19 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs
19 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 जून 2022)
शेताच्या बांधावरून होणारे तंटे संपणार :
- जमिनींच्या बांधांवरून होणारे वाद कायमचे मिटणार आहेत.
- कारण आता मोजणीची प्रकरणे ही वेगाने आणि अचूक होण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून रायगड जिल्ह्यासाठी 6 जमीन मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) खरेदी करण्यात येणार आहेत.
- उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे (सिग्नल) रोव्हर मशीनच्या माध्यमातून मिळणारे अक्षांश आणि रेखांश हे कायमस्वरूपी जतन होणार आहेत.
- या पद्धतीने होणाऱ्या मोजणीमुळे बांध खोदून जमीन बळकावण्याचे प्रकार कायमचे थांबणार असून, नैसर्गिक आपत्तीमुळे मोजणीच्या खुणा गेल्या, तरी अक्षांश आणि रेखांशांच्या साह्याने पूर्वीच्या खुणा मिळू शकणार आहेत.
- यापूर्वी प्लेन टेबलने जमीन मोजणी करण्यात येत होती. त्यामुळे जमीन मोजणीसाठी विलंब लागायचा.
- सध्या इलेक्ट्रॉनिक टोटल मशीन (ईटीएस) यंत्रांच्या साह्याने मोजणी केली जाते.
- रोव्हर मशीनमुळे जमीन मोजणी ही उपग्रहाच्या साह्याने केली जाणार असल्याने ही मोजणी अचूक असणार आहे.
- मोजणी करण्यासाठी 77 मोजणी स्थानके म्हणजे कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन (कॉर्स) उभारण्यात येणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा वाढदिवसाच्या दिवशी अनोखा सन्मान :
- गांधीनगरमधील एका रस्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांचा 18 जूनरोजी वाढदिवस आहे.
- त्या वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त मोदींनी आईची भेट घेतल्याचा फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत.
- पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा वाढदिवसाच्या दिवशी अनोखा सन्मान केला जात आहे.
- त्यांच्या नावाने आता एक रस्ता ओळखला जाणार आहे. रायसन पेट्रोल पंपापासून ८० मीटर रस्त्याला ‘पूज्य हिराबा मार्ग’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असांज यांच्या अमेरिकेतील प्रत्यार्पणास ब्रिटनची मंजुरी :
- इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धांशी संबंधित गोपनीय दस्तावेज उघड केल्याच्या आरोपावरून ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांचे अमेरिकेस प्रत्यार्पण करण्यास ब्रिटन सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली.
- ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मूळचे ऑस्ट्रेलियाचे 50 वर्षीय नागरिक असांज यांच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी केली.
- अमेरिकेत जाणे टाळण्यासाठी असांज अनेक वर्षांपासून देत असलेल्या कायदेशीर लढाईस मिळालेले हे महत्त्वपूर्ण वळण आहे.
- मात्र, असांज यांना या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यासाठी 14 दिवसांचा अवधी आहे.
- असांज यांचे वकील कायदेशीर लढाईची दुसरी फेरी पुन्हा सुरू करण्याचीच शक्यता आहे.
ऑलिम्पिक विजेत्या नीरजला सुवर्णपदक :
- भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकानंतर शनिवारी पहिले जेतेपद पटकावले.
- फिनलंड येथे सुरू असलेल्या क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक कमावले.
- या निमित्ताने विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सला चार दिवसांत त्याने दोनदा मागे टाकले.
- त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या माजी ऑलिम्पिक विजेत्या केशॉर्न वॉलकॉट आणि ग्रनाडाच्या पीटर्स यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
- नुकत्याच झालेल्या पाव्हो नूर्मी क्रीडा स्पर्धेत 24 वर्षीय नीरजने 89.30 मीटर अंतरावर भाला फेकून स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडित काढला होता.
- याआधी नीरजच्या नावावर 88.07 मीटरचा राष्ट्रीय विक्रम होता.
दिनविशेष :
- सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदार नेताजी पालकर यास शुध्द करुन हिंदु धर्मात घेतले.
- 19 जून 1901 हा भारतातील सुप्रसिध्द गणिततज्ञ व सांख्यिकीविज्ञ ‘रामचंद्र बोस’ यांचा जन्मदिन आहे.
- हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 मध्ये महाराष्ट्रातील मर्द मराठ्यांची शिवसेना स्थापन केली.