16 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

16 March 2019 Current Affairs In Marathi

16 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 मार्च 2019)

मसूद अझरवर फ्रान्सचे आर्थिक निर्बंध :

 • पुलवामा हल्ल्यास जबाबदार असलेल्या जैश ए महम्मद या संघटनेचा म्होरक्या दहशतवादी मसूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अपयश आले असले तरी फ्रान्सने त्याच्या आर्थिक नाडय़ा आवळण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तर फ्रान्सने मसूदवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. फ्रान्समधील मसूद अझरच्या मालमत्ता आणि बँकखाती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तसेच मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला होता. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने मसूदविरोधातला ठराव आणला होता. चीनने नकाराधिकार वापरून तो रोखला. मात्र आता फ्रान्सने आर्थिक र्निबधांचा मार्ग अमलात आणल्याने अमेरिका आणि ब्रिटननेही जर मसूदवर आर्थिक निर्बंध आणले, तर दहशतवादी गटाला हादरा बसण्याची शक्यता आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 मार्च 2019)

कठोर नियमावली करण्यास निवडणूक आयोग अखेर तयार :

 • निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिराती-मजकुराला अखेर चाप बसणार आहे.
 • मतदानाच्या ४८ तास आधी समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिराती, मजकूर, ‘पेड न्यूज’ इत्यादींना आळा घालणारी नियमावली जारी करण्यास तयार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर उच्च न्यायालयाला सांगितले.
 • समाजमाध्यमांबाबत निवडणूक आयोगाने आतापर्यंत दिलेल्या आदेशांचीही काटेकोर अंमलबजावणी करण्यात येण्याचे आयोगाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे अशी नियमावली तयार करण्यास आपण हतबल असल्याची भूमिका आयोगाने आतापर्यंत घेतली होती.
 • तसेच राजकीय मजकूर वा ‘पेड न्यूज’ना आळा घालण्यासाठी स्वत:हूनच पूर्वचिकित्सा प्रक्रिया राबवण्यास आम्ही सुरुवात केली आहे. मात्र मतदानाच्या 48 तास आधी राजकीय मजकूर प्रसिद्ध न करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले, तर असा मजकूर प्रसिद्ध केला जाणार नाही, अशी भूमिका विविध समाजमाध्यमांनी मागील सुनावणीच्या वेळी घेतली होती.

आकडेवारीतील राजकीय हस्तक्षेप धोकादायक:

 • आपल्याला अनुकूल नसलेली आकडेवारी दाबून टाकण्याचा राजकीय पातळीवरील सध्या जो कल आहे त्याविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन 108 अर्थतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे सर्व अर्थतज्ज्ञ आणि सांख्यिकींना केले आहे.
 • तर राजकीय हस्तक्षेपामुळे भारताच्या सांख्यिकी क्षेत्राच्या कीर्तीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तडा जात असल्याचे सूचित करून अर्थतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी वरील आवाहन केले आहे.
 • तसेच एखाद्या आकडेवारीमुळे सरकारच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असे लक्षात येताच अशा आकडेवारीची संशयास्पद पद्धतीने फेररचना केली जाते अथवा ती दाबली जाते, असे निवेदनामध्ये म्हटले आहे. यासाठी फेरआढावा घेऊन 2016-17च्या जीडीपी वृद्धिदरामध्ये करण्यात आलेली वाढ, जीडीपीमध्ये नीति आयोगाने केलेला हस्तक्षेप आणि 2017-118चा कामगार पाहणी अहवाल सरकारने रोखून ठेवला आदी उदाहरणे देण्यात आली आहेत.
 • अर्थतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी विद्यमान आणि भविष्यातील प्रशासनांवर सर्व स्तरावर प्रभाव टाकून सार्वजनिक आकडेवारीचा प्रामाणिकपणा पुनस्र्थापित करावा, सांख्यिकी संस्थांचे स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा पुनस्र्थापित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 • अलाहाबाद विद्यापीठाचे जीन ड्रेझ, इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे आर. नागराज, जेएनयूचे अभिजित सेन, जयती घोष, कोलंबिया विद्यापीठाचे अमर्त्य लाहिरी आणि मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाचे जेम्स बॉयस आदी अर्थशास्त्रज्ञांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

‘पूल निरीक्षण प्राधिकरण’ स्थापन करणार:

 • यापुढे मुंबईतील पुलांची दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी पूल निरीक्षण प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. मुख्य पूल निरीक्षक या प्राधिकरणाचे प्रमुख असणार आहेत.
 • मुंबईतील ३७४ पुलांचे ऑडिट महापालिकेने केले आहे. त्यानुसार पुलांची दुरुस्ती होणार असून, काही पुलांची पुनर्बांधणी होणार होती.
 • तर पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 600 कोटी रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. काही पुलांच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्तावही स्थायी समितीच्या बैठकीत गेल्या महिन्यात मंजूर करण्यात आला. मात्र, हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांच्या आॅडिटची फेरतपासणी होणार आहे. यामुळे यापूर्वी दिलेल्या पुलांच्या दुरुस्तीच्या कार्यादेशाबाबतही शंका उपस्थित होत आहे.
 • तसेच आतापर्यंत महापालिकेत पुलांसाठी वेगळा विभाग नव्हता. मात्र या सर्व घटनांनंतर आता पुलासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
 • कोणत्या पुलाची तपासणी करायची? कशी करायची? त्याचे निकष काय? पुलाची देखभाल करण्यासाठी नियुक्त अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करणे, अहवाल कोणत्या स्वरूपात असावा? तसेच पूल धोकादायक असल्यास कोणती पावले उचलावीत याबाबतचे सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असणार आहे.

अँड्रॉइडचं नवं व्हर्जन :

 • आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन सुविधा देण्यात गुगलचा हात कोणीच धरू शकत नाही. जेव्हापासून गुगलने अँड्रॉइडच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये शिरकाव केला तेव्हापासून तर गुगल सर्वसामान्यांच्या सुद्धा ओळखीचे झाले आहे.Android Phone
 • आजघडीला स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडला येऊन जवळपास दहा वर्षाहून अधिक काळ लोटला. या दरम्यान अँड्रॉइडचे अनेक व्हर्जन आली. अँड्रॉइडच्या प्रत्येक नवीन व्हर्जनमध्ये युझर्ससाठी काहीतरी नवीन फीचर्स असतात.
 • त्यामुळे जगभरातील टेक्नोसॅव्ही लोकांमध्ये अँड्रॉइडचे पुढचे व्हर्जन कधी येणार आणि त्याचे नाव काय असणार याविषयी प्रचंड कुतूहल असते. आज जगभरातील बहुतांश स्मार्टफोन हे गुगलच्या अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.
 • तर गूगल नेहमी अँड्रॉइडच्या व्हर्जन्सची नावं विविध डेझर्ट्सवरून ठेवत असतं उदा. कपकेक, डोनट, फ्रोयो(2.0), जिंजरब्रेड(2.3), हनीकोंब (3.0), आईसक्रीम सँडविच(4.0), जेली बीन(4.1), किटकॅट(4.4), लॉलीपॉप(5.0), मार्शमेलो(6.0), नुगट(7.0), ओरीओ(8.0) ,पाय (९.०) आता नव व्हर्जन म्हणजेच अँड्रॉइड क्यू.
 • नुकतंच गुगलने डेव्हलपर्स साठी आपले अँड्रॉइड क्यू बीटा व्हर्जन उपलब्ध करून दिले आहे.तसं पाहिले तर मागील वर्षी आलेले अँड्रॉइड पाय अजूनपर्यंत बऱ्याच लोकांपर्यंत नीटसं पोहोचलेले देखील नाही. तरी देखील गुगलने अँड्रॉइडचे पुढील व्हर्जन अर्थात अँड्रॉइड क्यू चे बीटा व्हर्जन उपलब्ध केले आहे. सध्यातरी फक्त डेव्हलपर्स साठी अँड्रॉइड क्यू उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. जसे यापूर्वीचे अँड्रॉइड पाय अँड्रॉइड नऊ या नावाने देखील ओळखल्या जाते तसेच अँड्रॉइड क्यू अँड्रॉइड दहा या नावाने ओळखल्या जाईल. तरी सुद्धा अँड्रॉइड क्यू मधील क्यू म्हणजे नेमके काय याचा सस्पेन्स अजून कायम आहे. मात्र याचे नाव क्यू वरूनच असेल हे नक्की .सध्यातरी हे व्हर्जन फक्त पिक्सेल फोन्स साठीच उपलब्ध असेल.
 • मात्र यामध्ये प्रायव्हसी सिक्युरिटी बाबत अधिक काम करण्यात आले आहे. जसे कि आता तुमच्या स्मार्टफोन चे लोकेशन एखाद्या ऍप ला कळू द्यायचे कि नाही हे तुम्ही ठरू शकाल. किंवा फक्त ते अ‍ॅप चालू असतानाच तुमचे लोकेशन त्यांना कळू शकेल असे हि यात असेल . तसेच तुमच्या स्मार्टफोनचा आयएमईआय नंबर,सिरीयल नंबर यासह तुमची वैयक्तिक माहिती सहज कुणाला उपलब्ध होणार नाही याचीही काळजी यात घेण्यात येणार आहे. तसेच तुमच्या स्मार्टफोन मधील फोटो ,व्हिडीओ तसेच अन्य फाईल्स चा अक्सेस एखाद्या ऍपला द्यायचा किंवा द्यायचा नाही हे ठरविण्याचा अधिकार देखील युझर्सला असणार आहे.
 • अँड्रॉइड क्यू मध्ये फोल्डेबल फोनला सुद्धा सपोर्ट असणार आहे.त्यामुळे युझर्सला मोठ्या स्क्रीनचा फायदा घेता येणार आहे.यासह अजूनही अनेक फीचर्स यात असणार आहेत.

न्यूझीलंडमध्ये मशिदीतल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू:

 • न्यूझीलंडच्या साऊथ आयलंड सिटीतल्या एका मशिदीमध्ये अज्ञातानं गोळीबार केला आहे.
 • तर या गोळीबारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, अज्ञातानं केलेल्या या गोळीबारात अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 • न्यूझीलंड पोलिसांच्या माहितीनुसार, क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे एक शूटर उपस्थित आहे.
 • पोलीस त्याचा सामना करत आहेत. परंतु या गोळीबारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला, याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

दिनविशेष:

 • 16 मार्च 1521 मध्ये फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.
 • फत्तेपूर सिक्री येथे 16 मार्च 1528 मध्ये राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
 • 16 मार्च 1649 मध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
 • भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी 16 मार्च 1911 मध्ये मांडला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मार्च 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.