16 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड
डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड

16 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 मार्च 2020)

डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे नियम आजपासून बदलले :

  • डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आतापर्यंत ज्यांनी ऑनलाइन व्यवहारांसाठी कधीही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरली नसतील, त्यांच्या कार्डांची सुविधा आजपासून अनिवार्यपणे थांबवली जाणार आहे.
  • तर अशातच आपण नवीन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असल्यास काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. जर आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड घेतलं आहे आणि त्याचा वापर 15 मार्चपर्यंत केलेला नसल्यास 16 मार्चला ते आपोआप निष्क्रिय होणार आहेत.
  • तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा परदेशात वापर करायचा असल्यास कस्टमर्स केअरला फोन करून किंवा मोबाइल ऍपच्या माध्यमातून माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर आपल्या कार्डची सेवा पुन्हा वेबसाइटच्या माध्यमातून पुन्हा सुरू केली जाणार आहे.
  • डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडू लागल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 15 जानेवारीला यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध केली होती. यामध्ये ‘ऑनलाइन’ आणि ‘कॉन्टॅक्टलेस पेमेंट’मधली सुरक्षा वाढवण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डांसंदर्भातला हा निर्णय घेण्यात आला होता.
  • रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, विद्यमान कार्डासाठी, जारीकर्त्याने (कोणतीही देशी किंवा आंतरराष्ट्रीय बँक) सध्याच्या कार्डावरील ऑनलाइन आणि संपर्करहित व्यवहाराचे हक्क अक्षम करायचे की नाही, याचा निर्णय त्यांच्या जोखमीच्या आधारे घ्यायचा आहे. मात्र जी विद्यमान कार्डे ऑनलाइन, आंतरराष्ट्रीय किंवा संपर्कविहीन व्यवहारांसाठी कधीही वापरली गेली नसतील ती अनिवार्यपणे अकार्यक्षम करावी लागतील.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 मार्च 2020)

करोना आणीबाणी निधीचा भारताचा ‘सार्क’पुढे प्रस्ताव :

  • करोना विषाणूच्या महासाथीशी लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार सार्क देशांनी केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘आणीबाणी निधी’चा प्रस्ताव सार्क देशांपुढे मांडला आणि या निधीत भारत एक कोटी डॉलर्सचे योगदान देईल, अशी घोषणा केली.
  • तर करोना आपत्तीशी स्वतंत्रपणे न लढता सार्क देशांनी एकत्र यावे, असे आवाहन मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.
  • तसेच सार्क देशांच्या प्रमुखांच्या या विशेष संवादात मोदी यांच्याव्यतिरिक्त श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्ष, मालदिवचे अध्यक्ष इब्राहिम मोहंमद सोली, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, भूतानचे दूत लोटय तेशरिंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जफर मिर्झा या परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.

अमेरिकेतील अलाबामा राज्यात योगाला मान्यता :

  • करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील नेत्यांनी हस्तांदोलनाऐवजी ‘नमस्ते’ म्हणजे दोन्ही हात जोडून नमस्काराने स्वागत करण्याच्या पद्धतीचा पुरस्कार केला असताना अमेरिकेतील अलाबामा राज्य विधिमंडळाने नमस्ते किंवा नमस्काराच्या प्रथेवर बंदी घातली असून योगावरील बंदी मात्र उठवली आहे.
  • नमस्ते किंवा नमस्कार ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. गेली 27 वर्षे योगावर असलेली बंदी उठवताना नमस्तेवर मात्र बंदी घालण्याचा निर्णय अलाबामा शिक्षण मंडळाने घेतला आहे.
  • तर 1993 मध्ये योगा व हिप्नॉसिसवर बंदी घालण्यात आली होती. अलाबामा विधिमंडळात योग विधेयक 84-17 मतांनी मंजूर करण्यात आले असून तो प्रस्ताव प्रतिनिधी जेरेमी ग्रे यांनी मंगळवारी मांडला होता.
  • तसेचअमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी भारताच्या नमस्कार संस्कृतीचा करोनाचा प्रसार रोखण्यासाठी अवलंब केला असताना या विधिमंडळाने नमस्तेवर बंदी घातली आहे. आता हे विधेयक सिनेटमध्ये जाणार असून तेथे मंजुरी मिळाल्यानंतर गव्हर्नर के आयव्ही त्यावर स्वाक्षरी करतील. या कायद्यानुसार स्थानिक शिक्षण मंडळे आता केजी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देऊ शकतील.

मस्कत खुली टेबल टेनिस स्पर्धात शरथ कमालला विजेतेपद :

  • भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमाल याने ‘आयटीटीएफ’ चॅलेंजर प्लस ओमान खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याबरोबरच 10 वर्षांनंतर जेतेपदाची उणीव भरुन काढण्यात 37 वर्षीय शरथला यश आले.
  • तर अंतिम फेरीत शरथने पोर्तुगालच्या मार्कोस फ्रेइटासचा 6-11, 11-8, 12-10, 11-9, 3-11, 17-15 असा पराभव केला.
  • तसेच याआधी 2010 मध्ये त्याने इजिप्त येथील स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याने मोरोक्को येथे 2011 आणि इंडिया ओपन येथे 2017 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती. मात्र त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली होती.

दिनविशेष:

  • 16 मार्च 1521 मध्ये फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.
  • फत्तेपूर सिक्री येथे 16 मार्च 1528 मध्ये राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
  • 16 मार्च 1649 मध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
  • भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी 16 मार्च 1911 मध्ये मांडला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.