18 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
18 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 जून 2020)
डेक्झामिथासोन उपचारांसाठी वापर करण्याची परवानगी दिली- ब्रिटन सरकार:
- करोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या ‘डेक्झामिथासोन’ या स्टेरॉइडचा उपचारांसाठी वापर करण्याची परवानगी ब्रिटन सरकारने बुधवारी सरकारी निधीप्राप्त ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ला दिली.
- स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असलेल्या या दाहविरोधी (अँटी-इन्फ्लेमेटरी) स्टेरॉइडचा रुग्णालयात दाखल असलेल्या आणि ऑक्सिजनची गरज असलेल्या, तसेच जीवरक्षक प्रणालीवर असलेल्या कोविड-19 च्या सर्व रुग्णांवर उपचारांसाठी वापर करण्याची तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे.
- सरकारतर्फे अनुदान देण्यात येत असलेली या औषधाची चाचणी हा ‘सगळ्यात महत्त्वाचा शोध’ आहे.
- तसेच त्याने कोविड-19 मुळे रुग्णंचा मृत्यू होण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणावर कमी झाली आहे.
- असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):
सलग आठवे बुंडेसलिगा फुटबॉलचे विजेतेपद पटकावले- बायर्न म्युनिक:
- बायर्न म्युनिकने मंगळवारी विक्रमी सलग आठवे बुंडेसलिगा फुटबॉलचे विजेतेपद पटकावले.
- हंगामातील दोन लढती बाकी असतानाच बायर्नने वर्डर ब्रेमेनला 1-0 नमवत त्यांचे विजेतेपद निश्चित केले.
- तर ब्रेमेनला नमवल्याने बायर्नला दुसऱ्या स्थानावरील बोरुसिया डॉर्टमंडवर 10 गुणांची आघाडी मिळवता आली.
- तसेच डॉर्टमंडने हंगामातील त्यांच्या उर्वरित तीनही लढती जिंकल्या तरी त्यांना 9 गुणच मिळतात.
- बुंडेसलिगा हंगामात सर्वाधिक गोल केलेल्या रॉबर्ट लेवान्डोवस्कीने 43व्या मिनिटाला केलेला गोल बायर्नच्या विजयात मोलाचा ठरला.
- या लढतीत 79व्या मिनिटाला अल्फान्सो डेव्हिसला सामन्यातील दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आल्याने मैदान सोडावे लागले.
- त्यामुळे उर्वरित 11 मिनिटे बायर्नने 10 खेळाडूंसह खेळून काढली. त्यात 11 मिनिटांत गोलरक्षक मॅन्यूयल न्यॉरने एक गोल होण्यापासून वाचवला.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुण देण्यात येणार ?
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात परीक्षेला बसू न शकणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारची गुणपद्धती अवलंबणार.
- असा सवाल करीत उच्च न्यायालयाने याबाबत आयएससीईला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.
- मंडळाने निश्चित केल्याप्रमाणे जुलै महिन्यात परीक्षेचे उर्वरित पेपर द्यायचे की अंतर्गत मूल्यमापन किंवा पूर्व-परीक्षेचे गुण स्वीकारायचे, या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना 22 जूनपर्यंत दिलेल्या मुदतीत वाढ करावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने मंडळाला केली.
- याचिकाकर्ते अरविंद तिवारी यांनी मंडळाने घेतलेल्या निर्णयात विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुण देण्यात येणार.
- तसेच याबाबत स्पष्टता नसल्याचे बुधवारी न्यायालयाला सांगितले. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.
ओडिशामधील महानदीमध्ये 500 वर्ष जुनं मंदिर साडलं:
- ओडिशामधील महानदीमध्ये काही दिवसांपूर्वीच एक 500 वर्ष जुनं मंदिर साडलं होतं.
- ही घटना ताजी असतानाच आता आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथेही एक पुरातन शिवमंदीर सापडलं आहे.
- एएनआयने दिलेल्या माहितीनुसार वाळूच्या उपश्यासाठी खोदकाम करताना पुरातन शिवमंदीराचे अवशेष सापडले आहेत.
- तर नेल्लोमधील पेन्ना नदीच्या पात्रामध्ये वाळूचा उपसा सुरु असताना एक मंदिरासारखे बांधकाम आढळून आलं आहे.
- वेन्ना नदीच्या काठावर असणाऱ्या पेरुमल्लापडू गावामध्ये वाळूचा उपसा सुरु होता.
- त्याचवेळी वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये मंदिराचा कळस आणि प्रवेशद्वारासारखे बांधकाम आढळून आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे 200 वर्षांपूर्वीचे शिवमंदीर आहे.
UNSC : आठव्यांदा भारताची तात्पुरत्या सदस्यपदी निवड:
- बुधवारी भारताची आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या (UNSC) च्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली.
- या विजयानंतर भारत 2012-22 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य बनला आहे.
- 913 सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेनं आपल्या 75 व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य आणि आर्थिक तसंच सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती.
- भारतासोबतच आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांनाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळालं आहे.
- विजयानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली.
- भारत नेतृत्व कायम ठेवणार असून उत्तम बहुपक्षीय प्रणालीला नवीन दिशा देणार असल्याचं ते म्हणाले.
- तसेच भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली.
- “भारताची 2021-22 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे मी खुश आहे.
- आम्हाला सर्वांचं उत्तम समर्थन मिळालं. तसंच संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांनी जो विश्वास दाखवला त्याप्रती आदर व्यक्त करतो,” असंही ते म्हणाले.
मसंग इलेक्ट्रॉनिक्सने उत्तर प्रदेशमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला:
- फोननिर्मिती क्षेत्रातील जगभरातील अव्वल कंपन्यांपैकी एक असणाऱ्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने उत्तर प्रदेशमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मूळ दक्षिण कोरियन कंपनी असणाऱ्या सॅमसंगने उत्तर प्रदेशमध्ये 53.67 बिलियन रुपये म्हणजेच 5 हजार 367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
- कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये स्मार्टफोन डिस्प्ले बनवण्याचा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
- यासंदर्भातील करारांवर 2019 च्या शेवटी सरकार आणि कंपनी दोघांकडूनही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
- या कारखान्याच्या माध्यमातून 1300 जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे इनव्हेस्ट इंडिया या मोहिमेअंतर्गत केंद्राने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
- इनव्हेस्ट इंडिया या मध्यस्थी करणाऱ्या आणि परदेशी गुंतवणूक आणण्याचं काम करणाऱ्या खात्याने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या सॅमसंगच्या कारखान्यासंदर्भातील पत्राचा रॉयटर्सने हवाला दिला आहे. हा प्रकल्प 2019 पासून सुरु होणार आहे.
दिनविशेष :
- स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म 18 जून 1899 मध्ये झाला.
- पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म 18 जून 1911 रोजी झाला.
- सन 1908 मध्ये 18 जून रोजी फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.
- डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून 18 जून 1946 रोजी गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
- जनावरांमधे आढळणार्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस 18 जून 1981 मध्ये विकसित केली गेली.