19 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs
19 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2022)
आता परप्रांतीय करू शकणार मतदान :
- जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
- राज्यात राहणारे परप्रांतीय लोकांना आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करून मतदान करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे.
- एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा दलाचे जवानही त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करू शकतात अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी हृदेश कुमार यांनी दिली.
- जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 25 लाख नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे.
- कर्मचारी, विद्यार्थी, मजूर आणि काश्मीरमध्ये राहणारे कोणीही गैर-स्थानिक आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतात.
- मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी स्थानिक रहिवासी प्रमाणपत्राची गरज नाही.
Must Read (नक्की वाचा):
केंद्र सरकारकडून आठ युट्यूब चॅनल बॅन :
- भारतविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत केंद्र सरकारने आज आठ युट्यूब चॅनेल बंद केले आहे.
- यामध्ये सात भारतीय तर एका पाकिस्तानी युट्यूब चॅनलचा समावेश आहे.
- तसेच एक फेसबुक खाते आणि दोन फेसबुक पोस्टही केंद्र सरकारकडून बंद करण्यात आले आहे.
- बंद केलेल्या खात्यांना एकूण 114 कोटी व्हूज असून त्यांचे 85 लाख सबस्क्रायबर्स आहेत.
- केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व युट्यूब चॅनल भारतात धार्मिक द्वेष परवण्याचे काम करत होते.
- तसेच खोटी आणि भारतविरोधी माहितीही या चॅनलद्वारे पसरवल्या जात होती.
दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश :
- आज सर्वत्र दहीहंडीचा थरार रंगणार आहे.
- या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.
- विधानसभेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. विद्यमान सरकारने काही दिवसांपूर्वीच दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.
- राज्याच्या क्रीडा विभागाची बुधवारी अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्यात ‘दहीहंडी’ या उत्सवाचा खेळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- त्यानुसार ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर राज्यात ‘प्रो दहीहंडी’ हा खेळ सुरु होणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी दिली होती.
- दरम्यान, राज्य सरकारने मंगळवारी दहीहंडीतील गोविंदा पथकांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
भारताचा झिम्बाब्वेवर दहा गडी राखून सहज विजय :
- 18 ऑगस्ट भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला सुरुवात झाली.
- या मालिकेतील पहिला सामना हरारे येथील ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ मैदानावर खेळवला गेला.
- या सामन्यात भारताने यजमान झिम्बाब्वेचा दहा गडी राखून सहज पराभव केला.
- सलामीवीर शुबमन गिल आणि उपकर्णधार शिखर धवन यांनी 192धावांची भागीदारी केली.
- या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.
- प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतासमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
धवन सचिन-सेहवागच्या क्लबमध्ये झाला दाखल :
- भारत विरुद्ध झिम्बाब्वे तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली.
- हरारे येथील ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ मैदानावर खेळवला गेलेला पहिला सामना भारताने जिंकला आहे.
- या दरम्यान शिखरने सलामीवीर म्हणून सहा हजार 500 धावांचा टप्पा पार केला.
- शिखर धवनने नऊ चौकारांच्या मदतीने 113 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. हे धवनच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 38वे अर्धशतक ठरले.
- सामन्यात अर्धशतक केल्यानंतर शिखर धवन सहा हजार 500 पेक्षा जास्त धावा करणारा भारताचा सहावा सलामीवीर ठरला आहे.
- त्याने 153 सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला. अशी कामगिरी करून तो सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुलीच्या यादीमध्ये जाऊन बसला आहे.
- याशिवाय, शिखर धवन 2020 नंतर 23 एकदिवसीय सामने खेळून हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. याबाबतीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दिनविशेष :
- 19 ऑगस्ट 1856 मध्ये गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.
- अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून 16 ऑगस्ट 1999 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
- 19 ऑगस्ट 1945 मध्ये होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
- स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म 19 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.