18 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

18 January 2020 Current Affairs In Marathi
18 January 2020 Current Affairs In Marathi

18 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 जानेवारी 2020)

सुधारित नागरिकत्व कायद्या विरोधात पंजाब विधानसभेत ठराव :

 • नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील ठराव पंजाब विधानसभेने तीन तासांच्या चर्चेअंती मंजूर केला आहे.
 • तर शुक्रवारी हा कायदा रद्द करण्याची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला, असा ठराव करणारे केरळ नंतर पंजाब हे दुसरे राज्य ठरले आहे.
 • राज्याचे मंत्री ब्रह्मा मोहिंद्रा यांनी विशेष विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या व अखेरच्या दिवशी हा ठराव सादर केला होता.
 • आम आदमी पक्ष व काँग्रेस यांनी ठरावाला पाठिंबा दिला तर शिरोमणी अकाली दलाने नागरिकत्व देण्यात येणाऱ्या समुदायात मुस्लिमांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

देशात आंतरजाल अधिक गतीमान :

 • ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने जीसॅट-30 या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून शुक्रवारी पहाटे दोन वाजून 35 मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
 • जीसॅट-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात क्रांती होणार असून त्यामुळे इंटरनेट अधिक गतीने चालणार आहे.
 • यापूर्वी 2015 मध्ये इनसॅट-4 ए या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याची मर्यादा आता संपुष्टात आली असल्याने जीसॅट-30 हा दूरसंचार उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केला आहे. इनसॅट-4 ए ऐवजी आता जीसॅट-30 हा उपग्रह काम करणार आहे.
 • जीसॅट-30 या दूरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होणार आहे, व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच सेवा यासाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. जलवायुमध्ये होणारे बदल आणि हवामानाचा अंदाजही वर्तविण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.
 • तर या दूरसंचार उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून एरियन 5 प्रक्षेपकाच्या मदतीने शुक्रवारी पहाटे यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.
 • दक्षिण अमेरिकेत फ्रान्सच्या ताब्यातील कावरू येथील अवकाश तळावरून हा उपग्रह पहाटे 2.35 वाजता (भारतीय वेळेनुसार) यशस्वीपणे झेपावला. युरोपच्या एरिसयन स्पेसच्या एरियन 5 या प्रक्षेपकाने 38 मिनिटे 25 सेकंदात हा उपग्रह अपेक्षित कक्षेत स्थापित करण्यात आला.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात जलतरणात तीन सुवर्णपदके :

 • महाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेतून सोनेरी कामगिरी सलग आठव्या दिवशी सुरू ठेवली.
 • जलतरणात राज्याच्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकवले. त्याशिवाय वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले. अपेक्षेप्रमाणे खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या चारही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
 • महाराष्ट्राला जलतरणातून तीन सुवर्णपदकांची कमाई एका दिवशी करता आली. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मिहीर आम्ब्रेने 50 मीटर बटरफ्लाय आणि एरॉन फर्नाडिसने 200 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदके पटकवली.
 • मुलींमध्ये करिना शांताने 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य आणि कांस्यदेखील महाराष्ट्राच्या मुलींनाच मिळाली. अपेक्षा फर्नाडिसने रौप्य आणि झारा जब्बरने कांस्यपदक मिळवले. कियारा बंगेराने 200 मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक मिळवले.

भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं निधन :

 • भारताचे माजी क्रिकेपटू बापू नाडकर्णी यांचं मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.
 • त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे. रमेश गंगाराम नाडकर्णी असं त्यांचं नाव होतं. त्यांना बापू नाडकर्णी असं संबोधलं जाई.
 • 16 ते 21 डिसेंबर रोजी न्यूझीलंड विरोधात दिल्लीमध्ये जो कसोटी सामना झाला त्या सामन्यातून बापू नाडकर्णी यांनी क्रिकेटविश्वात पदार्पण केले. त्यांच्या गोलंदाजीच्या खास शैलीमुळे त्यांची क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण झाली होती.
 • कसोटीत सलग 21 षटकं निर्धाव (मेडन) टाकण्याचा विश्वविक्रम बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे. बापू नाडकर्णी हे डाव्या हाताने फिरकी गोलंदजी करत असत. इंग्लंडविरोधातल्या सामन्यात बापू नाडकर्णी यांनी 32 षटकं टाकली होती.
 • त्यापैकी 27 षटकं निर्धाव होती. 32 षटकांच्या त्यांनी अवघ्या पाच धावा दिल्या होत्या.

सलामीवीर रोहित शर्माचा विक्रम :

 • ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
 • ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार फिंच यांनी नाबाद द्विशतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
 • तर यानंतर राजकोटच्या मैदानावर दुसऱ्या वन-डे सामन्यातही, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि शिखर धवन या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकी भागीदारी केली
 • तसेच या सामन्यात रोहित शर्माने वन-डे क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने आणखी एका विक्रमाची नोंद केली.
 • सलामीवीर या नात्याने रोहितने वन-डे क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. 137 डावांमध्ये रोहितने ही कामगिरी केली, आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमलाचा विक्रम यावेळी रोहितने मोडला.

दिनविशेष:

 • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 मध्ये झाला होता.
 • चंदन तस्कर वीरप्पन याचा जन्म 18 जानेवारी 1952 रोजी झाला होता.
 • सन 1998 मध्ये मदनमोहन पूंछी यांनी भारताचे 28वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना सन 1999 मध्ये भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
3 Comments
 1. samadhan patil says

  thank u madam

 2. pradiq ingole says

  hii

 3. pradip ingole says

  Gm

Leave A Reply

Your email address will not be published.