17 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

रंजन गोगोई
रंजन गोगोई

17 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 मार्च 2020)

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेसाठी निवड :

  • माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेसाठी निवड झाली आहे.
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. राष्ट्रपती नामनिर्देशीत खासदार म्हणून रंजन गोगोई यांची निवड झाली आहे.
  • तर राज्यसभेवर 12 सदस्यांची निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.
  • तसेच यातील एका सदस्याचा कार्यकाळ संपला असल्याने रिक्त झालेल्या जागेवर भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची निवड करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने सोमवारी अधिसूचना काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
  • अगोदर सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी देशाचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती. नंतर ते 17 नोव्हेंबर 2019 रोजी निवृत्त झाले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मार्च 2020)

JNUतल्या रोडचं नामकरण केलं सावरकर मार्ग :

  • जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया(JNU Campus)च्या रस्त्याचं नाव बदलण्यात आलं आहे. JNUतल्या या रोडचं नाव आता विनायक दामोदर सावरकर रोड करण्यात आलं आहे.
  • तर सावरकर हिंदुत्वावादी विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात. जेएनयू छात्रसंघाची अध्यक्षा आयशी घोषनं याचा निषेध नोंदवला आहे. जेएनयू कार्यकारी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.
  • तसेच गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला या रस्त्याचं नाव वी. डी. सावरकर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचदरम्यान हॉस्टेलमधल्या फीवाढीचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
  • जेएनयू रोडला गुरु रविदास मार्ग, राणी अब्बाका मार्ग, अब्दुल हामिद मार्ग, महर्षि वाल्मिकी मार्ग, राणी झांसी मार्ग, वीर शिवाजी मार्ग, महाराणा प्रताप मार्ग आणि सरदार पटेल मार्ग अशा नावांचाही पर्याय देण्यात आला होता. या सर्व नावांवर विचारविनिमय केल्यानंतर जेएनयू कार्यकारी परिषदेनं वी. डी. सावरकर मार्गाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

2026च्या आशियाई स्पर्धेत खो-खोचा समावेश :

  • खो-खो या महाराष्ट्रातील पारंपरिक खेळाचा 2026मध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश होण्याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आशावादी आहे.
  • तर खो-खो हा खेळ सध्या जगभरात 25 देशांमध्ये खेळला जातो.
  • आशिया ऑलिम्पिक समितीने जकार्ता येथे 2018मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खो-खो खेळाला मान्यता दिली होती. या स्थितीत 2026मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत खो-खो खेळाचा समावेश होईल, असे ‘आयओए’चे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले.
  • 2022मध्ये चीनमधील हॅँगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होत आहे. त्या स्पर्धेतही खो-खो खेळाचा प्रात्यक्षिक स्वरूपात सहभागाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन :

  • ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. वय 88 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • चल रे लक्ष्या मुंबईला, खट्याळ सासू नाठाळ सून, खरं कधी बोलू नये, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, रंगत संगत, थरथराट इत्यादी चित्रपटातून त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत जयराम कुलकर्णी यांनी पोलिसांच्या भूमिका साकारल्या.

सुप्रीम कोर्टामध्ये होणार आता व्हिडीओ कॉन्फरन्सने सुनावणी :

  • कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कामकाज बंद ठेवणे शक्य नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी येत्या काही दिवसांत ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ने घेण्याचे ठरविले आहे.
  • तर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
  • वकील संघटनांशी चर्चा व तांत्रिक सज्जता करून लवकरच ‘व्हिडीओ’ सुनावणी सुरू होईल. नवी प्रकरणे ‘ई फायलिंग’ पद्धतीने दाखल करण्याची सोयही करण्यात येणार आहे. ही सेवा 24 तास सुरू राहील.
  • तसेच न्या. चंद्रचूड न्यायालयाच्या ‘ई कमिटी’चे प्रमुख आहेत. ‘व्हिडिओ सुनावणी’ घेणे शक्य आहे याची त्यांनी ग्वाही दिली. दोन्ही पक्षकारांचे वकील स्वतंत्र खोल्यांमध्ये व न्यायाधीश कोर्टात किंवा त्यांच्या चेंबरमध्ये बसतील. या तिघांमध्ये ‘व्हिडीओ लिंक’ स्थापन केली जाईल व त्या माध्यमातून सुनावणी होईल. माध्यम प्रतिनिधींनाही वेगळ्या खोलीत बसून ही सुनावणी पाहता/ऐकता येईल.

बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे :

  • शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या समितीचे अध्यक्ष म्हणून राज्य शासनाने सोमवारी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली.
  • तर उद्योग मंत्री सुभाष देसाई हे या न्यासाचे सदस्य सचिव असतील. सदस्य म्हणून सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ शशी प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • याशिवाय राज्याचे मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त हे न्यासाचे पदसिद्ध सदस्य असतील. सदस्यांची चार पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. अध्यक्षांसह सर्व सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.
  • तसेच याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या न्यासाचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी 25 नोव्हेंबर 2019 रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

दिनविशेष :

  • 17 मार्च 1882 हा दिवस आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर’ यांचा स्मृतीदिन आहे.
  • भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म 17 मार्च 1909 रोजी झाला.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म 17 मार्च 1927 रोजी झाला.
  • 17 मार्च 1969 रोजी ‘गोल्ड मायर’ ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
  • मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला 17 मार्च 1997 मध्ये सुरवात झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मार्च 2020)

You might also like
1 Comment
  1. Rupesh shilawat says

    जॉब

Leave A Reply

Your email address will not be published.