16 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
16 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 जुलै 2018)
देशात मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येत वाढ :
- संस्कृत भाषा फारशी वापरली जात नाही असा समज असला तरी 2011च्या जनगणनेनुसार संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या दहा वर्षांत दहा हजारांनी वाढली असून ही वाढ 71 टक्के आहे.
- देशातील 8.30 कोटी लोक मराठी बोलणारे असून त्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या देशाच्या 6.86 टक्के आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या 2001 मध्ये 7.19 कोटी होती. मराठी बोलणाऱ्यांची संख्या पंधरा टक्के वाढली आहे.
- हिंदी बोलणाऱ्या लोकांची संख्या 2001-2011 दरम्यान 10 कोटींपेक्षा अधिक वाढली असून बंगाली भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत 1.10 कोटींची वाढ झाली आहे.
- 2011 च्या जनगणनेचे आकडे नुकतेच जाहीर करण्यात आले असून 2001 मध्ये 14,135 जणांनी संस्कृत ही मातृभाषा असल्याचे सांगितले ते प्रमाण 2001 मध्ये 24,821 झाले आहे.
- भारताच्या 121 कोटी लोकसंख्येत 0.00198 टक्के लोक संस्कृत बोलणारे आहेत. हिंदी बोलणारे 52.83 कोटी लोक असून त्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या 43.63 टक्के आहे.
Must Read (नक्की वाचा):
फ्रान्स ठरला फिफा विश्वचषक 2018चा मानकरी :
- यंदाचा फिफा विश्वचषक पटकावत फ्रान्सने आणखी एक इतिहास रचला. विश्वचषक स्पर्धा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा जिंकण्याच्या यादीत आता फ्रान्सचेही नावा जोडल्या गेले.
- आतापर्यंत पाच देशांनी दोन किंवा त्याहून अधिक वेळा विश्वचषक जिंकला आहे. आता फ्रान्स हा सहावा देश आहे ज्याने दोन वेळा विश्वचषक पटकावले.
- फिफा विश्वचषक सर्वाधिक वेळा जिंकण्याची किमया ब्राझीलने केली. त्यांनी 1958, 1962, 1970, 1994, 2002 मध्ये चषक पटकाविले. त्यानंतर जर्मनीचा क्रमांक लागतो. त्यांनी चार वेळा म्हणजे 1954, 1974, 1990 आणि 2014 मध्ये स्पर्धा जिंकली होती. इटलीने सुद्धा चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 1934, 1938, 1982 आणि 2006 मध्ये त्यांनी चषकावर नाव कोरले आहे.
- तसेच उरुग्वेने 1930 आणि 1950 मध्ये चषक पटकाविला होता. इग्लंड (1966) आणि स्पेनने (2010) मात्र एकदाच ही स्पर्धा जिंकलेली आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी रजनीकांत यांचीही साथ :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या मोहिमेला आता सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांचीही साथ लाभली आहे.
- यंदाच्याच वर्षी राजकारणात प्रवेश करणाऱ्या रजनीकांत यांनी मोदींच्या या मोहिमेचे समर्थन केले आहे. या अनोख्या मोहिमेमुळे पैसा आणि वेळ अशा दोन्ही गोष्टींची बचत होईल हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
- एका कार्यक्रमात हजेरी लावली असता त्यांनी हे वक्तव्य केले. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही संकल्पना अतिशय वेगळी असून, त्यामुळे पैसा आणि वेळेची पूर्णपणे बचत होईल तेव्हा सर्वच पक्षांनी या मोहिमेत सहभागी होत एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
भारतीय वंशाच्या डॉक्टरचा लंडनमध्ये सन्मान :
- रुग्णांच्या शुश्रूषा करण्यात मोलाची कामगिरी केल्याबद्दल काश्मिरा सांगळे या महाराष्ट्रातील फिजिओथेरपिस्टचा इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेतर्फे (एनएसएस) सन्मान करण्यात आला. आता भारतात रुग्णांचे पुनर्वसन व रोजगारासाठी केंद्र उभारण्याचा त्यांचा निर्धार आहे.
- सांगळे या 2003 मध्ये महाराष्ट्रातून लंडनला गेल्या. तेथे त्यांनी रुग्णसेवा केली. गेल्या महिन्यात 70 जणांमधून वैद्यकीय सेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
- व्हीलचेअरवरील रुग्णांच्या सुविधांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी सांगळे यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले आहे.
- भारतातही अपंग रुग्णांची हेळसांड थांबावी यासाठी काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे. मणक्याची दुखापत तसेच रस्ते अपघातामध्ये जखमी होऊन अंथरुणावरच असलेल्यांसाठी पुनर्वसन तसेच रोजगार केंद्र सुरू करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
- तसेच याव्दारे समाजात त्यांना सन्मानाने जगता येऊन मुख्य प्रवाहात सामील होता यावे असा त्यांचा प्रयत्न आहे. या केंद्राद्वारे रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती :
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे.
- शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह या चौघांना राष्ट्रपतींनी राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्त केले आहे.
- सिनेसृष्टी आणि खेळ जगतातून एकाही प्रसिद्ध चेहेऱ्याला संधी मिळालेली नाही ही बाब महत्त्वाची आहे. कारण अभिनेत्री रेखा आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरीवरून बरीच टीका आणि चर्चा झाली होती. त्यामुळे सिनेसृष्टी आणि खेळ जगतातून कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही असे समजते आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवड केलेले चारही लोक हे आपल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. 2019च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चौघांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जाते आहे.
स्पॅनिश ग्रँड प्रिक्स स्पर्धेत विनेश फोगटला सुवर्णपदक :
- भारतीय कुस्तीला वेगळी ओळख निर्माण करुन देणाऱ्या फोगट भगिनींनी भारताची मान उंचावण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे.
- स्पेनच्या माद्रिद शहरात शहरात झालेल्या स्पॅनिश ग्रँड पिक्स कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटने 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
- 24 वर्षीय विनेश फोगटने कॅनडाच्या नताशा फॉक्सचा अंतिम फेरीत 10-0 च्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे.
- पात्रता फेरीपासून विनेशने आपल्या आक्रमक कुस्तीचा धडाका सुरुच ठेवला होता. पात्रता फेरीच्या सामन्यात विनेशने मेक्सिकोच्या मरियाना डाएझवर 10-0 असे निर्विवाद वर्चस्व मिलवले.
- तर अमेरिकेच्या एरिन गोलस्टनवर विनेशने 12-1 अशी मात केली. यानंतर प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला चीतपट करत विनेशने भारताला अंतिम फेरीत सुवर्णपदकाची कमाई करुन दिली.
दिनविशेष :
- सन 622 मध्ये प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.
- अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी 16 जुलै 1945 मध्ये केली.
- सन 1965 मध्ये ईटली व फ्रान्सला जोडणार्या माँट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले.
- गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय 16 जुलै 1998 रोजी घेण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा