18 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
18 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 सप्टेंबर 2020)
वाढदिवसानिमित्त मोदींनी या पाच गोष्टींची यादीच दिली :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी 70 वा वाढदिवस साजरा केला.
- वाढदिवस संपल्यानंतर मध्यरात्री मोदींनी ट्विटरवरुन शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच गिफ्ट म्हणून आपल्याला काय हवे आहे हे ही सांगितलं आहे.
- असं म्हणत पाच गोष्टींची यादीच दिली आहे. ती यादी पुढीलप्रमाण.
- मास्क वापरा आणि योग्य पद्धतीने घाला
- सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करा. दोन फूट अंतर हे कायम लक्षात ठेवा
- गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
- रोगप्रतिकारशक्ती वाढवा
- आपल्या पृथ्वीला अधिक सशक्त बनवा
Must Read (नक्की वाचा):
इनहेलरच्या माध्यमातून लस देण्याचा पर्याय:
- करोना विषाणूचा प्राथमिक संसर्ग हा श्वसनमार्गातून सुरू होत असल्याने तेथेच त्याला प्रतिकार करण्यासाठी इनहेलरच्या माध्यमातून लस देण्याच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संशोधकांनी म्हटले आहे.
- त्यांनी याबाबत संशोधन सुरू केले असून तोंडावाटे इनहेलरच्या माध्यमातून लस देणे जास्त परिणामकारक ठरणार असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
- कोविड १९ प्रायोगिक लशी लंडनचे इम्पिरियल कॉलेज व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केल्या आहेत. त्या श्वसनमार्गातून देता येतील का, यावर विचार सुरू आहे.
- ब्रिटिश सरकार व व्यापारमंत्री आलोक शर्मा यांनी कोविड लशीच्या ब्रिटनमधील प्रकल्पांचे स्वागत केले असून 130 दशलक्ष पौंडाची मदत दिली आहे.
- शिवू हे इम्पिरियलचे प्राध्यापक रॉबिन श्ॉटॉक व ऑक्सफर्डच्या प्राध्यापक सारा गिलबर्ट यांच्यासमवेत लस कुठल्या पद्धतीने द्यायची यावर विचार करीत आहेत.
- अस्थमा औषधे दिली जातात त्या एरोसेल पद्धतीने काही स्वयंसेवकांना लस दिली जाणार आहे. नाक, घसा, श्वसनमार्गावर लशीचा परिणाम समजण्यासाठी इन्हेलर पद्धत वापरावी लागेल, असे प्रा. श्ॉटॉक यांचे मत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स पुस्तकाचे प्रकाशन :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित पुस्तकाच्या डिजीटल अवृत्तीचे अनावरण केलं.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने या डिजीटल अवृत्तीचे प्रकाशन करण्यात आलं आहे.
- दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला. मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर 2014 ते 2019 दरम्यान केलेल्या विक्रमांची या पुस्तकामध्ये नोंद आहे.
- या पुस्तकात एकूण 243 विक्रमांची नोंद असून ते जागतिक स्तरावरील अथवा पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाने नोंदवलेले विक्रम आहेत.
- हे छापील पुस्तक मागील वर्षीपासूनच बाजारात उपलब्ध होते. आता हे डिजीटल माध्यमांवर उपलब्ध झाले आहे.
बार्सिलोनाच्या विजयात मेसी चमकला:
- लिओनेल मेसी याने दोन गोल झळकावत गिरोनाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात बार्सिलोनाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.
- बार्सिलोनाने हा सामना 3-1 अशा फरकाने जिंकला.
- लुइस सुआरेझ आणि आर्टुरो विदाल या दोन अव्वल खेळाडूंना प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी विश्रांती दिली होती.
- मेसीने झोकात पुनरागमन केले. फिलिपे कु टिन्होने 21व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाच्या विजयात योगदान दिले. गिरोनाकडून सॅम्युएल सेझने एकमेव गोल केला.
दिनविशेष :
- सन 1882 मध्ये पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.
- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना 18 सप्टेंबर सन 1927 मध्ये करण्यात आली.
- सन 1947 मध्ये अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए. (CIA) ची स्थापना करण्यात आली.
- निझामाच्या सैन्याने सन 1948 मध्ये पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.
- अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म 18 सप्टेंबर 1971 मध्ये झाला.
- सन 1997 मध्ये महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना झाली.