू कॅन… बँकेवरील निर्बंध उठले :

  • निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या येस बँकेत खातेदारांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसह 72 नागरी बँकांच्या एक हजार कोटींहून अधिक ठेवी आणि अल्पमुदतीच्या कर्जाची रक्कम अडकली आहे.
  • तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बँकेवरील निर्बंध उठविल्यामुळे बँकांवरील ‘पत’अडचण आता दूर होईल.
  • तब्बल 13 दिवसांनंतर येस बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यामुळे, आता सर्वच खातेदारांना आपल्या खात्यातून 50 हजारांपेक्षा जास्तीची रक्कम काढता येणार आहे. तसेच, इतर बँकींग सेवेचाही लाभ ग्राहकांना मिळेल.
  • तसेच येस बँकेच्या संचालक मंडळास 5 मार्च रोजी बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर आज रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरील निर्बंध उठवले आहेत. सरकारने येस बँकेसाठी नवीन धोरण आखले असून प्रशांत कुमार यांना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रंजन गोगोई यांच्या नियुक्तीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान :

  • माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर अवघ्या चार महिन्यांत राष्ट्रपतींनी राज्यसभेवर केलेल्या नियुक्तीवर न्यायालयीन व राजकीय वर्तुळांत टीका होत असतानाच या नियुक्तीस आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली.
  • तर गोगोई यांची राज्यसभेवर प्रतिनियुक्ती झाली असली तरी अद्याप त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतलेली नाही.
  • सामाजिक कार्यकर्त्या आणि विचारवंत मधु पूर्णिमा किश्वर यांनी ही याचिका दाखल केली.

दिनविशेष:

  • 19 मार्च सन 1674 रोजी शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन झाले.
  • लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र सन 1848 मध्ये मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
  • मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्म 19 मार्च 1900 मध्ये झाला होता.
  • सन 1931 मध्ये अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
  • 1932 यावर्षी सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.