16 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

लीना नायर
लीना नायर

16 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2021)

‘शनेल’च्या सीईओपदी लीना नायर :

  • लीना नायर यांची फ्रान्समधील लक्झरी फॅशन ब्रँड ‘शनेल’च्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे.
  • युनिलिव्हरमध्ये सर्वात कमी वयाच्या मुख्य मनुष्यबळ अधिकारी होत्या. नुकताच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असून जानेवारीमध्ये त्या शनेलची धुरा सांभाळणार आहेत.
  • लीना नायर यांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील होली क्रॉस शाळेत झाले.
  • 2016 मध्ये त्यांनी युनिलिव्हरमध्ये मुख्य मनुष्यबळ अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. आता शनेल या आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडची धुरा त्या सांभाळणार आहेत.
  • काही दिवसांपूर्वी मूळचे भारतीय वंशाचे असलेल्या पराग अगरवाल यांची ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली.
  • गूगलच्या अल्फाबेट कंपनीत सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टमध्ये सत्या नाडेला, आयबीएममध्ये अरविंद कृष्णा, अ‍ॅडोबमध्ये शंतनू नारायण आदी भारतीयांची उच्च अधिकारीपदावर नियुक्ती झाली आहे.

21 डिसेंबरच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार :

  • ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे.
  • यामुळे राज्य सरकारसोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला देखील मोठा फटका बसला आहे.
  • केंद्र सरकारला इम्पिरिकल डेटा देण्याचे निर्देश देता येणार नाहीत, असं आधीच न्यायालयानं स्पष्ट केल्यामुळे त्यावर राज्य सरकारच्या आशा संपुष्टात आल्या.
  • मात्र, हा डेटा राज्य सरकार गोळा करेपर्यंत राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
  • त्यामुळे येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायतींच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत. यासंदर्भात पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार आहे.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धात भारताच्या प्रणॉयची विजयी घोडदौड :

  • भारताच्या एचएस प्रणॉयने सलग दुसऱ्या विजयासह स्पेनमध्ये सुरू असलेल्या जागतिक र्अंजक्यपद बॅर्डंमटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
  • जागतिक क्रमवारीत 32व्या स्थानी असलेल्या प्रणॉयने दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या डॅरेन लिवला 21-7, 21-17 असे सरळ गेममध्ये पराभूत केले.
  • पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठणारा प्रणॉय हा किदम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांच्यानंतर तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीनेही आगेकूच केली.
  • त्यांनी 14व्या मानांकित लिओ श्वान श्वान आणि शा यु टिंग या चिनी जोडीवर 21-11, 9-21, 21-13 अशी मात केली.

दिनविशेष :

  • 16 डिसेंबर 1497 मध्ये वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
  • अमेरिकन राज्यक्रांती 16 डिसेंबर 1773 मध्ये बॉस्टन टी पार्टी.
  • 16 डिसेंबर 1854 मध्ये भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
  • 16 डिसेंबर 1946 मध्ये थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर 16 डिसेंबर 1985 मध्ये राष्ट्राला समर्पित.
  • 16 डिसेंबर 1911 मध्ये पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2021)

You might also like
2 Comments
  1. Krishna123 says

    sir plz current affairs daily takt ja khup fayda hoto 🙏

    1. Dhanshri Patil says

      नक्कीच.. यापुढे regular मिळतील.

Leave A Reply

Your email address will not be published.