18 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

नील मोहन
नील मोहन

18 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 फेब्रुवारी 2023)

यूट्यूबच्या CEO पदी भारतीय वंशाच्या नील मोहन यांची नियुक्ती:

 • यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार सुसान व्होजिकी या आपल्या पदावरून पायउतार झाल्या आहेत.
 • आता अमेरिकास्थित भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • याबाबत यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने घोषणा केली आहे.
 • यूट्यूब हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म आहे.
 • सुसान व्होजिकी गुगलच्या जाहिरात विभागात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.
 • नील मोहन यांनी 2008 साली गुगलमधून आपल्या कामाला सुरुवात केली होती.
 • 2015 साली ते यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून रुजू झाले.

भारतीय नौदलातील महिलांची अनोखी जनजागृती मोहीम:

 • भारतीय नौदल आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली – लोंगेवाल – दिल्ली या मार्गावर 12 दिवसांच्या ऑल इंडिया विमेन कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
 • नौदलाच्या ताफ्यातील साहसी महिलांद्वारा या रॅलीचे संचालन होत आहे.
 • भारतीय नौदलामध्ये अधिकारी होण्यासाठी अनेक अकल्पित आव्हानांना धैर्याने, दृढ निश्चय – संयमाने सामोऱ्या जाणाऱ्या महिलांच्या शौर्यगाथा ठळकपणे मांडण्यात येणार आहेत.
 • भारतीय नौदल आणि जीप इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली आयोजिण्यात आली आहे.
 • दिल्लीपासून सुरू होत जयपूर, बिकानेर, जैसलमेर, लोंगेवाला, जोधपुर, उदयपूर असा सुमारे 2300 किमीचा प्रवास करत या रॅलीचा समारोप दिल्लीमधे होईल.

शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाकडे:

 • राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला.
 • आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले.
 • त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना’ गमवावी लागली आहे.
 • केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते.
 • मात्र, शुक्रवारी आयोगाने अंतिम निकाल देताना, शिंदे गटाचे हंगामी पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह तातडीने गोठवण्यात आल्याचे स्पष्ट केले.
 • तसेच शिवसेनेच्या 2018च्या घटनेमध्ये, लोकप्रतिनिधी कायदा व पक्षांतर्गत लोकशाहीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार दुरुस्ती करावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे.

पुजारा 100वी कसोटी खेळणारा 13वा भारतीय क्रिकेटपटू:

 • भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रवेश करताच मोठी कामगिरी करेल.
 • 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चेतेश्वर पुजारा भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा 13वा क्रिकेटपटू ठरणार आहे.
 • आपल्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत तो भारताचा एक प्रमुख फलंदाज म्हणून समोर आला.
 • चेतेश्वर पुजाराने भारतासाठी 99 सामन्यात 7021 धावा केल्या आहेत.
 • यादरम्यान त्याने 19 शतके आणि 34 अर्धशतके झळकावली. नाबाद 206 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

दिनविशेष:

 • पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला.
 • स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला होता.
 • क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 मध्ये झाला.
 • 1979 या वर्षी सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
 • सन 1998 मध्ये ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.