16 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
16 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 मे 2019)
‘चंद्रयान-२’ मोहिमेत 13 पेलोडसह नासाचा प्रयोगही समाविष्ट :
- भारताच्या चंद्रयान 2 मोहिमेत 13 पेलोडचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय त्यात नासाच्या एका प्रयोगाचाही समावेश आहे, असे सांगण्यात आले. भारताचे चांद्रयान जुलैत सोडले जाणार आहे.
- तर इस्रोने म्हटले आहे, की चंद्रयान मोहिमेत एकूण तेरा पेलोड असून त्यात 4 ऑर्बिटरमध्ये, तीन लँडरमध्ये तर दोन रोव्हरमध्ये असतील.
- तसेच अवकाशयानाचे तीन भाग असून त्यात ऑर्बिटर व लँडर (विक्रम) तसेच रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे.
- 9 जुलै ते 16 जुलै 2019 मध्ये उड्डाणास अनुकूल काळ असून हे यान 6 सप्टेंबरला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.
- ऑर्बिटरचा वेग 100 कि.मी राहील. लँडर विक्रम हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरण करणार आहे.
- तसेच रोव्हर प्रज्ञान हे काही प्रयोग करणार आहे. जीएसएलव्ही मार्क तीन प्रक्षेपकाच्या मदतीने हे उड्डाण केले जाणार असून ऑर्बिटर व लँडर हे एकमेकांशी जोडलेले असतील. ते पृथ्वीच्या नजीकच्या कक्षेतून नंतर चंद्राकडे कूच करील.
- त्यानंतर लँडर हे ऑर्बिटरमधून वेगळे होऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे सोडले जाईल. रोव्हर या बग्गीसारख्या गाडीच्या मदतीने वैज्ञानिक प्रयोग करण्यात येणार आहे.
- तर लँडर व ऑर्बिटर या दोन्हीवर उपकरणे लावण्यात आलेली आहेत. त्यांच्या मदतीने वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत.
- चंद्रयान 2 ही दहा वर्षांपूर्वीच्या चंद्रयान 1 मोहिमेशी निगडित अशी ही सुधारित मोहीम आहे. चांद्रयान 1 मध्ये 11 पेलोड होते, त्यात भारताचे पाच, युरोपचे तीन, अमेरिकेचे 2, बुल्गारियाचे 1 असे पेलोड होते. ते अवकाशयान 1.4 टनांचे
होते व पीएसएलव्ही म्हणजे ध्रुवीय प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):
सन्नी पवार ठरला न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकार :
- मुंबईच्या कलिना येथील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सन्नी पवार या अकरा वर्षीय मुलाने चित्रपट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
- 19व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे.
- तर ‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
- तसेच सन्नीने यापूर्वी ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या 2016 मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे.
लवकरच भारत करणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्यात :
- भारत लवकरच क्षेपणास्त्रांची पहिली बॅच निर्यात करण्याच्या तयारीत आहे.
- 14 मे पासून सिंगापूरमद्ये तीन दिवसीय ‘आशियाई आंतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शना’ची सुरूवात झाली. या प्रदर्शनादरम्यान बोलताना, भारताने तयार केलेल्या क्षेपणास्त्रांच्या पहिल्या बॅचची निर्यात करण्यास तयार असून यासाठी सरकारची आवश्यक मंजुरी मिळणे बाकी असल्याची माहिती ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’चे मुख्य महाप्रबंधक कमोडोर एस.के.अय्यर यांनी दिली.
- तसेच या प्रदर्शनात भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस कोलकाता’ आणि ‘आयएनएस शक्ती’ या युद्धनौका सहभागी झाल्या आहेत.
- तर अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मोस, लार्सन अँड टुब्रो यांसरख्या कंपन्यांनीही आतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.
- ही भारताची पहिली निर्यात असून भारताने निर्माण केलेल्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी दक्षिण पूर्व आशियाई आणि आखाती देश इच्छुक असल्याचेही ते म्हणाले. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी दक्षिण पूर्व आशियाई आणि आखाती देशांना करण्यात येणारी क्षेपणास्त्रांची निर्यात ही मोठी संधी मानली जात आहे.
जगातील तिसऱ्या उंच शिखरावर पुण्यातील 10 जणांनी फडकावला तिरंगा :
- पुण्यातील दहा गिर्यारोहकांनी जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात उंच कांचनजुंगा शिखर सर करत तिरंगा फडकावला आहे.
- गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील दहा जणांच्या संघानं आज सकाळी दहाच्या सुमारास ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
- आठ हजार 586 मीटर उंच असलेले माउंट कांचनजुंगा उंचीनुसार जगातील तिसरे तर भारतातील पहिले शिखर आहे.
- गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. याआधी माउंट एव्हरेस्ट, माउंट ल्होत्से, माउंच मकालू, माउंट धैलागिरी, माउंट मनास्लुवर आणि माउंट च्यो ओयु मोहिमा फत्ते केल्या आहेत.
- सातवी अष्टहजारी मोहीम फत्ते करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव गिर्यारोहक नेते आहेत.
दिनविशेष :
- 16 मे 1665 मध्ये पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरारबाजी यांचा मृत्यू.
- अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे 16 मे 1866 मध्ये व्यवहारात आणले.
- क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना 16 मे 1899 मध्ये फाशी.
- 16 मे 1929 मध्ये हॉलिवूडच्या अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.
- सोविएत रशियाचे व्हेनेरा-5 हे मानवविरहित अंतराळयान 16 मे 1969 मध्ये शुक्रावर उतरले.
- सिक्कीम भारतात 16 मे 1975 मध्ये विलीन झाले.
- कुवेतमधे स्त्रियांना 16 मे 2005 मध्ये प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा