17 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

उत्तराखंडमधील पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत:
उत्तराखंडमधील पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत

17 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2020)

उत्तराखंडमधील पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत:

  • उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला असून आहे.
  • आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.
  • 1971 मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
  • रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी 38 ठिकाणे आहेत.
  • दक्षिण आशियात भारताची एकूण 38 पाणथळ ठिकाणे या यादीत आहेत.
  • जगात आतापर्यंत दोन हजार ठिकाणांना रामसर दर्जा मिळाला असून त्यांचे क्षेत्र 20 कोटी हेक्टरचे आहे.
  • भारताच्या 10 पाणथळ जागांना जानेवारीत रामसर दर्जा मिळाला असून त्यात महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर, पंजाबमधील बियास व नांगल, केशोपूर व मियानी, उत्तर प्रदेशातील नवाबगंज, पार्वती आग्रा, सामान, समासपूर,संदी, सरसाईनवार यांचा समावेश त्यात होता.
  • इतर ठिकाणे राजस्थान, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मणिपूर, गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश येथे आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2020)

रेमडेसिवीरसह चारही औषधे करोनावर गुणकारी नाहीत:

  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील करोना उपचारात वापरण्यात आलेल्या रेमडेसिवीरसह चार औषधे कोविड 19 उपचारात गुणकारी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.
  • त्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, लोपिनावीर/ रिटोनावीर तसेच इंटरफेरॉन या औषधांचाही समावेश आहे.
  • भारतात अजूनही रेमडेसिवीर हे प्रभावी औषध मानले जात असून त्याचा वापर उपचारात मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे.
  • इबोलावरचे रेमडेसिवीर हे औषध कोविड 19वर वापरण्यात येत होते त्याला अमेरिकेतही मान्यता मिळाली.

श्रीकांतचे आव्हान संपुष्टात – डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा:

  • भारताच्या किदम्बी श्रीकांतला डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला.
  • श्रीकांतला दुसऱ्या मानांकित चाओ चेनकडून 22-20, 13-21, 16-21 अशी हार पत्करावी लागली.
  • श्रीकांतच्या पराभवासोबत भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सात महिन्यानंतर या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला प्रारंभ झाला होता.
  • तसेच या वर्षांतील ही अखेरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा होती. 2017 मध्ये डेन्मार्क स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीकांतवरच भारताच्या सर्वाधिक अपेक्षा होत्या.
  • श्रीकांतने त्याप्रमाणे चेनविरुद्ध चुरशीचा रंगलेला पहिला गेम जिंकला. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये पाचवा मानांकित श्रीकांतला पराभव स्वीकारावा लागला.

दिनविशेष :

  • 17 ऑक्टोबरआंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
  • 17 ऑक्टोबर 1831 मध्ये मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
  • थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी 17 ऑक्टोबर 1888 मध्ये पेटंट दाखल केले.
  • पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये 17 ऑक्टोबर 1956 मध्ये सुरु झाले.
  • 17 ऑक्टोबर 1966 मध्ये बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार 17 ऑक्टोबर 1979 मध्ये देण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.