19 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

19 April 2019 Current Affairs In Marathi

19 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 एप्रिल 2019)

दुसऱ्या टप्प्यात राज्यात 63 टक्के मतदान:

  • लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा जागांसाठी सरासरी 63 टक्के मतदान झाले.
  • उस्मानाबादमध्ये राजकीय पक्षांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेली मतदानाची छायाचित्रे, अकोल्यात मतदाराने फोडलेले मतदानयंत्र, परभणीत पोलिसांच्या जीपवर दगडफेक, काही गावांनी मतदानावर घातलेला बहिष्कार आणि काही ठिकाणी मतदानयंत्रांत बिघाड यांचा अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.
  • लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात राज्यात 11 एप्रिल रोजी विदर्भातील सात मतदारसंघांत मतदान झाले होते. दुसऱ्या टप्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या 10 मतदारसंघातील 179 उमेदवांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करण्यासाठी शांततेत मतदान झाले.
  • राज्यातील दहा मतदारसंघांत सरासरी 63 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 एप्रिल 2019)

आतापासून केमिस्ट नव्हे; तर फार्मसी असणार:

  • बऱ्याच वर्षांपासून सुरू असणा-या राष्ट्रीय पातळीवरील फार्मासिस्टच्या लढ्याला अखेर यश आले आहे. लवकरच औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्यात नवी तरतूद होणार असून त्यानुसार आता ‘केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट’ असे न लिहिता यापुढे ‘फार्मसी’ असे लिहिण्यात येणार आहे. या नव्या तरतुदीची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या काही महिन्यांत ही सुधारणा होईल.
  • भविष्यात औषधांच्या दुकानांवर तुम्हाला ‘केमिस्ट आणि ड्रगिस्ट’ ऐवजी ‘फार्मसी’ असे लिहिलेले दिसणार आहे. कर्नाटक स्टेट रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनकडून औषधांच्या दुकानांवर ‘फार्मसी’ लिहिण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार औषधविषयक सल्लागार समितीने सरकारला याबाबत शिफारस केली.
  • कर्नाटक स्टेट रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनने ड्रग आणि कॉस्मेटीक 1945 कायद्यातील 65 (15) (बी) या नियमामध्ये औषध दुकानांवर असलेल्या केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट हे नाव बदलून फार्मसी करण्यात यावे ही विनंती केली होती.

‘टाईम्स’ व्दारे यंदाच्या प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर:

  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि लोकचळवळींसाठी कायदेशीर लढा देणाऱ्या अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांचा सहभाग जगभरातील प्रभावी व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे.
  • टाइम’ या नियतकालिकाने जगभरातील प्रभावी व्यक्तींची 2019 मधील यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात या तिघांचा समावेश आहे. या यादीत भारतीय-अमेरिकन कॉमेडियन हरन मिनाज, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही समावेश आहे.
  • मुकेश अंबानी यांची व्यावसायिक धोरणे ही अधिक व्यापक असून त्यामुळेच जवळपास 280 दशलक्ष लोकांना कमी किमतीत 4जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे जगभरात व्यापाराचा विस्तार करून त्यांची ‘कर लो दुनिया मुठ्ठीमे’ हे घोषवाक्य खरे केले आहे.
  • तर अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांनी एलजीबीटीक्यू यांच्यासाठी लढा देऊन कायदेशीर मार्गाने त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत.

बजाजची अनोखी चारचाकी ‘क्यूट’ महाराष्ट्रातही

  • नियामकाच्या कात्रीत अडकलेली बजाज ऑटोची ‘क्यूट’ हे छोटेखानी ‘क्वाड्रीसायकल’ वाहन अखेर महाराष्ट्रातही दाखल झाले आहे. पेट्रोलसह सीएनजीवर चालणारे व 3 लाखांपेक्षा कमी किमतीचे हे वाहन आहे, बजाज ऑटोचे हे अनोखे वाहन गेल्या चार वर्षांपासून भारतात तयार होत आहे.
  • मात्र नियामकाने आक्षेप घेतल्याने त्याची देशात विक्री होत नव्हती. अखेर गेल्या वर्षी त्याची भारतात विक्री सुरू झाली. पहिल्या टप्प्यात केरळ, गुजरात, ओडिशा, उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये अवतरल्यानंतर ही छोटी कार आता महाराष्ट्रातही उपलब्ध झाली आहे.
  • प्रति तास 70 किमी अंतर कापण्याची मर्यादा असलेल्या बजाज ऑटोच्या पेट्रोलवरील क्यूटची इंधनक्षमता 35 किमी प्रति लिटर, तर सीएनजीवरील क्यूटची इंधनक्षमता 43 किमी प्रति किलो आहे.
  • पेट्रोल वाहन 2.48 लाख तर सीएनजी वाहन 2.78 लाख रुपयांना राज्यात उपलब्ध असेल. 216.60 सीसी इंजिनक्षमता, फोर स्ट्रोक, सिंगल सिलिंडर अशी तांत्रिक रचना असलेल्या क्यूटला चार दरवाजे असून तिची उंची 1652 मिमी उंची आहे.
  • 451 किलो वजन असलेल्या क्यूटमध्ये यूएसबी चार्जिग पोर्ट, म्युझिक प्लेयर, कुलूपबंद साठवणूक कप्पे असून सहा विविध रंगांमध्ये हे वाहन उपलब्ध झाले आहे.

दिनविशेष:

  • ख्यातनाम क्रिकेट पंच ‘डिकी बर्ड’ यांचा जन्म 19 एप्रिल 1933 मध्ये झाला होता.
  • सन 1948 मध्ये ब्रह्मदेशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.
  • गीतरामायणातील शेवटचे गाणे सन 1956 मध्ये पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले होते.
  • भारतीय प्रख्यात उद्योगपती ‘मुकेश अंबानी’ यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला.
  • सन 1975 मध्ये आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 एप्रिल 2019)

You might also like
1 Comment
  1. Nihal Mulla says

    It’s really nice to a students who preparing any state, central or any exams. *ie MPSC / UPSC…

Leave A Reply

Your email address will not be published.