16 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

अमेरिकेकडून 'WHO'चा निधी बंद
अमेरिकेकडून ‘WHO’चा निधी बंद

16 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 एप्रिल 2020)

टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी :

 • करोनामुळे देशभरात ठप्प झालेले आर्थिक व्यवहार 20 एप्रिलपासून काही प्रमाणात सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.
 • तर टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने बुधवारी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रामुख्याने शेती आणि ग्रामीण भागांतील उद्योग आणि उत्पादन क्षेत्रांना मुभा देण्यात आली आहे.
 • तसेच रोजगार हमीअंतर्गत सिंचन व जलसंधारण, बांधकाम क्षेत्रातील कामांद्वारे रस्तेविकास, बांधकाम प्रकल्पांच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्याद्वारे मजुरांना काम मिळेल आणि त्यांच्या हाती पैसा उपलब्ध होऊ शकेल.
 • शेती क्षेत्राशी जोडलेले कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायासारख्या क्षेत्रांतील व्यवहारांनाही टाळेबंदीतून सवलत देण्यात आली आहे.
 • जीवनावश्यक व बिगरजीवनावश्यक वस्तूंच्या आंतरराज्यीय वाहतुकीलाही परवानगी दिल्याने ट्रक वाहतूकही सुरू होईल. उत्पादन क्षेत्रालाही आधार देण्यात आला असून विशेष आíथक क्षेत्रातील उद्योग कार्यरत होतील. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित उद्योगांनाही मुभा देण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 एप्रिल 2020)

अमेरिकेकडून ‘डब्ल्यूएचओ’चा निधी बंद :

 • आधीच इशारा दिल्यानुसार अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेची आर्थिक मदत बंद केली आहे.
 • तर दरवर्षी अमेरिका आरोग्य संघटनेला 50 कोटी डॉलर्सची मदत देत असते, पण यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची साथ गलथानपणे हाताळतानाच चीनकेंद्री भूमिका घेतल्याचा ठपका ठेवून ही मदत बंद करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन जाहीर केला आहे.
 • करोनाची साथ पसरवण्याच्या व त्यातील माहिती दडवण्याच्या चीनच्या कृत्यांवर जागतिक आरोग्य संघटनेने पांघरूण घातले असा आरोप अमेरिकेने केला आहे.
 • तर आतापर्यंत कोविड-19 साथीत जगात 1,19,000 बळी गेले असून अमेरिकेत पंचवीस हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.

अमेरिकी अर्थव्यवस्था पुनरुज्जीवन सल्लागार गटात सहा भारतीय अमेरिकी व्यक्तींचा समावेश :

 • अमेरिकेची अर्थव्यवस्था करोना र्निबधानंतर पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेवर सल्लामसलतीसाठी नेमलेल्या सल्लागार गटात अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा अमेरिकी भारतीय उद्योगधुरिणांची नेमणूक केली आहे.
 • गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई व मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांचा त्यात समावेश आहे.
 • देशातील बुद्धिमान व्यक्तींचा सल्ला आम्ही अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करताना घेत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
 • अमेरिकी अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात पहिल्या क्रमांकाची असून करोनामुळे 33 कोटी लोकांपैकी 97 टक्के लोकांना घरातच थांबण्यास सांगण्यात आल्याने अमेरिकेतील अर्थचक्र थांबले असून 1.60 कोटी लोकांनी रोजगार गमावले आहेत.
 • तर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी देशातील उद्योग व विविध क्षेत्रातील दोनशे धुरिणांचा समावेश असलेले सल्लागार गट तयार केले आहेत. हे सर्वजण अर्थव्यवस्था सुरळित करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांना शिफारशी करणार आहेत.
 • तर पिचाई व नाडेला यांच्याशिवाय आयबीएमचे अरविंद कृष्णा, मायक्रॉनचे संजय मेहरोत्रा यांचा तंत्रज्ञान क्षेत्राशी सल्लागार गटात समावेश असून त्यात अ‍ॅपलचे टिम कुक, ओरॅकलचे लॅरी एलीसन, फेसबुकचे मार्क झकरबर्ग यांनाही स्थान मिळाले आहे.
 • उत्पादन क्षेत्राशी संबंधित गटात पेरनॉड रिकार्डमधील भारतीय अमेरिकी अधिकारी अ‍ॅन मुखर्जी यांचा समावेश केला असून त्यात कॅटलपिलरचे जिम उमप्लेबाय, टेस्लाचे इलन मस्क, फियाट ख्रिस्लरचे माइक मॅन्ली, फोर्डचे बिल फोर्ड व जनरलच्या मेरी बॅरा हेही आहेत.
 • आर्थिक सेवा सल्लागार गटात मास्टर कार्डचे अजय बंगा, व्हिसाचे एल केली, ब्लॅकस्टोनचे स्टीफन श्वार्झमन, फिडेलेटीचे अबिगेल जॉन्सन, इन्टय़ुइटचे सासन गुडार्झी यांचा समावेश आहे.

वृत्त प्रकाशकांसाठी Google चा पुढाकार:

 • सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदेही बंद आहेत. वृत्तपत्र आणि माध्यमांनाही करोनाचा मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत गुगलनं पुढाकार घेत माध्यमांसाठी आपात्कालिन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तर जागतिक स्तरावरील छोट्या, मध्यम आणि स्थानिक वृत्त प्रकाशकांसाठी गुगलनं ‘जर्नलिझम इमर्जंन्सी रिलिफ फंड’ची सुरूवात केली. बुधवारी गुगलनं यासंदर्भात घोषणा केली.
 • करोनाच्या पार्श्वभूमीवर मूळ बातम्या देणाऱ्या संस्थांसाछी हा निधी वापरला जाणार आहे. संस्था किती मोठी आहे किंवा किती छोटी आहे, याप्रमाणे देण्यात येणाऱ्या निधीची रक्कम ठरणार असल्याचं गुगलनं स्पष्ट केलं आहे.
 • तसंच हा निधी निरनिराळ्या क्षेत्रांच्या धर्तीवर कमी जास्त असू शकतो. दरम्यान, वृत्त प्रकाशकांना या निधीसाठी अर्जही करता येणार आहे. 29 एप्रिल ही अर्ज करण्याची अखेरची तारीख असेल. अर्ज मिळाल्यानंतर कोणाकोणाला आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं गुगलकडून जाहीर करण्यात येईल.

भारतीय महिला 2021 विश्वचषकासाठी पात्र :

 • 2021 साली न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ पात्र ठरला आहे. आयसीसीने याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे.
 • भारतीय महिलांसह यजमान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
 • तर 6 फेब्रुवारी ते 7 मार्च 2021 रोजी न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
 • तसेच आयसीसीच्या तांत्रिक समितीची बैठक नुकतीच पार पडली, ज्यामध्ये Women’s Championship मध्ये सहभागी झालेल्या संघांना समसमान गुण देण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला.

रशिया, यूएईला पाठवणार HCQ औषधांचा साठा :

 • करोना व्हायरसमुळे सर्वाधिक बेजार झालेल्या अमेरिका, स्पेन आणि युनायटेड किंगडम या देशांना भारताने सर्वप्रथम हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा केला.
 • त्यानंतर भारत आता रशिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांना HCQ, पॅरासीटेमॉल या औषधांचा पुरवठा करणार आहे. रशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे भारताचे सर्वात जवळचे मित्र आणि रणनितीक भागीदार असलेले देश आहेत.
 • तसेच युगांडा, इक्वाडोर या देशांनाही HCQ औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे. रशियाला दोन औषधांचा पुरवठा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
 • आखाती देशांवर विशेषकरुन संयुक्त अरब अमिरातीवर भारताचे विशेष लक्ष आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्ष श्रिंगला हे आखाती देशांच्या संपर्कामध्ये आहेत.
 • तर बहरीनला सुद्धा HCQ च्या गोळया पाठवण्यात आल्या आहेत. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध करोना व्हायरसवर सर्वाधिक प्रभावी ठरत असल्याने जगभरातून या औषधाला मोठया प्रमाणावर मागणी आहे.

‘एच-1 बी’ व्हिसाला आठ महिन्याची मुदतवाढ :

 • कोरोनाच्या साथीमुळे अमेरिकेतील स्थलांतरितांसमोर निर्माण झालेल्या समस्यांची जाण ठेवून ‘एच-1 बी’ व्हिसाची मुदत आठ महिन्यांनी वाढविण्यास परवानगी देण्याचा निर्णय अमेरिकी सरकारने घेतला आहे.
 • तर त्याचा सर्वात मोठा फायदा अमेरिकेत काम करणारे भारतीय आयटी इंजिनिअर व बी1/बी2 प्रकारच्या व्हिसावर त्या देशात गेलेल्या व कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय पर्यटकांनाही होणार आहे.
 • अमेरिकेमध्ये एच-1बी व्हिसाधारकांपैकी एकतृतीयांश लोक भारतीय आहेत. तिथे काम करणारे व एच-1 बी’व्हिसाची मुदत संपत आलेले भारतीय आयटी इंजिनिअर व अन्य नोकरदार या निर्णयामुळे खूश झाले आहेत.

दिनविशेष:

 • 16 एप्रिल हा दिवस ‘जागतिक ध्वनी दिन‘ आहे.
 • सन 1853 मध्ये भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.
 • विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार ‘चार्ली चॅपलीन‘ यांचा जन्म 16 एप्रिल 1889 मध्ये झाला होता.
 • सन 1922 मध्ये मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
 • राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना सन 1948 मध्ये झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.