19 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs
19 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 जुलै 2022)
उपराष्ट्रपती पदासाठी धनखड यांचा उमेदवारी अर्ज :
- राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड यांनी सोमवारी संसदेत लोकसभेच्या सचिवालय कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
- उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह हे निवडणूक अधिकारी असून त्यांच्याकडे अर्ज सुपूर्त केला.
- यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.
- उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा 19 जुलै अखेरचा दिवस असून विरोधकांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत.
- 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 11 ऑगस्ट रोजी नवे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील.
- विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे.
Must Read (नक्की वाचा):
दिपाली मासिरकर राष्ट्रपती निवडणुकीची निरीक्षक :
- मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील रहिवासी दिपाली रविचंद्र मासीरकर यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीकरिता संचालक म्हणून दिल्ली येथे नेमणूक केली आहे.
- त्या निवडणुकीचे निरीक्षण करणार आहे, दिपाली 2008 च्या नागालँड तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत.
- सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून दिपाली मासिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- दिपाली यांनी मुंबई येथे सहायक महानिरीक्षक या पदावर कार्य केले. नागपूर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी सांभाळली आहे.
- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्तीपूर्वी नागालँडमधील कोहीमा येथे पोलीस उप-महानिरीक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या.
- भारत निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आता त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
निरदर बात्रा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावरून पायउतार :
- अनुभवी क्रीडा प्रशासक निरदर बात्रा यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना (एफआयएच) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) सदस्यत्वही सोडले.
- बात्रा यांना ‘हॉकी इंडिया’चे आजीवन सदस्यत्व देण्यात आले होते.
- याच्या आधारेच त्यांनी 2017मध्ये ‘आयओए’च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि जिंकली होती.
- परंतु राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार, बात्रा यांना ‘हॉकी इंडिया’चे आजीवन सदस्यत्व मिळणे बेकायदेशीर असल्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने 25 मे रोजी दिला होता.
- त्यानंतर त्वरित त्यांना ‘आयओए’च्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते.
विश्वचषक नेमबाजी स्पर्धात मैराज खानला ऐतिहासिक सुवर्ण :
- महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये भारताला सांघिक कांस्य चँगवॉन अनुभवी मैराज अहमद खानने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट प्रकारात सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला या प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
- 40 फैऱ्यांच्या अंतिम फेरीत 46 वर्षीय उत्तर प्रदेशच्या मैराजने 37 गुणांसह अग्रस्थान पटकावले.
- कोरियाच्या मिन्सू किम आणि ब्रिटनच्या बेन लेवेलिन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली.
- दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सहभाग नोंदवलेला मैराज सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारताचा सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे.
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धात फ्रेजर-प्राइस सर्वात वेगवान महिला धावपटू :
- जमैकाच्या शेली-अॅन फ्रेजर-प्राइसने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली.
- जागतिक स्पर्धेतील हे तिचे पाचवे सुवर्णपदक ठरले.
- जमैकाच्या धावपटूंनी या शर्यतीवर वर्चस्व गाजवताना रौप्य आणि कांस्यपदकेही आपल्या नावे केली.
- 35 वर्षीय फ्रेजर-प्राइसने 10.67 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
- यासह तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम वेळेचा विक्रम आपल्या नावे केला.
- तिने 1999 मध्ये मेरियन जोन्सने स्थापित केलेला विक्रम मोडीत काढला.
बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त :
- इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले.
- 19 जुलै दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे.
- आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पत्र लिहून त्याने याबाबत घोषणा केली.
दिनविशेष :
- सन 1832 मध्ये सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.
- क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म 19 जुलै 1827 मध्ये झाला.
- लॉर्ड कर्झन यांनी 19 जुलै 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती.
- सन 1969 मध्ये भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
- नेपाळमध्ये सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना 19 जुलै 1976 मध्ये करण्यात आली.