16 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

16 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2021)

जागतिक भूक निर्देशांकात भारत 101व्या स्थानी :

  • जागतिक भूक निर्देशांक (global hunger index)2021 मध्ये भारत 116 देशांपैकी 101 व्या स्थानावर आहे.
  • तर यामध्ये भारत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे.
  • 2020 मध्ये भारत या यादीत 94व्या क्रमांकावर होता. एका वर्षात भारत सात स्थानांनी घसरला आहे.
  • आयर्लंडची एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी केलेल्या संयुक्त अहवालात भारतातील भुकेची पातळी ‘चिंताजनक’ असल्याचा उल्लेख केला आहे.
  • तसेच या अहवालानुसार नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान सारख्या देशांनी आपल्या नागरिकांना अन्न पुरवण्यामध्ये भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
  • भारताने बालमृत्यू दर, बालमृत्यूचे प्रमाण आणि अपुऱ्या अन्नामुळे मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण, या घटकांमध्ये सुधारणा दाखवली आहे, असं या अहवालात म्हटलंय.
  • तर या अहवालात, चीन, ब्राझील आणि कुवैतसह 18 देशांनी पाचपेक्षा कमी जागतिक भूक निर्देशांक मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 ऑक्टोबर 2021)

संरक्षण दलाचे Ordinance Factory Board विसर्जित :

  • संरक्षण दलाचा अविभाज्य भाग असलेलेआयुध निर्माण मंडळ म्हणजेच Ordinance Factory Board हे अखेर विसर्जित करण्यात आले.
  • तर आता या मंडळाचे रुपांतर 7 कंपन्यांमध्ये करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एका आभासी कार्यक्रमाद्वारे घोषित करण्यात आलं.
  • देशात 10 राज्यात 41 ठिकाणी दारुगोळा – शस्त्र निर्मितीचे कारखाने, असा Ordinance Factory Board चा पसारा होता.
  • तसेच आता या सर्वांना 7 कंपन्यांमध्ये विभागण्यात आलं आहे.
  • तर सुमारे 75 हजार कर्मचारी या मंडळात काम करत असून कोणालाही न काढता यांना 7 कंपन्यांमध्ये केंद्रीय कर्मचारी म्हणून सामावून घेतले जाणार आहे.

करोना विषाणूला पेशीतून प्रवेश करण्यास रोखणाऱ्या संयुगाचा शोध :

  • करोना विषाणूला पेशीत प्रवेश करण्यापासून रोखणारे संयुग वैज्ञानिकांनी तयार केले असून संसर्गाच्या आधीच्या टप्प्यात ते दिल्यास करोनाचा संसर्ग होत नाही.
  • एमएम 3122 हे संयुग विषाणूच्या अनेक वैशिष्टय़ांमध्ये बदल करते. हे संयुग वापरल्यानंतर विषाणूत असे बदल होतात की, जे त्याला पेशीत प्रवेश करू देत नाहीत, असे ‘वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन’च्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
  • ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’या नियतकालिकात म्हटले आहे की, विषाणूतील जे प्रथिन मानवी पेशीवर आघात करते त्याला ट्रान्समेम्ब्रेन सेरीन प्रोटिएज 2 असे म्हणतात.
  • वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ लेखक जेम्स डब्ल्यू जॅनेटका यांनी म्हटले आहे की, आता सार्स सीओव्ही 2 वर अनेक लशी उपलब्ध आहेत. असे असले तरी विषाणूविरोधी औषधांची गरज आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद :

  • चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 2021 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना आहे.
  • तर या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
  • तसेच टी 20 स्पर्धेत 300 व्या सामन्याचं महेंद्रसिंह धोनी नेतृत्व करत आहे.
  • धोनी 2007 पासून टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्स, इंडियन्स आणि रायझिंग पुणे संघाचं नेतृत्व केलं आहे.
  • धोनीने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 299 सामन्यापैकी 167 सामन्यात विजय, तर 118 सामन्यात पराभव सहन केला आहे.

महाराष्ट्राची दिव्या देशमुख बनली ग्रँडमास्टर :

  • महाराष्ट्रातील दिव्या देशमुख हिने बुडापेस्टमध्ये बुद्धीबळ स्पर्धेत भारताची नवी महिला ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवला आहे.
  • करोनाचं संकट ओढावल्यानंतर बुडापेस्टमधील दिव्या देशमुख हिचा पहिला बोर्ड इव्हेंट होता.
  • दिव्याने नऊ फेऱ्यांमध्ये पाच गुण मिळवले आणि तिचे गुण 2452 इतके झाले आहेत.
  • तरआता आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्यासाठी तिला एक पाऊल दूर आहे.
  • तसेच तिने दुसरा मास्टर निकष गाठल्यास ती आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर होईल.

दिनविशेष :

  • 16 ऑक्टोबर 1868 मध्ये डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.
  • भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश 16 ऑक्टोबर 1905 मध्ये दिला.
  • 16 ऑक्टोबर 1978 मध्ये माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
  • 16 ऑक्टोबर 2003 मध्ये नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.