17 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs
17 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 जून 2022)
अमेरिकेत पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी मंजुरीची शक्यता :
- अमेरिकेत पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे.
- अन्न आणि औषध प्रशासनाच्या लसीकरण सल्लागारांनी यासाठी फायझर आणि मॉडर्ना यांच्या लशींना त्यासाठी संमती दिली आहे.
- पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लशीच्या एका मात्रेचा परिणाम हा करोनाचा धोका कमी करतो, असे मत तज्ज्ञांनी सर्वानुमते व्यक्त केले.
- तर या देशात लसीकरणासाठी मंजुरी मिळवणारा हा अंतिम गट आहे.
- संबंधित सर्व शासकीय विभागांनी मंजुरी दिली तर पुढील आठवडय़ात हे लसीकरण सुरू होईल.
Must Read (नक्की वाचा):
चार वर्षांनी निवृत्त झालेल्यांपैकी 75 टक्के अग्निवीरांना सरकारी नोकरी देणार :
- केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर विरोधी पक्ष या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
- मात्र असे असताना केंद्रासह अनेक राज्य सरकारांनी अग्निपथ योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या अग्नीवीरांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये अग्निवीर सैनिकांना प्राधान्य दिले जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
- तर या योजनसंदर्भात आता हरिणाया सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
- लष्कर, नौदल आणि हवाई दलात विशेष ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत अल्प-मुदतीच्या करारावर भरती झालेल्या ‘अग्नीवीर’ सैनिकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये प्राधान्य मिळेल.
- हरियाणा सरकारनेही अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे.
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी जाहीर केले की उत्तर प्रदेश सरकार पोलीस आणि संबंधित सेवांमध्ये भरतीसाठी ‘अग्निवीरांना’ प्राधान्य देईल.
केंद्राचा 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी :
- केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचार सेवांसाठी 5 जी स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी दिली आहे.
- यासोबतच या टेलिकॉम स्पेक्ट्रमसाठी आगाऊ रक्कम (अॅडव्हान्स पेमेंट) भरण्याची अटही रद्द करण्यात आली आहे.
- केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लिलावात यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला 20 हफ्त्यांमध्ये रक्कम भरण्याचा अवधी दिला जाईल.
- जुलै अखेरपर्यंत हा लिलाव होणार असून संबंधित करार हे 20 वर्षांच्या वैधतेसह एकूण 72097.75 मेगाहट्झ स्पेक्ट्रमसाठी असतील असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
‘आयसीसी’च्या विशेष पंच श्रेणीत मेनन यांना पुन्हा स्थान :
- भारताच्या नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विशेष पंच श्रेणीतील (एलिट पॅनल) स्थान कायम राखले आहे.
- तर या महिन्यात श्रीलंकेमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत त्यांना प्रथमच तटस्थ पंचांची भूमिका पार पाडण्याची संधी मिळेल.
- इंदूरचे रहिवासी असलेले मेनन हे ‘आयसीसी’च्या 11 सदस्यीय विशेष पंच श्रेणीत स्थान मिळालेले एकमेव भारतीय आहेत.
- तर गेल्या तीन-चार वर्षांपासून भारताचे आघाडीचे पंच असलेले मेनन यांना ‘आयसीसी’ने नुकतीच एका वर्षांची करारवाढ दिली आहे.
- तसेच या महिन्याच्या अखेरीस त्यांना तटस्थ पंच म्हणून पदार्पणाची संधी मिळणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
नीरज चोप्राने मोडला राष्ट्रीय विक्रम :
- ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरी करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एका नव्या विक्रमाला गवसणी घातलीय.
- फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स 2022 (Paavo Nurmi Games 2022) मध्ये नीरजने 89.30 मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केलाय.
- तर यापूर्वीचा विक्रमही नीरजच्याच नावे होते.
- तसेच मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये 88.07 मीटर दूर भाला फेकला होता.
- तर 7 ऑगस्ट 2021 रोजी त्याने टोक्यो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावलं होतं.
- या कामगिरीमुळे नीरज हा अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक पटकावणारा पहिला खेळाडू ठरलेला.
- टोक्यो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असून त्याने यामध्ये रौप्य पदकाची कमाई केलीय.
- तर या स्पर्धेमध्ये फिनलॅण्डच्या ऑलिव्हर हीलॅण्डरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
सुनील छेत्री ठरला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू :
- भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.
- सुनील छेत्रीने मंगळवारी 14 जूनला हाँगकाँगविरोधात एएफसी आशियाई कपच्या पात्रता सामन्यात हा रेकॉर्ड केला.
- तर या सामन्यात सुनील छेत्रीने 84 वा गोल केला.
- यासोबतच सुनील छेत्रीने रिअल मॅड्रिडचे दिग्गज आणि हंगेरीचे फुटबॉलर फेरेंक यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.
- सुनील छेत्रीने याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे पेले यांना मागे टाकलं आहे.
- सुनील छेत्री सध्या सक्रीय असणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी फक्त रोनाल्डो आणि मेस्सीच्या मागे असून यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत क्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे.
आयसीसीने जाहीर केली टी 20 क्रमवारी :
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेमध्ये भारतीय सलामीवीर ईशान किशनने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे.
- तर या कामगिरीच्या बळावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी ट्वेंटी क्रमवारीत 68 स्थानांची झेप घेतली आहे.
- आयसीसीच्या टी ट्वेंटी फलंदाजी क्रमवारीत ईशान सध्या सातव्या स्थानावर पोहचला आहे.
- पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा टी 20 आणि एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
- पहिल्या 10 फलंदाजांमध्ये किशन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल 14व्या स्थानावर आहे.
- कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांची प्रत्येकी एका स्थानाने घसरण झाली असून ते अनुक्रमे 16व्या आणि 17व्या स्थानावर आहेत.
दिनविशेष :
- 1885 मध्ये न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.
- आइसलँडने (डेन्मार्कपासून) 1944 मध्ये स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
- अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे 1963 मध्ये कायदेबाह्य ठरवले.
- 1967 मध्ये चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
- 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
- 1297 मध्ये ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला.
- राजमाता जिजाबाई यांचे निधन 1674 मध्ये झाले.