16 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
16 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 जून 2020)
एफ-15 सी इगल विमान उत्तर समुद्रात कोसळले:
- अमेरिकन एअर फोर्सच्या एफ-15 सी फायटर विमानाला सोमवारी अपघात झाला.
- पूर्व इंग्लंडमधील ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या बेसवरुन एफ-15 सी विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते.
- उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान उत्तर समुद्रात कोसळले.
- अमेरिकन हवाई दलाची जगातील शक्तीशाली एअर फोर्समध्ये गणना होते. त्यांच्याकडे एकाहून एक सरस फायटर विमानं आहेत.
- एफ-15 सी इगल विमान उत्तर समुद्रात कोसळले” अशी माहिती यूएस एअर फोर्सचे कॅप्टन मिरांडा टी सिमॉन्स यांनी दिली.
- सफोकमधील मिल्डनहॉल जवळच्या लेकनहीथ एअरबेसवरुन एफ-15 फाटयर विमानाने उड्डाण केले होते.
- पूर्व यॉर्क शायरच्या किनारपट्टीपासून 137 किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले असे बीबीसीने म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):
हिमा दासचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवलं- आसाम सरकार:
- भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
- आसाम सरकारने यंदाच्या वर्षासाठी हिमा दासचं नाव पाठवलं आहे.
- 2018 पासून हिमा दास आंतरराष्ट्रीय स्तरावर धडाकेबाज कामगिरी करत आहे.यंदाच्या वर्षासाठी हिमा दोससोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची नावंही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहेत.
- 2018 आणि 2019 ही वर्ष हिमा दाससाठी चांगली केली आहेत.
- आशियाई खेळांपासून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हिमाने पदकांची लयलूट केली आहे. याआधी 2018 साली हिमाला अर्जुन पुरस्काराने गौरवण्या.
महाराष्ट्रामध्ये येणार तब्बल 16 हजार कोटींची गुंतवणूक:
- एकीकडे कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्राने उद्योग उभारणीत दमदार पाऊल टाकून, तब्बल 16 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार सोमवारी केले.
- उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
- उद्योग विभागातर्फे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन) चा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार ऑनलाइन उपस्थित होते.
- अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी विविध 12 देशांतील गुंतवणुकदारांशी 16 हजार 30 कोटींचे सामंजस्य करार यात झाले.
- तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
- वर्ल्ड असोसिएशन आॅफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम सह द्विपक्षीय भागीदारी करारावर स्वाक्षºया करण्यात आल्या.
- उद्योगांसाठी राज्यात सुमारे 40 हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. विविध परवान्यांऐवजी आता 48 तासांत महापरवाना दिला जाईल आणि औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाईल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली
61 गुणांसह बार्सिलोना अव्वल स्थानी:
- घरच्या मैदानावर खेळताना रेयाल माद्रिदने आयबर संघावर 3-1 असा विजय मिळवत ला-लीगा फुटबॉलमध्ये करोनानंतरच्या विश्रांतीनंतर थाटात सुरुवात केली.
- या विजयासह आघाडीवर असलेल्या बार्सिलोनासह रेयाल माद्रिदने जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे.
- टोनी क्रूस आणि सर्जियो रामोस यांनी रेयाल माद्रिदसाठी दोन गोल करत संघाला आघाडीवर आणले.
- त्यानंतर लगेचच मार्सेलो व्हिएरा याने तिसरा गोल करून गुडघ्यावर बसून आनंद साजरा केला.
- या कृतीतून त्याने सध्या जगभर सुरू असलेल्या कृष्णवर्णीयांच्या लढाईला एक प्रकारे पाठिंबाच दिला.
- या विजयासह रेयाल माद्रिदने 59 गुणांसह दुसरे स्थान कायम राखले. बार्सिलोना 61 गुणांसह अव्वल स्थानी आहे.
- रविवारी मध्यरात्री रेयाल सोसिएदाद आणि ओसासुना यांच्यात रंगलेली लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली.
दिनविशेष :
- सन 1903 मध्ये कंपनीची सुरवात झाली.
- न्यूयॉर्क येथे 16 जून 1911 मध्ये कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग (आय.बी.एम.) कंपनीची स्थापना झाली.
- प्रख्यात भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी झाला.
- सन 2010 मध्ये तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.