17 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
17 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 जुलै 2018)
बालगंधर्व यांचे चरित्र जागतिक पातळीवर जाणार :
- ‘सुधेसारिखा स्वाद स्वर्गीय गाणे‘ असे वर्णन होणारे मराठी रंगभूमीचे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांचे जीवनचरित्र आता जागतिक नाट्यरसिकांपर्यंत पोचणार आहे.
- मॉरिशसमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक हिंदी साहित्य परिषदेतही याचे प्रकाशन करावे, असा आग्रह भारत सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी धरला आहे.
- अभिराम भडकमकर यांनी लिहिलेल्या ‘बालगंधर्व‘ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन दिल्लीत झाले. त्या वेळी सहस्रबुद्धे यांनी या प्रस्तावित प्रकाशनाचे जाहीर निमंत्रणच भडकमकर यांना दिले.
- सहस्रबुद्धे म्हणाले, की रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’नंतर भारतीय साहित्यकृतीला नोबेल मिळाले नाही यामागे मराठी साहित्य तेवढ्या मोठ्या प्रमाणात इंग्रजी व जागतिक भाषांत अनुवादित होत नाही हे एक ठळक कारण असावे. अनुवादक हा निव्वळ भाषांतरकारापेक्षा त्या विषयांची, त्या भाषेची व इतिहासाची सांस्कृतिक ओळखही करून देणारा असावा.
Must Read (नक्की वाचा):
युवकांना लष्करी प्रशिक्षणाची नवी योजना :
- शिस्तप्रिय आणि राष्ट्रवादी युवकांची भक्कम फळी उभारण्यासाठी दर वर्षी 10 लाख तरुण महिला-पुरुषांशी संपर्क साधून त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याबाबतच्या योजनेवर सरकारने चर्चा केली आहे.
- राष्ट्रीय युवक सक्षमीकरण योजना अथवा एन-यस असे या योजनेचे नाव आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे.
- तसेच त्यामध्ये 12 महिन्यांच्या प्रशिक्षणसाठी ठरलेले पाठय़वेतन देण्यात येणार असून संरक्षण, निमलष्करी दल आणि पोलीस दल यामध्ये नोकरी मिळण्यासाठी एन-यस आवश्यक पात्रता ठरविण्यात येणार आहे.
- पंतप्रधानांच्या कार्यालयाने गेल्या आठवडय़ात प्रस्तावित योजनेबाबत बैठक बोलाविली होती आणि त्याला संरक्षण, युवक व्यवहार आणि मानव संसाधन विकास मंत्रालयातील प्रतिनिधी हजर होते, संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याने या वेळी या विषयाबाबत सादरीकरण केले. काही अधिकाऱ्यांनी एन-यसबाबत विशिष्ट मते नोंदविली त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले एनसीसी अधिक सक्षम करण्याची सूचनाही करण्यात आली.
चंदा कोचर यांच्याविरुद्ध दुसरी चौकशी सुरू :
- आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रबंध संचालक व सीईओ चंदा कोचर यांच्याविरुद्ध बँकेच्या संचालक मंडळाने आणखी एक चौकशी सुरू केली आहे. कोचर यांच्याविरुद्ध व्हिडिओकॉन समूहाशी त्यांचे संबंध होते काय? यासंबंधीची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी.एन. श्रीकृष्ण करीत आहेत.
- या दुसऱ्या चौकशीची जबाबदारी आयसीआयसीआय बँकेने पनाग अँड बाबू या कायदेतज्ज्ञ कंपनीकडे सोपविली आहे. न्या. श्रीकृष्ण यांच्याव्यतिरिक्त ही स्वतंत्र चौकशी होणार आहे. या चौकशीत कोचर यांनी त्यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात बँकेचा नफा 1.30 अब्ज डॉलरने फुगवून दाखवल्याचा व त्यासाठी 31 कंपन्यांचे बुडीत कर्जासाठी ताळेबंदात तरतूद करण्यास दिरंगाई केल्याचे आरोप आहेत.
- आयसीआयसीआय बँकेकडे एका जागरूक ग्राहकाने यासंबंधी तक्रार केल्याने बँकेने कोचर यांच्याविरुद्ध ही चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती बँकेतील सूत्रांनी दिली. कोचर यांच्याविरुद्ध ही तिसरी तक्रार आहे. बँकेने या तक्रारीची माहिती रिझर्व्ह बँकेला देऊन बाहेरील कायदेतज्ज्ञ कंपनी पनाग अँड बाबू यांची नेमणूक केल्याचे कळवले आहे, अशीही माहिती या सूत्रांनी दिली.
केंद्राच्या आयुषमान योजनेत महाराष्ट्र, राजस्थानही सहभागी :
- ‘मोदीकेअर‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केंद्राच्या आयुषमान योजनेत सहभागी होण्यास सुरुवातीला तयार नसणा-या महाराष्ट्र आणि राजस्थाननेही आता सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे.
- पूर्णपणे केंद्र सरकारकडून निधी देण्यात येत असलेल्या या आरोग्य विमा योजनेत ही दोन राज्ये सहभागी झाल्यानंतर आता मोदी केअरमध्ये सहभागी राज्यांची संख्या 27 वर पोहोचली आहे.
- केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि राजस्थान यांनी या योजनेत सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे. हे दोन्ही राज्ये पूर्वीपासूनच आपल्या विमा योजनेंतर्गत आरोग्य विम्याचे कवच आणि अन्य लाभ देत आहेत.
- या राज्यांची अशी इच्छा होती की, त्यांच्या योजना केंद्राच्या पूर्ण अनुदानित योजनेत समाविष्ट कराव्यात. याबाबत दीर्घ चर्चेनंतर हे राज्ये केंद्राची योजना लागू करण्याबाबत सहमत झाले आहेत.
वाफोलीत मेगा अल्ट्रा महत्त्वाकांक्षी प्रकल्प :
- अनेक प्रकल्पांना विरोध झाल्यानंतर सिंधुदुर्गात रोजगार येण्याच्या दृष्टीने स्ट्रीमकास्ट कंपनीचा डेटा सेंटर असलेला मेगा अल्ट्रा प्रकल्प बांदा-वाफोली येथे येत असून, हा प्रकल्प बावीसशे कोटी रुपयांचा असून, जिल्ह्यातील पहिला रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन 18 जुलैला होणार आहे. डेटा सेंटरच्या माध्यमातून कुशल-अकुशल असे मिळून पंधराशे लोकांना यातून रोजगार उपल्बध होणार आहे.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार नाही. येथील मुलांनी नोकरी-व्यवसायासाठी कुठे जायचे असे अनेक प्रश्न सतत निर्माण होत होते. नाणार प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर रोजगाराच्याबाबत राजकीय व्यक्तींनी ठोस भूमिका घ्यावी, अशीच सर्व क्षेत्रातून मागणी होत होती. त्यातूनच पहिल्या रोजगाराचे साधन बांदा-वाफोली येथे उभे राहत आहे.
- आयटी विभागाशी संबंधित असा भारतातील पहिला डेटा सेंटर हा स्ट्रीमकास्टच्या माध्यमातून उभा राहत आहे. यातून तब्बल पंधराशे युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हा बावीसशे कोटी खर्च करून मेगा अल्ट्रा प्रकल्प उभा राहत आहे.
- सिंधुदुर्गमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक छोटी-छोटी डेटा सेंटरही उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन 18 जुलैला होत असून. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या कंपनीला प्राप्त झाल्या आहेत.
भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपदी रमेश पोवार :
- भारताचे माजी ऑफस्पिनर रमेश पोवार यांची राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. जोपर्यंत तुषार आरोठे यांचा उपयुक्त पर्याय शोधला जात नाही तोपर्यंत रमेश पोवार हे संघासोबत असतील.
- सीनिअर खेळाडूंसोबतच्या मतभेदानंतर आरोठे यांना राजीनामा देण्यास भाग पडले होते. सीनिअर खेळाडू बडोद्याच्या या माजी अष्टपैलू खेळाडूच्या प्रशिक्षण देण्याच्या पद्धतीवर नाराज होते.
- 25 जुलैपासून भारतीय महिला संघाच्या शिबिरास सुरुवात होणार असून, या शिबिरात पोवार सहभागी होतील. बीसीसीआयने याआधीच पूर्णवेळ प्रशिक्षकासाठी अर्ज मागितले आहेत आणि अर्जासाठी अखेरची तारीख 20 जुलै आहे.
दिनविशेष :
- 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन म्हणून पाळला जातो.
- सन 1802 मध्ये मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
- दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म सन 1930 मध्ये 17 जुलै रोजी झाला.
- वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे 17 जुलै 1955 रोजी डिस्नेलँड सुरू केले.
- कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म 17 जुलै 1923 रोजी झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा