18 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

18 June 2019 Current Affairs In Marathi

18 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 जून 2019)

ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार :

  • भारतीय जनता पार्टीचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला हे लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी एनडीएचे उमेदवार राहणार असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
  • तसेच लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह. रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. विरेंद्र कुमार यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते होते.
  • मात्र आज लोकसभा अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला हे उमेदवारी दाखल करणार आहेत. ज्यानंतर बुधवारी संसदेत यासाठी मतदान होईल. लोकसभेत एनडीए आघाडीचे बहुमत असल्याने ओम बिर्ला हेच लोकसभा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 जून 2019)

जगात अण्वस्त्रांच्या संख्येत गतवर्षी घट :

  • जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाली आहे. असे असले तरी विविध देश त्यांच्या अण्वस्त्र साठय़ात आधुनिकता आणत आहेत असे एका अहवालात म्हटले आहे.
  • तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण 13,865 अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ अण्वस्त्र संख्या
    2018 च्या तुलनेत सहाशेने कमी झाली आहे.
  • अण्वस्त्र संख्या कमी झाली असली तरी चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रे आधुनिक करीत आहेत. या संस्थेच्या अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक श्नन किली यांनी सांगितले की, जगात अण्वस्त्रे कमी होत असली तरी
    त्यांचे स्वरूप बदलत आहे.
  • अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. त्यांनी अण्वस्त्रांची संख्या कमी केली आहे. नवीन स्टार्ट करारावर 2010 मध्ये अमेरिका व रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात सज्ज अण्वस्त्रांची संख्या कमी
    ठेवण्याचे बंधन आहे.

जे पी नड्डा भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष :

  • भाजपातील ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  • तर झालेल्या भाजपाच्या संसदीय बैठकीत जे पी नड्डा यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाध्यक्षपद सोडणार अशी चर्चा होती.
  • मात्र, त्यांना अध्यक्षपदी कायम ठेवून पक्षात कार्यकारी अध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली. तसेच जे पी नड्डा रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत.
  • यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशामध्ये भाजपानं मिळवलेल्या अभूतपुर्व यशामध्ये नड्डा यांचा मोलाचा वाटा होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं 80 पैकी तब्बल 62 जागा जिंकल्या आहेत.

दिनविशेष :

  • स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म 18 जून 1899 मध्ये झाला.
  • पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म 18 जून 1911 रोजी झाला.
  • सन 1908 मध्ये 18 जून रोजी फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.
  • डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून 18 जून 1946 रोजी गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
  • जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस 18 जून 1981 मध्ये विकसित केली गेली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 जून 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.