18 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

मुकेश अंबानी
मुकेश अंबानी

18 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 मार्च 2022)

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा :

  • पंजाबमध्ये 23 मार्चपासून भ्रष्टाचारविरोधात एक हेल्पलाईन सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी केली.
  • तर या हेल्पलाईनवर लाच मागणाऱ्या किंवा गैरव्यवहार करणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांची चित्रफीत अपलोड करता येईल.
  • तसेच राज्यात भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यात येईल, असे ते म्हणाले.
  • दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मान यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 मार्च 2022)

शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश :

  • पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत भगवद् गीतेचे धडे शिकायला मिळणार आहेत.
  • तर गुजरात सरकारने यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे.
  • गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.
  • केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे बदल करण्यात आल्याची माहिती जितू वाघानी यांनी यावेळी दिली आहे.
  • 6वी ते 12वीपर्यंतच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्यात आल्याचं ते म्हणाले.

‘असनी’ठरणार 2022 मधलं पहिलं चक्रीवादळ :

  • असनी हे 2022 मधलं पहिलं चक्रीवादळ चारच दिवसात अंदमान निकोबारला धडकण्याची शक्यता आहे.
  • अंदमानला धडकल्यानंतर ते बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने सरकेल.
  • बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र 21 मार्चपर्यंत चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे.
  • दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावरील कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-ईशान्य दिशेने सरकले आणि आज सकाळी 8.30 वाजता दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागरावर मध्यभागी आले.
  • तसेच ते पूर्व-ईशान्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता आहे.
  • तर येत्या शनिवारपर्यंत ते बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिणी भागात पसरण्याची शक्यता आहे.

जगातील सर्वात 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय :

  • जगातील श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी स्थान मिळवलं आहे.
  • महत्वाचं म्हणजे Hurun Global Rich List 2022 मध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय आहेत.
  • पण संपत्ती वाढण्याच्या बाबतीत बोलायचं गेल्यास गौतम अदानी यांना बाजी मारली आहे. त्यांच्या संपत्तीत दिवसाल कोट्यवधींची वाढ होत आहे.
  • हुरुनच्या यादीनुसार, मुकेश अंबानींची संपत्ती (Mukesh Ambani Net Worth) जवळपास 103 अरब डॉलर आहे.
  • तर गतवर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 20 अरब डॉलर्सची वाढ झाली आहे.
  • यासोबतच जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या 10 जणांच्या यादीत ते नवव्या क्रमांकावर आहेत.
  • या यादीत गौतम अदानी यांचं नाव 12 व्या क्रमांवर असलं तरी गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे.
  • श्रीमंतांच्या यादीत (World Top-10 Richest Persons List) टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत.

आता वंदे भारत एस्क्प्रेस प्रतितास 200 किमीच्या वेगाने धावणार :

  • भारतीय रेल्वे विभाग मेड इन इंडिया या संकल्पेवर जास्त भर देत असून रेल्वे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
  • आता वंदे भारत रेल्वे प्रतितास 200 किमीच्या वेगाने धावणार असून त्यावर काम करण्यात येत आहे.
  • तसेच त्यांनी वंदे भारत रेल्वेची विशेषता तसेच त्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चाबाबत माहिती दिली.
  • तसेच त्यांनी प्रत्येक महिन्यात आठ वंदे भारत रेल्वे तयार केल्या जातील, असं सांगितलं.

31 मार्चपर्यंत आधार पॅन कार्ड लिंक न केल्यास काय होणार :

  • सरकारकडून आधार पॅन लिंक करण्याचा वारंवार सूचना देण्यात येत आहेत.
  • तर गेल्या काही वर्षांत पॅन लिंक करण्याची मुदत देखील वाढवण्यात आली होती.
  • आता आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.
  • तर या तारखेपर्यंत दोन्ही कागदपत्रे लिंक न केल्यास अनेक परिणामांना सामोरे जावे लागेल.
  • सर्वप्रथम तुमचा पॅन निष्क्रिय होईल. एकदा का पॅन निष्क्रिय झाला की, तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत.
  • तसेच बँकेत खाते उघडणे, शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक करता येणार नाहीत.
  • तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर अधिक टीडीएस भरावा लागेल.
  • कर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एकदा का पॅन निष्क्रिय झाला, तर पॅन नंबर नाही असे गृहीत धरले जाईल.
  • तसेच आयकर कायद्यांतर्गत दंड भरण्यास जबाबदार धरलं जाईल.
  • 1961 कलम 272 (बी) नुसार पॅन सादर करू न शकल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाईल.

दिनविशेष:

  • शहाजी राजे भोसले यांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला होता.
  • 18 मार्च 1867 रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म झाला होता.
  • स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म 18 मार्च 1881 रोजी झाला.
  • सन 1922 मध्ये महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षे तुरूंगवास झाला.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन सन 1944 मध्ये भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 मार्च 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.