16 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs
16 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 मे 2022)
होल्सिमचा भारतातील व्यवसाय ‘अदानी’कडे :
- बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांत प्रस्थापित असलेल्या अदानी समूहाचा आता सिमेंट उद्योगाचा मार्ग सुकर होणार आह़े
- ‘होल्सिम लिमिटेड’ कंपनीचा भारतातील व्यवसाय मिळविण्यासाठी 10.5 अब्ज अमेरिकी डॉलरचा करार पूर्ण केल्याचे अदानी समूहाने रविवारी जाहीर केल़े
- अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत बंदरे, वीज केंद्रे आणि खाणकाम यांच्या संचालनाच्या मुख्य उद्योगांपलीकडे जाऊन विमानतळे, डेटा सेंटर्सपर्यंतच्या विविध क्षेत्रांत मजल मारली आहे.
- तर या समूहाने गेल्या वर्षी अदानी सिमेंटेशन लिमिटेड आणि अदानी सिमेंट लिमिटेड अशा दोन सिमेंट उपकंपन्या स्थापन केल्या होत्या.
- होल्सिम लिमिटेडचा अंबुजा सिमेंटमध्ये 63.1 आणि एसीसीमध्ये 54.53 टक्के हिस्सा आह़े आता हा हिस्सा अदानी समूहाला मिळणार आह़े
Must Read (नक्की वाचा):
देवसहायम पिल्लई यांना संतपद बहाल :
- देवसहायम पिल्लई यांना ख्रिश्चन धर्मातील संतपद बहाल करण्यात आले.
- रविवारी व्हॅटिकन सिटी येथे झालेल्या दिमाखदार धार्मिक सोहळय़ात सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी पिल्लई यांना हे पद बहाल केले.
- पिल्लई यांनी 18 व्या शतकात ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता.
- संतपद मिळणारे ते पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत.
- तर गेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदा ‘व्हॅटिकन’मध्ये संतपद प्रदान सोहळा झाला.
- देवसहायम यांच्यासह चार महिलांसह नऊ जणांना या सोहळय़ात संतपद बहाल करण्यात आले.
माणिक साहा यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ :
- बिप्लव कुमार देव यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्रिपुरा भाजपाचे प्रमुख माणिक साहा यांनी रविवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- माणिक साहा यांनी आगरतळा येथील राजभवनात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली.
- राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेले माणिक हे भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत.
- याशिवाय ते त्रिपुरा भाजपाचे प्रमुख देखील आहेत.
- त्रिपुरा विधानसभा निवडणुका 2023 मध्ये होणार असून माणिक साहा हेच या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असतील, असे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे.
माजी क्रिकेटपटू सायमंड्सचे निधन
- ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रय़ू सायमंड्सचे रविवारी वाहन अपघातात निधन झाले.
- तर गेल्या काही महिन्यांमध्ये निधन पावलेला सायमंड्स हा तिसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला.
- मार्चमध्ये दिग्गज लेग-स्पिनर शेन वॉर्न आणि यष्टीरक्षक-फलंदाज रॉडनी मार्श यांचे निधन झाले होते. ली.
- सायमंड्सची ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होते.
- आक्रमक शैलीतील फलंदाज, ऑफ-स्पिन आणि मध्यमगती गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी सायमंड्सची ओळख होती.
- 1998 ते 2009 या कालावधीत त्याने 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 ट्वेन्टी-20 सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले.
थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धात भारताचा ऐतिहासिक सुवर्णाध्याय :
- भारतीय बॅडिमटन आणि एकंदर क्रीडा क्षेत्र प्रगतिपथावर असल्याचा रविवारी पुन्हा एकदा प्रत्यय आला.
- भारतीय पुरुष बॅडिमटन संघाने 14 वेळा विजेत्या इंडोनेशियाचा 3-0 असा धुव्वा उडवण्याची अनपेक्षित कामगिरी करत थॉमस चषक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली.
- तर या स्पर्धेच्या 73 वर्षांच्या इतिहासातील भारताचे पहिलेच जेतेपद ठरले.
महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व ‘My11Circle’कडे :
- एकीकडे आयपीएलची धूम सुरु असताना दुसरीकडे महिला टी-20 चॅलेंज सामन्यांची जय्यत तयारी सुरु आहे.
- तर या स्पर्धेसाठी My11Circle या इंडियन फॅन्टॅसी क्रीटा मंचाने मुख्य प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले आहेत.
- महिला टी-20 चॅलेंज 2022 सामने येत्या 23 मे ते 28 मे या कालावधित पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
- तर या सामन्यांचे मुख्य प्रोयजकत्व मिळवण्यासाठी My11Circle ने यशस्वीरित्या बोलीमध्ये सहभाग घेऊन प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले आहेत.
- महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिय तसेस भारतातील दिग्गज महिला क्रिकेटपटू सहभागी होतील.
ऋतुराज गायकवाडने रचला ‘हा’ अनोखा विक्रम :
- चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्या सामन्यात चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने दमदार खेळी केली.
- तर त्याने अर्धशतकी खेळी करत चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
- विशेष म्हणजे त्याने या सामन्यात एक अनोखा विक्रम रचत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं.
- तर त्याने 49 चेंडूंमध्ये एक षटकार आणि चार चौकार लगावत 53 धावा केल्या.
- तसेच त्याने आयपीएलमध्ये 35 डावांत 1205 धावा करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
- आयपीएलमध्ये 35 डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ऋतुराजने अव्वल स्थान गाठले आहे.
दिनविशेष :
- 16 मे 1665 मध्ये पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरारबाजी यांचा मृत्यू.
- अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे 16 मे 1866 मध्ये व्यवहारात आणले.
- क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना 16 मे 1899 मध्ये फाशी.
- 16 मे 1929 मध्ये हॉलिवूडच्या अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.
- सोविएत रशियाचे व्हेनेरा-5 हे मानवविरहित अंतराळयान 16 मे 1969 मध्ये शुक्रावर उतरले.
- सिक्कीम भारतात 16 मे 1975 मध्ये विलीन झाले.
- कुवेतमधे स्त्रियांना 16 मे 2005 मध्ये प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.