17 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 December 2018 Current Affairs In Marathi

17 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2018)

‘बीडब्ल्यूएफ’ ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ‘पी.व्ही. सिंधू’:

 • BWF World Tour Finals गुआंगझू येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूने स्पर्धेच्या अंतिम फेरीत नोझुमी ओकुहारा हिला पराभूत करत या स्पर्धेचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावले. तिने ओकुहारा हिला 21-19, 21-17 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि ऐतिहासिक विजय मिळवलाp v sindhu
 • सिंधूचा हा कारकिर्दीतील 300वा विजय ठरला. सलग सात वेळा पराभव स्वीकरल्यानांतर अखेर सिंधूने विजेतेपद पटकावले. या वर्षात सिंधूने एकही विजेतेपद जिंकले नव्हते. त्यामुळे हे विजेतेपद पटकावून तिने हंगामाचा शेवट गोड केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2018)

वारसा स्थळांचा आभासी प्रवास; रेल्वे मंत्रालयाची योजना:

 • देशातील प्रसिद्ध वारसा स्थळांचा प्रवाशांना आभासी प्रवास घडवून आणण्याची रेल्वेने योजना आखली असून, त्यानुसार प्रवासादरम्यान किंवा शाळेतील वर्गात बसल्या ठिकाणी स्थळदर्शन घडवून आणण्यात येणार आहे. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी गुगलचे तंत्रज्ञान मदत करणार असून, थ्रीडी चष्म्याची आवश्‍यकता लागणार आहे.
 • राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय पाहण्यासाठी किंवा निसर्गसुंदर काल्का-सिमला रेल्वे मार्ग पाहण्यासाठी दिल्ली किंवा सिमल्याला जाण्याची गरज भासणार नाही. कारण रेल्वे खात्याच्या मदतीने आभासी तंत्राच्या साह्याने वारसा आणि ऐतिहासिक रेल्वे स्थानके, रेल्वे पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
 • तर या सुविधेमुळे रेल्वेत प्रवास करणारे प्रवासी किंवा दुर्गम भागातील विद्यार्थी वर्गात बसून आकर्षित करणाऱ्या ठिकाणांना आभासी पद्धतीने पाहू शकणार आहेत. यासाठी रेल्वेने गुगल कंपनीशी करार आहे.
 • तसेच यानुसार प्रमुख स्थळ थ्रीडी स्वरूपात पाहणे शक्‍य होणार आहे. आभासी प्रवासासाठी प्रवाशांना विशेष चष्मा दिला जाणार आहे. या चष्म्यामुळे प्रवासी संबंधित ठिकाणी न जाता तेथे गेल्याचा आनंद घेता येणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात ही विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय शाळांना मिळणार अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव:

 • महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) संलग्नित होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे संबोधण्यात येणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा निर्माण करणार आहेत. atal bihari vajpayee
 • राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासनाने 100 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. त्यासाठी मागील वर्षी निकषही निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात या शाळांच्या संलग्नतेसाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे.
 • तसेच या मंडळाला स्वतंत्र अधिकार असतील. त्यानुसार संलग्न शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शाळांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे नामकरण केले जाणार आहे, याबाबतचा शासननिर्णय काढला आहे.
 • एमआयईबी‘ हे मंडळ नवीन असल्याने सुरुवातीची दहा वर्षे शासनाकडून प्रतिवर्ष 10 कोटी रुपयांचा निधी अनुदान स्वरूपात मंडळाला दिला जाणार आहे. मंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यानंतर मंडळ त्यांचे स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करेल. त्यानंतर हे अनुदान बंद करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

पॅरिस करारासाठी हवामान परिषदेत नियमावलीला मंजुरी:

 • पॅरिस हवामान करारात प्राण फुंकताना विविध देशांनी नियमावली तयार केली असून, जागतिक तापमानवाढीचे घातक परिणाम काही देशांवर होणार असून, ते टाळण्यासाठीच्या प्रयत्नाचा हा भाग आहे.
 • अमेरिकेने पॅरिस करारातून आधीच माघार घेतली आहे. एकूण दोनशे देशांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. त्यांनी पॅरिस करारातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियमावली तयार केली. जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सियसच्या खाली आणण्याचे उद्दिष्ट पॅरिस करारात ठेवण्यात आले आहे.
 • पोलंड येथे संयुक्त राष्ट्रांची हवामान परिषद सुरू असून तिचे अध्यक्ष मायकल कुर्तिका यांनी सांगितले, की पॅरिस करार पुढे नेणे हे मोठे आव्हान व जबाबदारी आहे. हा रस्ता फार लांब असून यात कुणी मागे राहू नये. अनेक देशांना आताच पूर, दुष्काळ व टोकाच्या हवामान स्थितीचा सामना करावा लागत आहे. या सगळय़ाचे कारण हवामान बदल हेच आहे.
 • तसेच आंतरराष्ट्रीय हवामान बदल समितीचे (आयपीसीसी) जे निष्कर्ष आहेत ते पथदर्शी मानून 2030 पूर्वी तापमान वाढ दीड अंश सेल्सियसच्या खाली ठेवण्याच्या उद्दिष्टाप्रति काम करावे, असे मत अनेक देशांनी व्यक्त केले.

विक्रमसिंगे पुन्हा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी:

 • श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा रणिल विक्रमसिंगे यांचा शपधविधी झाला. अध्यक्ष मैथिरीपाल सिरीसेना यांनी पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे यांची नेमणूक करताना विक्रमसिंगे यांचे सरकार बरखास्त केले होते. Ransinge
 • विक्रमसिंगे यांच्या शपथविधीने आता 51 दिवसांचा घटनात्मक पेच संपुष्टात आला आहे. विक्रमसिंगे (वय 69) हे युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते असून त्यांना अध्यक्ष सिरीसेना यांनी अधिकारपदाची शपथ दिली. सिरीसेना यांनीच त्यांना पदावरून काढून त्यांच्या जागी महिंदा राजपक्षे यांची नेमणूक 26 ऑक्टोबर रोजी केली होती. युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते विक्रमसिंगे यांनी पद सोडण्यास नकार देताना हकालपट्टीची कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.
 • राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता त्या आधी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची पंतप्रधानपदी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदा ठरवली होती. विक्रमसिंगे यांनी सांगितले, की हा दिवस केवळ माझ्यासाठी नव्हे तर युनायडेट नॅशनल पार्टीसाठी ऐतिहासिक आहे. श्रीलंकेच्या लोकशाही संस्था व नागरिकांचे सार्वभौमत्व यांचा यात विजय झाला आहे. जे कुणी राज्यघटनेच्या समर्थनार्थ धावून आले त्यांचा मी आभारी आहे. हा लोकशाहीचा विजय असल्याचे जगासमोर आले आहे.

दिनविशेष:

 • देशभक्त, काँग्रेसचे 16वे अध्यक्षलालमोहन घोष‘ यांचा जन्म 17 डिसेंबर 1849 रोजी कलकत्ता येथे झाला होता.
 • भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी सन 1928 मध्ये ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स सोंडर्स याची लाहोर येथे हत्या केली होती.
 • जयंतीलाल छोटालाल शहा यांनी सन 1970 मध्ये भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
 • 2016 मध्ये शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.