17 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 December 2019 Current Affairs
17 December 2019 Current Affairs

17 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2019)

मराठमोळे मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख:

 • नव्या वर्षात ले.ज. मनोज नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांनी सप्टेंबर महिन्यातच उपलष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
 • तर आता लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत.
 • तसेच ले. ज. मनोज मुकुंद नरवणे हे लष्करप्रमुख या पदाचा पदभार बिपीन रावत यांच्या सेवा निवृत्तीनंतर स्वीकारणार आहेत. महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
 • नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
 • तर ते देशाचे नवे लष्करप्रमुख असतील असंही त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणजे मनोज नरवणे हे होय.
 • 1980 मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या 7व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
 • तसेच या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवलं होत. नरवणे हे देशाचे 28 वे लष्कर प्रमुख असतील.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2019)

NEFTद्वारे आता कधीही पैसे ट्रान्सफर करता येणार :

 • देशभरात 16 डिसेंबर पासून दोन महत्वाचे बदल लागू झाले आहेत. यामध्ये आरबीआयद्वारे ऑनलाइन बँकिंग ट्रान्जॅक्शन आणि ट्रायद्वारे मोबाईल नंबर पोर्ट करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
 • तर त्यानुसार, ऑनलाइन पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या (एनईएफटी) सुविधेचा 24 तास लाभ घेता येणार आहे.
 • तसेच आजपासूनच मोबाईल क्रमांक कायम ठेऊन सर्व्हिस प्रोव्हायडर बदलण्याच्या म्हणजेच नंबर पोर्टेबिलिटी सुविधा अधिक सोपी करण्यात आली आहे.
 • एनइएफटी सुविधा आठवड्यातील सर्व दिवस कोणत्याही वेळेत (24/7) वापरता येणार आहे. यापूर्वी या सेवेचा लाभ 24 तास मिळत नव्हता.

विराट कोहली फलंदाजीत अव्वल स्थानी कायम :

 • भारतीय कर्णधार विराट कोहली सोमवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे.
 • तर त्याचवेळी, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.
 • कोहली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथपेक्षा 17 गुणांनी आघाडीवर आहे.
 • तसेच चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे अनुक्रमे चौथ्या व सहाव्या स्थानी कायम आहेत.
 • ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनची क्रमवारीत आगेकूच कायम आहे. न्यूझीलंडविरुद्ध पर्थ कसोटीत 143 व 50 धावांची शानदार खेळी करणारा लाबुशेन तीन स्थानांच्या प्रगतीसह पाचव्या स्थानी दाखल झाला आहे.
 • क्रमवारीत त्याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पिछाडीवर सोडले व तो स्मिथनंतर दुसरा सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे.

इंग्लंडच्या सर्वात यशस्वी फिरकीपटूची निवृत्ती :

 • इंग्लंडची सर्वात यशस्वी फिरकीपटून लॉरा मार्शनं सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
 • 33 वर्षीय मार्शनं 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 13 वर्षांच्या कारकिर्दीत तिनं 217 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेत इंग्लंड महिला क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी फिरकीपटूचा मान मिळवला.
 • तर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या इंग्लंडच्या गोलंदाजांत ती तिसऱ्या स्थानावर आहे.
 • 2009च्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत तिनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. तिच्या नावावर तीन वर्ल्ड कप आहेत.

SIM कार्डशी संबंधित नियम :

 • टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(TRAI)नं मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी(TRAI) प्रक्रियेशी संबंधित सार्वजनिक नोटीस जारी केली आहे.
 • TRAIनुसार, 16 डिसेंबर म्हणजे आजपासून मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (Mobile Number Portability)ची प्रक्रिया आणखी सहजसोपी झाली आहे.
 • तर आता कोणताही युजर्स आपला ऑपरेटर सहजगत्या बदलू शकणार आहे. आतापर्यंत मोबाइल क्रमांक दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी एका आठवडा ते 15 दिवसांचा अवधी लागायचा, परंतु नव्या नियमांनंतर केवळ तीन दिवसांचा वेळ लागेल.
 • ट्रायनं ही प्रक्रिया आणखी सोपी केली असून, यूनिक पोर्टिंग कोड (UPC)ची फक्त अट ठेवण्यात आली आहे.
 • नव्या नियमानुसार, सर्व्हिस एरियाच्या आत जर कोणताही नंबर पोर्ट करण्याची मागणी आल्यास ती 3 कामकाजाच्या दिवसांत पूर्ण होणार आहे. तसेच एका सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी 5 कामकाजांच्या दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात ट्रायनं नवं परिपत्रक जारी केलं आहे.
  कॉर्पोरेट मोबाइल कनेक्शनच्या मर्यादेत कोणताही बदल नाही.

दिनविशेष:

 • देशभक्त, काँग्रेसचे 16वे अध्यक्ष ‘लालमोहन घोष‘ यांचा जन्म 17 डिसेंबर 1849 रोजी कलकत्ता येथे झाला होता.
 • भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी सन 1928 मध्ये ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स सोंडर्स याची लाहोर येथे हत्या केली होती.
 • जयंतीलाल छोटालाल शहा यांनी सन 1970 मध्ये भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
 • 2016 मध्ये शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 डिसेंबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.