18 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

18 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 डिसेंबर 2021)

पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा ‘न्गदग पेल जी खोर्लो’ (ऑर्डर ऑफ दी ड्यूक ग्याल्पो) हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे.
  • तर याबद्दल मोदी यांनी भूतानच्या राजांचे आभार मानले आहेत.
  • तसेच दोन्ही देशांचे संबंध दृढ राहतील तसेच भारत भूतानला शक्य ती सर्व प्रकारची मदत करेल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.
  • 2019 मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भूतानची निवड केली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2021)

कर्नाटकमध्ये सरकार धर्मांतर विरोधी कायदा आणणार :

  • राज्य स्तरावर धर्मांतर विरोधी कायदा पारीत करण्यासाठी भाजपा सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
  • कर्नाटक सरकारने राज्यात धर्मांतर विरोधी कायद्याचा मसुदा तयार केला असून तो लवकरच पारीत केला जाण्याची शक्यात आहे.
  • तर त्यामध्ये अशा गुन्ह्यासाठी 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे.
  • तसेच या विधेयकानुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पवयीन आणि महिलांना दुसऱ्या धर्मात सक्तीने धर्मांतर करायला लावल्यास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
  • कुणीही व्यक्ती अशा प्रकारे धर्मांतर करण्याचा कट करणे किंवा तसा प्रयत्न करणे यासाठी शिक्षेस पात्र ठरेल. संबंधित व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबीयांकडून देखील यासंदर्भातली तक्रार केली जाऊ शकेल.

सचिन तेंडुलकर जगातील सर्वाधिक पसंतीच्या खेळाडूंमध्ये :

  • भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर जगातील सर्वाधिक पसंतीच्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
  • मँचेस्टर युनायटेड आणि पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहेत.
  • तर त्याच वेळी, दुसऱ्या स्थानावर पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) आणि अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी आहे.
  • जगातील सर्वाधिक पसंतीच्या पुरुषांच्या यादीत सचिन 12व्या क्रमांकावर आहे, तर खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • त्याचबरोबर या यादीत रोनाल्डो चौथ्या तर मेस्सी सातव्या क्रमांकावर आहे.
  • तसेच या वर्षीच्या सर्वेक्षणात 38 देश आणि प्रदेशातील 42 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता.

‘कोव्होव्हॅक्स’ला ‘डब्ल्यूएचओ’ची मान्यता :

  • सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्होव्हॅक्स’ या करोना लशीचा मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली.
  • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘कोव्होव्हॅक्स’च्या मुलांवरील आपत्कालीन वापरास परवानगी देण्याच्या निर्णयाचे ‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्वागत केले.
  • दर्जा, सुरक्षितता आणि परिणामकारकता, जोखीम व्यवस्थापन आराखडा आदींबाबतच्या भारताच्या औषध महानियंत्रकांच्या
  • अहवालाच्या आधारे ‘कोव्होव्हॅक्स’ला आपत्कालीन मंजुरी देण्यात आल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले.
  • अमेरिकेत जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सनच्या करोना प्रतिबंधक लशीऐवजी फायझर किंवा मॉडर्नाची लस देण्यात यावी, असे अमेरिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धात श्रीकांत, लक्ष्य यांची पदकनिश्चिती :

  • किदम्बी श्रीकांत आणि युवा लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅर्डंमटन र्अंजक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून प्रथमच पुरुष एकेरीत भारताच्या दोन पदकांची निश्चिती केली.
  • महिला एकेरीत मात्र परंपरागत प्रतिस्पर्धी ताय झू यिंगकडून पराभूत झाल्यामुळे गतविजेत्या पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात आले.
  • शनिवारी श्रीकांत आणि लक्ष्य यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार असल्यामुळे भारताला किमान एका रौप्यपदकाची अपेक्षा करता येऊ शकते.
  • 12व्या मानांकित श्रीकांतने नेदरलँड्सच्या मार्क कॅलजॉवर फक्त 26 मिनिटांत 21-8, 21-7 असा विजय मिळवला.
  • याचप्रमाणे बिगरमानांकित लक्ष्यने तीन सेटमध्ये एक तास आणि सात मिनिटे रंगलेल्या उत्कंठावर्धक सामन्यात चीनच्या ज्यून पेंग झाओला 21-15, 15-21, 22-20 असे नामोहरम केले.

दिनविशेष:

  • 18 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर ‘भिखारी ठाकूर‘ यांचा जन्म 18 डिसेंबर 1887 मध्ये झाला होता.
  • एफ.एम. रेडिओचे संशोधक ‘ई.एच. आर्मस्ट्रॉंग‘ यांचा जन्म 18 डिसेंबर 1890 मध्ये झाला होता.
  • सव्यसाची मुखर्जी यांनी सन 1989 मध्ये भारताचे 20वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
  • सन 2016 मध्ये भारतीय ज्युनियर हॉकी टिमने बेल्झियमला हरवून ज्युनियर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 डिसेंबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.