17 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

17 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2021)

नासाच्या ‘लुसी’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण :

 • सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी नासाच्या आणखी एका मोहिमेला सुरुवात झाली आहे.
 • तर सुमारे 1500 किलो वजनाचे आणि 6 मीटर लांबीचे दोन सोलर पॅनल असलेले ‘लुसी’हे यान ‘एटलास-5’ या प्रक्षेपकाने अमेरिकेतील फ्लोरिडा इथल्या तळावरुन यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केले.
 • तसेच हे यान पुढील 12 वर्ष प्रवास करत गुरु ग्रहाजवळ असलेल्या 8 विविध लघुग्रहांजवळून जात त्यांची छायाचित्रे काढणार आहे. यामधून या लघुग्रहांचा अभ्यास केला जाणार आहे.
 • लघुग्रहांचे दोन मोठे समूह हे गुरु ग्रहांच्या समकक्ष मागे आणि पुढे गुरु ग्रहाबरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या लघुग्रहांना गुरु ग्रहाचे ट्रोजन ( Jupiter Trojan ) म्हणून ओळखलं जातं.
 • तर हे लघुग्रह सूर्यमालेच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहेत असा खगोल अभ्यासकांचा कयास आहे. त्या वेळी मोठ्या ग्रहाची निर्मिती झाली नाही, पण त्याचे अवशेष हे या लघुग्रहांच्या रुपाने बाकी आहेत असा अंदाज आहे.
 • तेव्हा या लघुग्रहांचा अभ्यास हे ‘लुसी’ यान करणार आहे. यामुळे सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल मोठी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
 • तसेच या लघुग्रहांची संख्या अडीच लाखापेक्षा जास्त आहे. एक किलोमीटर पासून ते 100 किलोमीटर पर्यंत व्यासाचे विविध आकाराचे हे लघुग्रह या Jupiter Trojan मध्ये आहेत.
 • तर यापैकी 8 मोठ्या लघुग्रहांचा अभ्यास ‘लुसी’ यान करणार आहे.
 • गुरु ग्रहाजवळील लघुग्रहांचा तेही एवढ्या संख्येने अभ्यास करणारी ही जगातील पहिलीच मोहिम असल्याचं नासाने म्हंटलं आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2021)

सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी चीनचे अवकाशवीर अवकाश स्थानकात :

 • चीनचे तीन अवकाशवीर शेनझाऊ 13 यानातून तियानहे या अवकाश स्थानकात गेले आहेत. शनिवारी त्यांनी अवकाशस्थानकात प्रवेश केला.
 • तर हे अवकाशवीर सहा महिने स्थानकात राहणार असून चीनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अवकाश वास्तव्य मोहीम आहे.
 • तसेच जे तीन अवकाशवीर स्थानकात गेले आहेत त्यात झाई झियांग, वँग यापिंग, ये गुआंगफू यांचा समावेश आहे.
 • वँग ही अवकाश स्थानकात जाणारी पहिली चिनी महिला आहे.
 • हे अवकाशवीर अवकाश औषधे व भौतिकशास्त्रातील प्रयोग करणार असून दोन ते तीन स्पेसवॉक करण्याचा त्यांचा विचार आहे.

द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक :

 • माजी कर्णधार राहुल द्रविड आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याची माहिती शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.
 • संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
 • तर त्यामुळे त्यांच्यानंतर भारताच्या माजी खेळाडूनेच प्रशिक्षकपद स्वीकारावे, अशी ‘बीसीसीआय’ची इच्छा होती.
 • द्रविड सध्या बेंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख असून गेल्या सहा वर्षांपासून भारत ‘अ’ आणि 19 वर्षांखालील संघांतील बहुतांश खेळाडूंना घडवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे.

दिनविशेष :

 • 17 ऑक्टोबरआंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
 • 17 ऑक्टोबर 1831 मध्ये मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
 • थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी 17 ऑक्टोबर 1888 मध्ये पेटंट दाखल केले.
 • पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये 17 ऑक्टोबर 1956 मध्ये सुरु झाले.
 • 17 ऑक्टोबर 1966 मध्ये बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
 • मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार 17 ऑक्टोबर 1979 मध्ये देण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑक्टोबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.