17 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 November 2018 Current Affairs In Marathi

17 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 नोव्हेंबर 2018)

किलोग्रॅमची विद्युतप्रवाहावर आधारित नवी व्याख्या:

 • एक किलोग्रॅम वजन मोजण्याची आजवरची पद्धत रद्द करून किलोग्रॅमची विद्युतप्रवाहावर आधारित नवी व्याख्या करण्यास जगभरातील शास्त्रज्ञांनी फ्रान्समधील व्हर्साय येथे पार पडलेल्या वजने आणि मापेविषयक परिषदेत मंजुरी दिली.
 • अतिसूक्ष्म किंवा खूप जास्त वजने मोजताना या नव्या व्याख्येचा फायदा होणार आहे. मात्र त्याने जगभरच्या बाजारांत आणि दैनंदिन व्यवहारांत वापरल्या जाणाऱ्या एक किलोच्या वजनावर काही परिणाम होणार नाही. आजवर आपण एक किलोचे जे वजन वापरत आलो आहोत ते 1889 साली फ्रान्समध्ये निश्चित करण्यात आले होते. wait
 • पॅरिसजवळील एका तिजोरीत हा एक किलोचा मूळ प्लॅटिनम आणि इरिडियम या धातूंच्या मिश्रणातून बनवलेला दंडगोल जतन करून ठेवला आहे. त्याला ग्रँड के असे म्हणतात. त्याच्या सहा प्रतिकृतीही तेथेच आहेत. त्याबरहुकूम सर्व देशांनी आपापली एक किलोची वजने तयार केली आहेत. काही वर्षांनी सर्व देशांना आपापली एक किलोची वजने त्या मूळ एक किलोच्या वजनाशी जुळवून तपासण्यासाठी पाठवावी लागतात.
 • तर शास्त्रज्ञांच्या मते देशोदेशींच्या वजनांत थोडाफार फरक पडू शकतो. तसेच फ्रान्समधील मूळ किलोच्या दंडगोलातही अनेक वर्षांत अल्पसा बदल होऊ शकतो.

चंद्राबाबूंकडून आंध्रप्रदेश मध्ये ‘सीबीआय बंदी’:

 • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयला राज्याचे दरवाजे बंद केले आहेत. दिल्ली पोलीस विशेष आस्थापना कायद्यानुसार सीबीआयला देण्यात आलेला सर्वसहमतीचा अधिकार मागे घेतला आहे. त्यामुळे सीबीआयला आता आंध्र प्रदेशमध्ये तपासासाठी जावयाचे असल्यास राज्य सरकारची अनुमती घ्यावी लागणार आहे.
 • दरम्यान, आपले हित जपण्यासाठी काँग्रेस, तेलुगु देशम पार्टी आणि तृणमूल काँग्रेसने भ्रष्ट पक्षांची महाआघाडी केली असल्याचा दावा भाजपने आंध्र प्रदेश सरकारने सीबीआयबाबत घेतलेल्या निर्णयानंतर केला आहे.
 • राज्य सरकारने हा अधिकार काढून घेतल्यानंतर आता छापे मारणे, शोध घेणे आणि तपास करण्याची कामे एसीबीकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा गोपनीय आदेश प्रधान सचिव (गृह) ए.आर. अनुराधा यांनी 8 नोव्हेंबर रोजी जारी केला, तो गोपनीय आदेश 16 नोव्हेंबर रोजी समोर आला.
 • चंद्राबाबू सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी समर्थन केले आहे. नायडूंच्या निर्णयामुळे केंद्र सरकारची कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतातील साखर अनुदानाला ऑस्ट्रेलियाचा आक्षेप:

 • जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असलेल्या भारतात साखर उद्योगाला दिल्या जात असलेल्या अनुदानांबद्दल जागतिक व्यापार संघटनेकडे (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूटीओ) कायदेशीर कारवाईसाठी दाद मागत असल्याचे ऑस्ट्रेलियाने जाहीर केले.
 • भारतातील अनुदानांमुळे जागतिक पातळीवर साखरेचे भाव मोठय़ा प्रमाणावर उतरत असून त्यामुळे ऑस्ट्रेलियातील ऊस उत्पादकांना फटका बसल्याचे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे आहे. Sugar
 • जागतिक व्यापार संघटनेच्या नियमावलीत परवानगी दिलेल्या शेतकरी साह्य़ाच्या मर्यादेपेक्षा भारतातील साखर उद्योगाची अनुदाने कितीतरी जास्त आहेत. त्यामुळे यंदा भारतातील ऊस उत्पादन सरासरी 20 दशलक्ष टनांवरून 35 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचल्याचा दावा ऑस्ट्रेलियाने केला आहे.
 • ऑस्ट्रेलियाच्या या कृतीला कायद्याच्या परिभाषेत ‘काऊंटर नोटिफिकेशन‘ असे म्हणतात. याबाबत भारताकडे सातत्याने थेट गाऱ्हाणे मांडल्यानंतर ऑस्ट्रेलियाने हे पाऊल उचलल्याचे आहे.
 • तर जागतिक व्यापार संघटनेच्या कृषिविषयक समितीच्या या महिन्यात होत असलेल्या बैठकीत सर्वप्रथम या विषयावर चर्चा होईल, असे मानले जाते.

मिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू:

 • मिताली राजने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 2283 धावा केल्या आहेत.
 • भारताकडून ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा मितालीच्या नावावर आहे.
 • मिताली राजने यावेळी रोहित शर्मा (2207) आणि विराट कोहली (2102) यांना पिछाडीवर टाकले आहे.
 • तसेच मितालीनंतर भारताची ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर 1827 धावा आहेत.

पश्चिम बंगालच्या नामांतरास बांगलादेशचा विरोध:

 • पश्‍चिम बंगालचेबंगाल‘ असे नामकरण करण्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे पाठविला असून, यावर केंद्राने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने खुद्द ममता सरकारवर संतापल्या आहेत. ममतांनी या प्रकरणी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहीत सरकारच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 • राज्याच्या नामांतराबाबतचा प्रस्ताव राज्य विधिमंडळाने संमत करून तो केंद्र सरकारकडे पाठविला असून, केंद्र सरकारने यावर कोणतेही उत्तर दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत गृहमंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी यावर आम्ही परराष्ट्र मंत्रालयाकडून मत मागविले असल्याचे स्पष्ट केले.
 • परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भाने गृहमंत्रालयालाच एक सविस्तर पत्र लिहिले असून, यामध्ये पश्‍चिम बंगालचे ‘बांगला’ असे नामांतर करण्यास बांगलादेशानेच विरोध केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
 • जगभरात बांगलादेशालाच ‘बांगला’ असे संबोधले जाते, त्यामुळे पश्‍चिम बंगालने हे नाव वापरू नये, असे त्या देशाचे म्हणणे आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याने ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
 • पण, केंद्राकडून याबाबत पश्‍चिम बंगाल सरकारशी अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. स्वत: ममता यांनी मात्र बांगलादेशचा हा दावा फेटाळून लावला आहे.

दिनविशेष:

 • 17 नोव्हेंबर 2012 हा दिवस शिवसेनेचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संपादक माननीय “बाळासाहेब ठाकरे” यांचा स्मृतीदिन आहे.
 • भारतीय राजकारणी व लेखक लाला लजपतराय 17 नोव्हेंबर 1928 हा स्मृतीदिन आहे.
 • 17 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक पूर्व परिपक्वता दिन‘ तसेच ‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन‘ आहे.
 • ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन सन 1831 मध्ये इक्‍वेडोरव्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.
 • सन 1869 मध्ये 17 नोव्हेंबर रोजी भूमध्य समुद्रलाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र 10 वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
 • तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात सन 1932 मध्ये झाली होती.
 • अमेरिकेने सन 1933 मध्ये सोविएत युनियनला मान्यता दिली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.