18 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

18 July 2018 Current Affairs In Marathi

18 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 जुलै 2018)

गोव्यातून ‘हंगामी बढती’ शब्द हद्दपार :

 • गोवा लोकसेवा आयोगाने ‘हंगामी बढती’ हा शब्दच हद्दपार केला आहे. आता यापुढे सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बढत्या या कायमस्वरूपीच असणार आहेत.
 • अनेक वर्षे हंगामी बढतीवर अनेकजण काम करत होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याची दखल घेत हे काम आयोगाकडे सोपवले. आयोगाने दीड वर्षात 1 हजार 100 जणांच्या हंगामी बढत्या नियमित केल्या.
 • आयोगाच्या अध्यक्षपदी जुझे मान्युएल नरोन्हा यांची दोन वर्षांपूर्वी नियुक्ती झाली आणि या साऱ्याची सुरवात झाली. हंगामी (ऍडव्हॉक) बढती झालेल्यांच्या बढत्या नियमित करण्यासाठी आवश्‍यक ते शेरे त्यांच्या वैयक्तिक फाईलमध्ये नोंदविण्यात आले नव्हते. GPSC
 • तसेच काहींना तर हंगामी बढती नियमित करण्यासाठी कोणती कार्यपद्धती असते याची माहितीही नव्हती. या साऱ्याची मुळापासून सुरवात करत आयोगाने या बढत्या नियमित केल्या.
 • सरकारनेही आता यापुढे हंगामी बढती नाही, असे ठरविल्याने बढती देण्यासाठी आता आयोगाच्या माध्यमातून बढती समितीच्या शिफारशीनुसार बढत्या द्याव्या लागणार आहेत. बढतीसाठी जेवढी रिकामी पदे उपलब्ध आहेत, तेवढ्याच बढत्या देता येणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 जुलै 2018)

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या साजनला सुवर्णपदक :

 • आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत भारताने पहिल्या दिवशी एका सुवर्णपदकासह दोन रौप्य आणि एक ब्रॉंझपदक मिळविले. ग्रिको रोमन गटातील लढतीत 77 किलो वजनी गटात साजन सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
 • 55 किलो वजनी गटात विजय आणि 130 किलो वजनी गटात आर्यन पन्वर रौप्यपदकाचा मानकरी ठरला. स्पर्धेतील 87 किलो वजनी गटात सुनिल कुमारला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या दिवशी इराणचे वर्चस्व राहिले. त्यांनी तीन सुवर्णपदके मिळविली.
 • भारताच्या साजनने सुवर्णपदकाची लढत जिंकताना इराणच्या शायन हुसेन अफिफी याला हरवून पदकावर विजय मिळविला.

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणार :

 • प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणे ही सरकारची भूमिका आहे. पुढील वर्षीपासून उस्मानाबाद जिल्ह्यासह कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत केली.
 • राज्यात वैद्यकीय प्रवेशासाठी जात आणि प्रवर्ग आरक्षण असतानाही प्रादेशिक आरक्षण लादल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातले सदस्य आक्रमक झाले होते. यामुळे सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला.
 • प्रादेशिक आरक्षण रद्द करून मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवून त्यांची प्रवेश क्षमता वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महाजन यांनी हे आरक्षण 1985 पासून लागू आहे, असे सांगत तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने मराठवाड्यात एकही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले नाही, असे सांगितले.
 • तसेच यावर विरोधकांनी आक्षेप घेत आणि उत्तरावर असमाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे ही मागणी केली. तोपर्यंत लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याची विनंती केली.

‘फोर्ब्स’च्या यादीत आता बॉलीवुड सुपरस्टार सहभागी :

 • फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता अक्षयकुमारसलमान खान यांना यंदाही स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत अमेरिकेचा फ्लॉइड मेवेदर (बॉक्‍सर) अव्वलस्थानी आहे.
 • जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 100 व्यक्तींची यादी फोर्ब्सने नुकतीच जाहीर केली. त्यात अक्षयकुमार 76 व्या स्थानावर असून, गेल्यावर्षी तो 80 व्या स्थानावर होता. सलमान खानचे यादीतील स्थान यंदा घसरले असून, तो 82 व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी या यादीत 65 व्या स्थानावर वर्णी लागलेला शाहरुख खान यंदा मात्र पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवू शकला नसल्याचे स्पष्ट झाले.
 • दरम्यान, या यादीत अभिनेता जॉर्ज क्‍लूनी (2), रियल्टी टीवी स्टार कायली जेनर (3), फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनॉल्डो (10), पॉप स्टार केट पैरी (19), टेनिसपट्टू रॉजर फेडरर (23), गायक बेयान्स (35), लेखिका जे.के. रोलिंग (42) तर गोल्फर टाइगर वूड्‌स 66 व्या स्थानावर आहेत.

100 रूपयांची नवी नोट लवकरच चलनात येणार :

 • 10, 50, 200, 500 आणि 2000 रूपयांच्या नव्या नोटेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) लवकरच 100 रूपयांची नवी नोट बाजारात आणली जाणार आहे.
 • नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे. यामध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचे छायाचित्र असेल. नवी नोट बाजारात आल्यानंतर जुनी नोटही चलनात राहील. या नोटेच्या डिझाईनला म्हैसूरच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. याच प्रेसमध्ये 2000 रूपयांच्या नव्या नोटांची छपाई होते. 100 Rupee
 • आकाराने ही नोट सध्या अस्तिवात असलेल्या 100 रूपयांच्या नोटेपेक्षा छोटी आणि 10 रूपयांच्या नोटेपेक्षा मोठी असेल. 100 रूपयांच्या नव्या नोटेच्या छपाईचे काम देवासच्या प्रेसमध्ये सुरूही झाले आहे.
 • म्हैसूरमध्ये सुरूवातीचे नमुने छापण्यात आले होते. या नोटेमध्ये विदेशी शाईचा उपयोग केला होता. देवास प्रेसमध्ये देशी शाईचा वापर केला जाणार आहे.
 • तसेच या नोटेचे वैशिष्ट्य म्हणजे ही नोट होशंगाबादच्या सिक्युरिटी पेपर मिलच्या स्वदेशी पेपर आणि शाईने छापली जाणार आहे. नव्या नोटेबाबत देवास प्रेसच्या व्यवस्थापनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

एल्फिन्स्टन रोडचे नामांतरन आता ‘प्रभादेवी’ स्थानक :

 • मंजूर होऊन तब्बल 12 महिन्यांपासून अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेल्या एल्फिन्स्टन रोडच्या नामांतराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. 18 जुलै मध्यरात्रीपासून एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. Prabhadevi
 • 29 सप्टेंबर 2017 रोजी एल्फिन्स्टन रोडचे नाव प्रभादेवी असे करण्यात येणार होते. मात्र त्याच दिवशी दुर्घटना घडल्याने नामांतराचा विषय पुन्हा मागे पडला. अखेर आता 18 जुलैच्या मध्यरात्रीपासून एल्फिन्स्टन रोडचे नाव प्रभादेवी होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
 • स्थानकातील नावाचे फलक, इंडिकेटर, उद्घोषणा यंत्रणा इत्यादीमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. तसेच प्रभादेवी स्थानकाचा कोड ‘पी बी एच डी‘ असेल, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.

दिनविशेष :

 • 18 जुलै हा ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 मध्ये झाला.
 • सन 1968 मध्ये कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना झाली.
 • अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 2000 विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म 18 जुलै 1982 रोजी झाला.
 • उद्योगपती गोदरेज यांना सन 1996 मध्ये जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 जुलै 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.