18 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जागतिक वारसा दिन
जागतिक वारसा दिन

18 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 एप्रिल 2020)

भारताला 59 लाख डॉलरची मदत :

  • अमेरिकेने कोविड 19 म्हणजे करोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारताला 59 लाख डॉलर्सची आरोग्य मदत मंजूर केली आहे.
  • तर या मदतीचा वापर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केला जाणार असून नवीन रुग्ण शोधणे, आरोग्य जागरूकता संदेशांचा प्रसार करणे, रुग्णांवर देखरेख वाढवणे या कामांसाठी निधी वापरणे अपेक्षित असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.
  • करोना विषाणूच्या साथीला तोंड देण्यासाठी तातडीच्या आर्थिक तरतुदीसाठी हा निधी वापरता येणार आहे. भारताला वीस वर्षांत अमेरिकेने दिलेल्या 2.8 अब्ज डॉलर्सच्या एकूण मदतीत 1.4 अब्ज डॉलर्स ही निव्वळ आरोग्य मदत आहे.
  • तर परराष्ट्र खाते, अमेरिकेची आर्थिक विकास संस्था यांनी 508 दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचे मान्य केले आहे. बहुदेशीय मदतीशिवाय भारताला मिळणारी ही मदत वेगळी आहे.
  • तसेच दक्षिण आशियात अफगाणिस्तान 18 दशलक्ष डॉलर्स, बांगलादेश 96 लाख डॉलर्स, भूतान पाच लाख डॉलर्स, नेपाळ 8 लाख डॉलर्स, पाकिस्तान 94 लाख डॉलर्स, श्रीलंका 13 लाख डॉलर्स या प्रमाणे मदत देण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 एप्रिल 2020)

रिझव्‍‌र्ह बँकेचे पूरक अर्थसहाय्य धोरण :

  • करोना संकटाबाबत चिंता व्यक्त करतानाच टाळेबंदीचा अर्थव्यवस्थेवरील अल्पकालिन फटका रिझव्‍‌र्ह बँकने मान्य केला. यातून काहीसा दिलासा म्हणून कर्जदारांचे व्याजदर कमी करण्यासह आस्थापनांना थकीत कर्जाबाबत मुभा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.
  • टाळेबंदीदरम्यान दुसऱ्यांदा शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दृकश्राव्य माध्यमातून घेतलेल्या निर्णयाचा लाभ कर्जदार, व्यापारी बँका तसेच आस्थापनांना होणार आहे.
  • तसेच बँकांचे अनुत्पादित कर्ज निश्चित केला जाणारा कालावधी आता 90 वरून थेट दुप्पट, 180 दिवस करण्यात आला आहे. यामुळे व्यापारी बँकांबरोबरच अशा अनुत्पादित मालमत्तेस निमित्त ठरणारे थकीत कर्जदार, आस्थापना, लघू उद्योजक यांनाही दिलासा मिळणार आहे.
  • तर देशातील आघाडीच्या वित्त पुरवठादार बँक, वित्त तसेच गृह वित्त कंपन्यांना सध्याच्या अर्थसंकटातही विनासाय रोकड उपलब्ध होण्याच्या दृष्टिने रिझव्‍‌र्ह बँकेने नव्याने 50,000 कोटी रुपये देऊ केले आहेत.
  • यानुसार, पैकी 25 हजार कोटी रुपये नाबार्ड, 15 हजार कोटी रुपये सिडबी व उर्वरित 10 हजार कोटी रुपये नॅशनल हाऊसिंग बँकेला प्राप्त होतील.

पॅरासिटेमॉलवर आधारित औषधांवरील निर्यातबंदी मागे :

  • पॅरासिटेमॉलवर आधारित अनेक औषधांवरची निर्यातबंदी सरकारने उठवली आहे.
  • मात्र पॅरासिटेमॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या औषध घटकांवरील निर्यात बंदी मात्र कायम ठेवली असल्याचे परदेशी व्यापार महासंचालकांनी एका अधिसूचनेत म्हटले आहे.
  • तसेच र्निबधित गटातील कुठलेही औषध किंवा घटक निर्यात करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. आता पॅरासिटेमॉल आधारित औषधांना ही परवानगी लागणार नाही. पॅरासिटेमॉलसाठी लागणाऱ्या औषध घटकांवरील निर्यात बंदी कायम राहणार आहे.
  • सरकारने 3 मार्च रोजी 26 औषध घटक व औषधांवर निर्यातबंदी लागू केली होती त्यात पॅरासिटेमॉलचा समावेश होता. पण 6 एप्रिल रोजी 24 औषध घटकांवरची निर्यात बंदी उठवण्यात आली, पण त्यात पॅरासिटेमॉलच्या औषध घटकांवरील निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली होती.

दिनविशेष :

  • 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन (World Heritage Day) म्हणून साजरा करतात.
  • दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना 18 एप्रिल 1336 मध्ये झाली.
  • 18 एप्रिल 1898 हा चाफेकर बंधू यांचा स्मृतीदिन आहे.
  • प्रसिद्ध चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचा जन्म 18 एप्रिल 1910 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.