17 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 October 2018 Current Affairs In Marathi

17 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2018)

लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांना यंदाचा ‘मॅन बुकर’ :

 • इंग्रजी ग्रंथविश्वात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘मॅन बुकर’ पुरस्काराची लघुयादी 20 सप्टेंबर रोजी जाहीर झाली होती. तर पुरस्काराच्या विजेत्याचे नाव लंडनमध्ये जाहीर करण्यात आले.
 • उत्तर आर्यलडच्या 56 वर्षीय लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला आहे.
 • अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. तर त्यांना अ‍ॅना बर्न्‍स यांच्या ‘मिल्कमन’ या कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे.
 • ब्रिटिश कवी रॉबिन रॉबर्टसन, डेझी जॉन्सन, अमेरिकी लेखक निक डनासो, मायकेल ओदान्शी, अमेरिकी लेखिका रेचल कुशनेर आणि कॅनडियन लेखिका इसाय एडुग्यान यांना पिछाडीवर टाकत अ‍ॅना बर्न्‍स यांनी 50 हजार पौंडांचा हा पुरस्कार पटकावला.
 • तसेच अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी 2005 पासून दर दोन वर्षांनी दिला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार 2016 पासून वार्षिक झाला.
 • ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरी अथवा कथासंग्रहास हा पुरस्कार दिला जातो.
 • मूळ लेखकाइतकेच अनुवादकालाही महत्त्व देणाऱ्या या पुरस्काराची पन्नास हजार पौंड इतकी घसघशीत रक्कम लेखक-अनुवादकांमध्ये सम समान विभागून दिली जाते

सिक्कीम ठरलं जगातलं पहिलं Organic State :

 • सिक्कीम राज्याने भारताची मान जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा अभिमानाने उंच केली आहे.
 • संयुक्त राष्ट्रांनी सिक्कीम राज्याला जगातलं पहिलं Organic State हा बहुमान प्रदान केला आहे. तर राज्यभरात केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल उचलल्याने सिक्कीम राज्याला हा पुरस्कार दिला गेला आहे.
 • तसेच 25 विविध देशांमधून 51 राज्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला होता, ज्यामध्ये सिक्कीमने बाजी मारली आहे.
 • ब्राझील, डेन्मार्क आणि इक्वेडोर यांना रौप्य पदकाचा मान मिळाला आहे.
 • 15 ऑक्टोबर रोजी रोम मध्ये झालेल्या सोहळ्यात सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2018)

वैमानिकांनाही One Rank One Pay हवा :

 • वैमानिकांनाही वन रँक वन पे लागू करा अशी मागणी करत इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशनने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना एक पत्र लिहिलं आहे.
 • तर वन रँक वन पेन्शन लागू केल्यास एअर इंडियाची विदेशी चलनाची प्रचंड बचत होऊ शकते.
 • तसेच सध्या सरकारी विमान कंपनीला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलनास मुकावे लागत आहे. असं असतानाही वरीष्ठ पातळीवर आमच्या मागणीची दखल का घेतली जात नाही असा प्रश्न पायलट असोसिएशनने नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना विचारला आहे.
 • नागरी उड्डाण मंत्रालयाकडे यासंदर्भातला प्रस्ताव पाठवला होता. तरीही त्या प्रस्तावाला मंजुरी अद्यापही देण्यात आलेली एमओसीएने 2016 मध्ये वेतन आणि भत्ते यांच्याबाबत देण्यात आलेले निवेदन स्वीकारले नाही.

हॅथवे आणि डेन नेटवर्कमध्ये मुकेश अंबानींची एंट्री :

 • रिलायन्स इंडस्ट्रीज लवकरच देशातील दोन सर्वांत मोठ्या केबल कंपन्यांचे भाग खरेदी करु शकते. केबल आणि डेटा सर्व्हिस देणारी हॅथवे केबल्स कंपनी आणि डेन नेटवर्कमधील मोठा भाग खरेदी करणार आहे.
 • तर ब्रॉडबँड सेवा देणाऱ्या जियो फायबरला आणखी व्यापक करण्यासाठी कंपनीकडून हे पाऊल उचलले जाणार आहे.
 • रिलायन्स या दोन्ही कंपन्यांमधील 25-25 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. त्यानंतर रिलायन्सला कंपनीच्या संचालक मंडळातही जागा मिळेल. या वृत्तानंतर हॅथवे आणि डेन नेटवर्कच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

मराठमोळ्या प्रा. अभय अष्टेकरांना आइन्स्टाइन पुरस्कार :

 • गुरुत्वाकर्षण विज्ञानात चार दशकांपासून कार्यरत भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना आइन्स्टाइन पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • तर अमेरिकन फिजिकल सोसायटीने ही घोषणा केली आहे.
 • अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे अष्टेकर यांना 10 हजार डॉलर पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे.
 • महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात 1999 मध्ये झाली होती.
 • तसेच पेन्सेल्व्हिनिया स्टेट यूनिवर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशन अँड द कॉसमासचे निर्देशक असलेले अभय अष्टेकर यांना हा पुरस्कार सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत आणि क्वांटम फिजिक्समधील योगदानाबद्दल देण्यात येत आहे.

सूरज पनवारने भारताला मिळवून दिले अॅथलेटिक्समधले पहिले पदक :

 • अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या Youth Olympics स्पर्धेत भारताच्या खात्यात आज अॅथलेटिक्स क्रीडाप्रकारातील पहिले पदक जमा झाले आहे.
 • सूरज पनवार या धावपटूने भारताला 5 हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून दिली. त्याच्या या पराक्रमामुळे भारताच्या खात्यात आता 11 पदके झाली.
 • सुरजने 5 हजार मीटर चण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक कमावले. त्याने दोन टप्प्यात 20.35.87 आणि 20.23.30 अशा वेळा नोंदवल्या.
 • मात्र इक्वेडोरचा ऑस्कर पॅटीन याला मागे टाकणे त्याला शक्य झाले नाही.
 • दरम्यान, या विजयामुळे भारताने या स्पर्धेत एकूण 11 पदके मिळवली आहेत. यात 3 सुवर्ण आणि 8 रौप्य पदके आहेत.

दिनविशेष :

 • 17 ऑक्टोबर 1831 मध्ये मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
 • थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी 17 ऑक्टोबर 1888 मध्ये पेटंट दाखल केले.
 • पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये 17 ऑक्टोबर 1956 मध्ये सुरु झाले.
 • 17 ऑक्टोबर 1966 मध्ये बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
 • मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार 17 ऑक्टोबर 1979 मध्ये देण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑक्टोबर 2018)

You might also like
2 Comments
 1. Amol says

  Good

 2. GHORE CHAITRALI says

  GREAT

Leave A Reply

Your email address will not be published.