19 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

19 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2022)

उत्तर कोरियाकडून आणखी दोन क्षेपणास्त्रांची चाचणी :

 • उत्तर कोरियाने रविवारी आणखी दोन लांब पल्ल्याची अण्वस्त्र वाहक क्षमतेची क्षेपणास्त्रे चाचणीच्या बहाण्याने डागली.
 • जपानने चीन आणि उत्तर कोरियाविरुद्ध नवी अधिक आक्रमक सुरक्षा रणनीती अवलंबल्याच्या निषेधार्थ ही कृती उत्तर कोरियाने केल्याचे मानले जाते.
 • उत्तर कोरियाने दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंतचा पल्ला गाठणारी अधिक अद्ययावत, प्रभावी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे विकसित केल्याचे सांगताना त्यासाठी लागणारी महत्त्वाची चाचणी पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले होते.
 • त्यानंतर रविवारी उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्र डागली.
 • उत्तर कोरियाच्या वायव्य टोंगचांगरी भागातून ही दोन्ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
 • ही क्षेपणास्त्रे सुमारे 500 किलोमीटर (310 मैल) पार करून उत्तर कोरिया व जपान दरम्यानच्या सागरी हद्दीत कोसळल्याची माहिती जपान, दक्षिण कोरियाच्या सरकारकडून देण्यात आली.

लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी :

 • लिओ वराडकर यांनी आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला.
 • आयर्लंडमधील तीन पक्षांच्या सत्ताधारी आघाडीतील दोन प्रमुख राजकीय पक्षांत ही सत्तासूत्रे हस्तांतरित झाली.
 • वराडकर हे मिश्र वंशाचे आहेत.
 • आयर्लंडमधील सर्वात तरुण नेत्यांपैकी एक असलेल्या वराडकर यांना पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा संधी मिळत आहे.
 • त्यांनी शनिवारी उपपंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
 • वराडकर यांचा पक्ष ‘फाइन गेल’ व मायकल मार्टिन यांच्या ‘फियाना फेल’ या पक्षांत परस्परसामंजस्याने सत्तेचे होत असलेले आवर्तन आयर्लंडच्या इतिहासात अभूतपूर्व मानले जात आहे.

अर्जेंटिनाने कोरले विश्वचषकावर नाव :

 • कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक 2022चा अंतिम सामना आज संपन्न झाला.
 • या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला झाला.
 • 2014ला विश्वचषक विजयाचं भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला.
 • 120 मिनिटांच्या सामन्यात 3-3 अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली.
 • अर्जेंटिनाने बाजी मारत 1978 आणि 1986 नंतर तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकवर नाव कोरले.
 • फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती.

दृष्टीहीन संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले :

 • भारतीय संघाने शनिवारी अंधांच्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे.
 • त्याने सलग दोनवेळा स्पर्धेची अंतिम फेरी जिंकली आहे.
 • टीम इंडियाने हा सामना 120 धावांनी जिंकला.
 • प्रथम फलंदाजी करताना त्यांनी दोन गडी बाद 277 धावा केल्या.
 • प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 20 षटकांत 3 गडी गमावून 157 धावाच करू शकला.
 • भारतीय संघाने यापूर्वी 2012 आणि 2017 मध्येही ही स्पर्धा जिंकली होती.

विश्वचषकात ‘ही’ कामगिरी करणारा मेस्सी ठरला एकमेव खेळाडू :

 • फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना संघांत खेळला जात आहे.
 • अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आपला शेवटचा विश्वचषक खेळत आहे.
 • त्याने पहिल्या 20 मिनिटाच्या आत अर्जेंटिना संघासाठी पहिला गोल केला आहे.
 • त्याचबरोबर त्याने एक विक्रम केला आहे.
 • एकाच विश्वचषकात प्रत्येक फेरीत गोल करणारा मेस्सी एकमेव खेळाडू ठरला आहे.

दिनविशेष:

 • 19 डिसेंबर हा दिवस ‘गोआ मुक्ती दिन‘ आहे.
 • भारताच्या 12व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती ‘प्रतिभा पाटील‘ यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 मध्ये झाला.
 • सन 1961 मध्ये पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
 • व्ही.एन. खरे यांनी सन 2002 मध्ये भारताचे 33वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.