17 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
17 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 जून 2020)
ब्रिटनमध्ये करोनावरील पहिले औषध शोधण्यात यश:
- सगळ्या जगास वेठीस धरणाऱ्या करोनावर पहिले प्रभावी औषध शोधण्यात ब्रिटनमध्ये यश आले असून त्यामुळे काही गंभीर रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
- तर हे औषध म्हणजे एक प्रकारचे उत्तेजक (स्टेरॉइड) असून त्याचे नाव डेक्सामिथासोन असे आहे.
- तसेच कमी खर्चाचे असल्यामुळे जगभर त्याचा वापर करता येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
- या औषधाच्या वापरामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गंभीर रुग्णांतील मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांशाने कमी झाले.
- 2104 रुग्णांना यादृच्छिक पद्धतीने हे औषध देण्यात आले होते, तर इतर 4321 रुग्णांवर नेहमीचे उपचार करण्यात आले.
- तसेच ज्यांना हे औषध तोंडावाटे किंवा इंजेक्शनने दिले होते त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण 35 टक्के कमी झाले.
- या संशोधनास ब्रिटनमधील अनेक संस्थांनी निधी दिला होता, तर बिल व मेलिंडा गेटस फाउंडेशननेही मदत केली होती.
Must Read (नक्की वाचा):
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे CEO केविन रॉबर्ट्स यांनी राजीनामा दिला:
- क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) केविन रॉबर्ट्स यांनी मंगळवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- क्रिकेट ऑस्ट्रेलिया करोना व्हायरसच्या काळात आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत 80 टक्के कर्मचार्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय रॉबर्ट्स यांनी घेतला होता. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती.
- तसेच रॉबर्ट्स यांनी राजीनामा दिल्याची बातमी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली.
- तर त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे सुपूर्द केलेला राजीनामा तत्काळ प्रभावाने मंजूरदेखील करण्यात आला.
- रॉबर्ट्स यांच्या जागी, सध्या T20 World Cup स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या निक हॉकले यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली आहे.
- 2018 साली जेम्स सदरलँड यांच्या जागी रॉबर्ट्स यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा करार पुढील वर्षी संपणार होता, पण त्याआधीच त्यानी अचानक राजीनामा दिला.
2019 या वर्षात भारता मध्ये 51 अब्ज डॉलर ची गुंतवणूक:
- सन 2019 मध्ये भारतात 51 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली असून, भारताने जगात नववा क्रमांक गाठला आहे.
- कोरोनाच्या नंतरही भारतीय अर्थव्यवस्था ही वाढती राहण्याचा अंदाज असल्याने गुंतवणूक वाढत राहण्याचा होराही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
- संयुक्त राष्ट्रांच्या कॉन्फरन्स ऑन ट्रेड अॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने विविध देशांमधील थेट परकीय गुंतवणुकीबाबत केलेल्या अभ्यासाचा अहवाल तयार केला असून, त्यामध्ये वरील माहिती देण्यात आली आहे.
- आशिया खंडात भारत हा थेट परकीय गुंतवणुकीत अव्वल स्थानी राहिला आहे. सन 2019 मध्ये आशियात 1.54 ट्रिलीयन डॉलरची गुंतवणूक झाली आहे. चालू वर्षात यामध्ये 40 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
- असे झाल्यास सन 2005 नंतर प्रथमच थेट परकीय गुंतवणूक ही 1 ट्रिलियन डॉलरच्या खाली जाऊ शकेल.
- दक्षिण आशियातील विविध देशांमधून परकीय गुंतवणूक भारतामध्ये वळण्याचे प्रमाण सहा टक्के एवढे झाले आहे.
- असे असले तरी या देशांमध्ये एकूण जागतिक गुंतवणुकीपैकी 1 टक्का गुंतवणूक होताना दिसत आहे.
- भारतामध्ये 2019 या वर्षात 51 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली असून, त्या आधीच्या वर्षापेक्षा त्यामध्ये 42 अब्ज डॉलरची वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सन 2018 मध्ये झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीत जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत १२व्या स्थानी होता.
ऑनलाईन वर्गांसाठी निश्चित नियम करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला:
- कोविड-19 साथीमुळे शाळा बंद असल्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत.
- त्यामुळे मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन वर्गांसाठी निश्चित नियम करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोविड-19 साथीमुळे तीन महिन्यांपासून शाळा बंद आहेत.
- त्यामुळे शाळा वर्गखोल्यांतील शिक्षणाकडून ऑनलाईन शिक्षणाकडे वळल्या आहेत. काही शाळांनी तर नियमित शाळांसारखे पूर्ण वर्ग ऑनलाईन सुरू केले आहेत.
- त्यामुळे मुलांचा मोबाईल अथवा संगणकासमोर बसण्याचा वेळ (स्क्रीन टाईम) वाढला आहे. त्याबाबत पालकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत.
- याशिवाय अनेक घरांत एकच फोन असून, मुलांची संख्या अधिक असल्यामुळे मुलांचे आॅनलाईन वर्ग बुडत आहेत. त्यामुळे ऑनलाईन वर्गांबाबत निश्चित नियम करणे आवश्यक झाले आहे.
- अधिकाºयाने सांगितले की, आॅनलाईन वर्गाबाबत नियम निश्चित करताना सर्व हितधारकांशी सल्लामसलत केली जात आहे.
- मुलांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांसमोर फार वेळ बसावे लागू नये यासाठी आॅनलाईन वर्गांचा कालावधी निश्चित केला जाईल.
- डिजिटल सुविधा, रेडिओ सुविधा यासारख्या सर्व प्रकारच्या उपकरणांसाठी स्वतंत्रपणे नियम बनविले जातील. ज्यांच्याकडे यापैकी कोणतीच सुविधा नाही, त्यांचाही योग्य विचार केला जाईल. विविध वयोगटांतील मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ किती असावा, हे नियमांत निश्चित केले जाईल
कोरोनाशी लढाईसाठी स्वस्त टेस्ट किट, पोर्टेबल व्हेंटिलेटर, ड्रोन तय्यार!:
- कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत प्रत्येक जण आपापलं योगदान देतोय.
- याच लढ्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी – (आयआयटी) एकापेक्षा एक भारी उपकरणं तयार केली आहेत.
- परवडणारी कोरोना टेस्ट किट्स, स्वस्त पोर्टेबल व्हेंटिलेटर, डिजिटल स्टेथोस्कोप, निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन, आयसोलेशन वॉर्डांसाठी विल्हेवाट लावता येण्याजोगे बांबूचे फर्निचर, रुग्णालयांसाठी संसर्गरोधक कापड, अशी अत्यंत उपयुक्त साधनं आयआयटींमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात तयार केली आहेत.
- दिल्ली आयआयटी निर्मित कोविड-19 टेस्ट किटला तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंजुरीही दिली आहे.
- आयआयटी मधील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या स्टार्ट-अपच्या माध्यमातून किंवा पेटंट स्वतःकडेच ठेवत काही नामांकित कंपन्यांना निर्मिती परवाना द्यायचं आयआयटींनी ठरवलंय.
- आयआयटी-दिल्लीनं आपल्या कोविड-19 टेस्ट किटच्या उत्पादनासाठी बेंगळुरू येथील जिनी लॅबोरेटरीज या जैव तंत्रज्ञान कंपनीला खुला परवाना दिला आहे.
- विशेष म्हणजे, या किटची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही,.एकूण 40 कंपन्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. मात्र, दर्जात्मक निकष पूर्ण करतील आणि किंमत न वाढवण्याची हमी देतील अशाच कंपन्यांना आम्ही परवाना देणार आहोत.
- त्यात जिनी लॅबोरेटरीजची आत्ता निवड केली आहे.
- त्यांनी आंध्र प्रदेश मेड टेक झोनमध्ये या किट्सचं उत्पादन सुरू केलंय आणि दहा दिवसांत ही किट बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही रामगोपाल यांनी वृत्तसंस्थेला दिली.
भारताने 2.33 कोठी रुपय पशुपतिनाथ’च्या सांडपाणी व्यवस्थेसाठी मदत दिली:
- भारत व नेपाळ यांच्यातील संबंध बिघडलेले असतानाच आता भारताने तेथील पशुपतिनाथ मंदिरात 2.33 कोटी रुपये खर्चून सांडपाणी व स्वच्छता सुविधा उभारून देण्याचे ठरवले आहे.
- पशुपतिनाथ मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी येतात, त्यामुळे तेथे अनारोग्याचा धोका नेहमीच असतो, त्यासाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे.
- नेपाळ-भारत मैत्री विकास भागीदारी प्रकल्पात ही सुविधा उभारून दिली जाणार आहे.
- सोमवारी भारतीय दूतावास, नेपाळचे संघराज्य मंत्रालय व सामान्य प्रशासन तसेच काठमांडू महानगर शहर प्रशासन यांच्यात सांडपाणी व स्वच्छता व्यवस्था उभारण्याचा समझोता करार झाला.
- भारताने यासाठी 2.33 कोटी रुपये देण्याचे मान्य केले असून काठमांडू महानगर शहर प्रशासन त्या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.
- नेपाळने ठरवलेल्या निकषानुसार १५ महिन्यांत हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे.
- पशुपतिनाथ हे नेपाळमधील मंदिर सर्वात मोठे असून ते बागमती नदी किनारी आहे. भारत व नेपाळमधून तेथे रोज भाविक येत असतात.
- नेपाळने अलिकडेच नवीन राजकीय नकाशा मंजूर करून त्यात भारतातील उत्तराखंड राज्यातील लिपुलेख, कालापानी, लिपियाधुरा या भागांवर दावा सांगितला आहे. त्याबाबत घटनादुरुस्तीला तेथील संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली होती.
दिनविशेष :
- 1885 मध्ये न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.
- आइसलँडने (डेन्मार्कपासून) 1944 मध्ये स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
- अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे 1963 मध्ये कायदेबाह्य ठरवले.
- 1967 मध्ये चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
- 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
- 1297 मध्ये ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला.
- राजमाता जिजाबाई यांचे निधन 1674 मध्ये झाले.