17 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

पर्यटन व्हिसा
पर्यटन व्हिसा

17 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 मार्च 2022)

केंद्र सरकारकडून पर्यटन व्हिसा पूर्ववत :

  • करोनाकाळात बंद करण्यात आलेला ई-पर्यटन व्हिसा केंद्र सरकारने पूर्ववत केला आहे.
  • केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ 156 देशांतील नागरिकांना होणार आहे.
  • तसेच सर्व देशांतील नागरिकांसाठी देण्यात येणारा नियमित पर्यटन व्हिसाही आता मिळणार असून त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली.
  • तर अमेरिका आणि जपान या देशांतील नागरिकांसाठी देण्यात येणारा 10 वर्षांसाठीचा नियमित पर्यटन व्हिसाही पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • करोना रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने मार्च 2020 पासून केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी असणारा पर्यटन व्हिसा देणे बंद केले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मार्च 2022)

उत्तर कोरियाने डागलं ‘मॉन्स्टर मिसाईल’:

  • उत्तर कोरियाने आज एक अज्ञात क्षेपणास्त्र डागल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या लष्कराने दिली. मात्र लगेचच हे क्षेपणास्त्र निकामी ठरलं आहे.
  • तर याबद्दल दक्षिण कोरियाच्या लष्कराने एक निवेदनही जारी केलं आहे.
  • तसेच या निवेदनात म्हटलं आहे की उत्तर कोरियाने सुनान भागातून एक अज्ञात क्षेपणास्त्र डागलं मात्र लाँच झाल्याझाल्याच हे क्षेपणास्त्र अयशस्वी झालं.
  • उत्तर कोरियाने बॅलेस्टिक मिसाईल डागल्याचं एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं.
  • उत्तर कोरियाने या वर्षात सात मिसाईल चाचण्या केल्या आहेत. तर दोन उपग्रह असल्याचं सांगितलं आहे.

ऑलिम्पियाड बुद्धिबळचे भारताला यजमानपद :

  • रशिया-युक्रेन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर रशियाबाहेर हलवण्यात आलेल्या 44व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान भारताला लाभणार आहे.
  • यंदा ही प्रतिष्ठेची स्पर्धा जुलै-ऑगस्ट या कालावधीत चेन्नईमध्ये रंगणार असल्याची घोषणा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली.
  • ‘एआयसीएफ’ने ऑलिम्पियाड स्पर्धेच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ ‘फिडे’ला 10 मिलियन अमेरिकन डॉलर देऊ करण्याची तयारी दर्शवली.
  • ऑलिम्पियाड या दर दोन वर्षांनी होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत जवळपास 190 देशांचे संघ सहभागी होतात.
  • तर यंदा ही स्पर्धा 26 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात येणार होती.

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धात भारताच्या सायना, सिंधूची विजयी सलामी :

  • आघाडीच्या भारतीय बॅडिमटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे.
  • बुधवारी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीच्या लढतीत सायनाने स्पेनच्या बीएट्रीज कोरालेसला सरळ गेममध्ये पराभूत केले.
  • सिंधूने देखील चीनच्या वांग झी यीविरुद्ध विजय नोंदवला. सायनाने स्पॅनिश प्रतिस्पर्धीला पहिल्या फेरीत 38 मिनिटे चाललेल्या लढतीत 21-17, 21-19 असे पराभूत केले.

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धात भारताचा दुसरा पराभव :

  • फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे गतविजेत्या इंग्लंडकडून बुधवारी ‘आयसीसी’ महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला पराभव पत्करावा लागला.
  • सलग तीन सामने गमावलेल्या इंग्लंडने हा सामना चार गडी आणि 112 चेंडू राखून जिंकत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.
  • भारतीय संघाच्या कामगिरीत पुन्हा एकदा सातत्याचा अभाव पाहायला मिळाला.
  • तर या लढतीतील पराभवानंतरही भारतीय संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान राखले.
  • भारतीय संघाचे चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह चार गुण आहेत.

दिनविशेष :

  • 17 मार्च 1882 हा दिवस आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर’ यांचा स्मृतीदिन आहे.
  • भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म 17 मार्च 1909 रोजी झाला.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म 17 मार्च 1927 रोजी झाला.
  • 17 मार्च 1969 रोजी ‘गोल्ड मायर’ ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
  • मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला 17 मार्च 1997 मध्ये सुरवात झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मार्च 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.