19 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

19 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 एप्रिल 2020)

शेजारी राष्ट्रांसाठी थेट गुंतवणुकीचे नियम कठोर :

 • भारताशी सीमा भिडलेल्या चीनसह शेजारी राष्ट्रातून विदेशी गुंतवणुकीला पूर्वमंजुरी घेणे सक्तीचे करणारे पाऊल केंद्र सरकारने शनिवारी टाकले.
 • तर करोना कहराच्या काळात देशातील कंपन्यांना सावज करून, संधीसाधू ताबा आणि संपादनाच्या व्यवहारांना पायबंद घातला जावा, या उद्देशाने हे निर्देश आले आहेत.
 • करोनामुळे विविध क्षेत्रांतील कंपन्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. अशा भारतीय कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करून त्या ताब्यात घेतल्या जाऊ शकतात. विशेषत: चिनी कंपन्यांकडून हा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन थेट परकीय गुंतवणुकीचे नियम बदलण्यात आले आहेत.
 • तसेच यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन शेजारील राष्ट्रांसाठी ‘सरकारी परवानगी’चा लागू होता. त्यात आता चीनचाही समावेश आहे.
 • तर गेल्या काही वर्षांत भारताने परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी थेट गुतंवणुकीचे नियम शिथिल केले होते. काही क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारच्या परवानगीविना परदेशी मालकीच्या कंपन्यांना भारतीय कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करता येते.
 • पण संरक्षण, दूरसंचार, औषधनिर्मिती, अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान आदी 17 क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय थेट गुंतवणूक करता येत नाही. करोनामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या काळात संधिसाधूपणा दाखवून भारतीय कंपन्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 एप्रिल 2020)

रक्तद्रव वैद्यकीय चाचण्यांना मान्यता :

 • केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेने भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या रक्तद्रव (प्लाझ्मा) वैद्यकीय चाचणीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
 • तर गंभीर अवस्थेतील करोना रुग्णांना बरे करण्यासाठी रक्तद्रवाचा वापर करता येतो. त्यात बऱ्या झालेल्या व्यक्तीचा रक्तद्रव चौदा दिवसांनीही चाचणी नकारात्मक आल्यानंतर घेऊन तो गंभीर करोना रुग्णाला टोचला जातो. त्यात रक्तगट जुळणे गरजेचे असते.
 • तसेच रक्तद्रव चाचण्या करण्यासाठी एक विषयतज्ज्ञ समिती नेमण्यात आली असून त्या समितीच्या 13 एप्रिलच्या बैठकीत या चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे.

मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा नवा सल्लागार गट :

 • काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेतील विषयांवर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी एका सल्लागार गटाची स्थापना केली आहे.
 • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या सल्लागार गटात 11 सदस्य असतील.
 • तर यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम यांचाही समावेश आहे.
 • करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विषय सध्या चर्चेत आहेत. देशातील आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था याचबरोबर भविष्यासंदर्भातील वेगवेगळ्या विषयांवर पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी आणि ती जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने हा सल्लागार गट तयार केला असल्याचे समजते.
 • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या सल्लागार गटाचे अध्यक्ष असतील. तर राहुल गांधी, रणदीपसिंग सुरजेवाला, के.सी.वेगणुगोपाल, पी.चिदंबरम, मनिष तिवारी, जयराम रमेश, प्रविण चक्रवर्ती, गौरव वल्लभ आणि रोहन गुप्ता हे या सल्लागार गटाचे सदस्य असतील.

दिनविशेष:

 • ख्यातनाम क्रिकेट पंच ‘डिकी बर्ड’ यांचा जन्म 19 एप्रिल 1933 मध्ये झाला होता.
 • सन 1948 मध्ये ब्रह्मदेशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.
 • गीतरामायणातील शेवटचे गाणे सन 1956 मध्ये पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले होते.
 • भारतीय प्रख्यात उद्योगपती ‘मुकेश अंबानी’ यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला.
 • सन 1975 मध्ये आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.