18 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

18 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 सप्टेंबर 2022)

नव्या राष्ट्रीय पुरवठा धोरणास आरंभ :

 • वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट असलेल्या नव्या ‘राष्ट्रीय पुरवठा धोरणा’च्या आरंभाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली.
 • यामुळे सध्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 13 ते 15 टक्के असलेला वाहतूक खर्च 7.5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
 • भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थसत्ता असून उदयोन्मुख उत्पादन केंद्र बनत असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
 • नव्या धोरणांतर्गत ‘युनिफाईड लॉजिस्टिक्स इंटरफेस प्लॅटफॉर्म (यूएलआयपी)’ आणि ‘ईझ ऑफ लॉजिस्टिक सव्‍‌र्हिसेस (ई लॉग्ज)’ ही दोन संकेतस्थळे सुरू करण्यात आली आहेत.
 • यूएलआयपीमुळे वाहतुकीबाबत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील तर ई लॉग्जमुळे उद्योजकांना आपल्या समस्या तातडीने अधिकाऱ्यांकडे मांडता येतील.
 • समस्यांचे निराकरण करण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणायार करण्यात आली आहे.

नामशेष चित्ते पुन्हा देशात :

 • भारतातून सात दशकांपूर्वी नामशेष झालेले चित्ते पुन्हा भारतीय भूमीवर दाखल झाले.
 • नामिबियातून आणलेले पाच मादी आणि तीन नर चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी सोडण्यात आले.
 • भारतातून नामशेष झालेले चित्ते पुन्हा देशात येणे हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
 • नामिबियाहून विशेष बोईंग 747-400 विमानाने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शनिवारी सकाळी 8च्या सुमारास चित्त्यांचे आगमन झाले.
 • 1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले.
 • जगातील हा पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी वन्य प्राण्यांचा स्थलांतर प्रकल्प आहे. त्यामुळे सर्व जगाचे या प्रकल्पाकडे लक्ष लागले होते.

आनंद, इलामपार्थी यांना जागतिक युवा विजेतेपद :

 • भारताच्या प्रणव आनंद आणि ए. आर. इलामपार्थी यांनी शुक्रवारी जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटातील अनुक्रमे 16 आणि 14 वर्षांखालील गटांचे विजेतेपद पटकावले.
 • अग्रमानांकित आनंदने 11 डावांमध्ये एकूण नऊ गुणांची कमाई करताना अर्ध्या गुणाच्या फरकाने बाजी मारली. आनंद संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला.
 • इलामपार्थीने 11 डावांमध्ये एकूण 9.5 गुण प्राप्त केले. त्यानेही अर्ध्या गुणाच्या फरकाने सरशी साधली.

मुश्ताक अली स्पर्धेपासून प्रभावी खेळाडूचा नवा नियम :

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेट हंगामातील सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) हा नवा नियम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • ही स्पर्धा ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, सर्व राज्य संघटनांना ई-मेलद्वारे ‘बीसीसीआय’ने या नियमाच्या अंमलबजावणीबाबत कळवले आहे.
 • ‘बीसीसीआय’ गेल्या काही वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये हा नियम आणण्याचा प्रयत्न करत होते.
 • मात्र त्यापूर्वी त्यांनी या नियमाचा पहिला प्रयोग सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत करून पाहाण्याचे ठरवले आहे.
 • ही संकल्पना या स्पर्धेत यशस्वी ठरल्यास ‘आयपीएल’मध्ये 2023 पासून या नियमाचा समावेश करण्यात येईल, असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.
 • या नियमाने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये अधिक आकर्षकता येईल, असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.
 • दोन्ही डावांतील १४व्या षटकापूर्वी एखाद्या खेळाडूला बदलून चारपैकी एका प्रभावी खेळाडूला संधी मिळेल.
 • एखादा फलंदाज बाद झाला असला, तरी त्याच्या जागी प्रभावी खेळाडूचा समावेश होऊ शकेल. त्याला फलंदाजी करता येईल.
 • एखाद्या गोलंदाजाची काही षटके संपल्यानंतरही त्याला बदलता येईल. बदली गोलंदाज म्हणून प्रभावी खेळाडू चार षटके टाकू शकेल.

दिनविशेष :

 • सन 1882 मध्ये पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.
 • महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना 18 सप्टेंबर सन 1927 मध्ये करण्यात आली.
 • सन 1947 मध्ये अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए. (CIA) ची स्थापना करण्यात आली.
 • निझामाच्या सैन्याने सन 1948 मध्ये पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.
 • अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म 18 सप्टेंबर 1971 मध्ये झाला.
 • सन 1997 मध्ये महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.