15 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
15 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 सप्टेंबर 2020)
ECOSOC या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली:
- (ECOSOC) ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली.
- युक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.
- “प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
- आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतो.
- भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं 54 सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला.
- या विजयानंतर भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. 2021 ते 2025 या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
आजपासूनच संसदेच्या पावसाळी अधिवशनाला सुरुवात झाली:
- शेअर बाजाराची आजच्या आठवड्याची सुरुवात तेजीनं झाली आहे. आज (सोमवार) बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्सने 369.95 अंकांची वाढ नोंदवत 39,224 वर पोहोचला.
- तर निफ्टी 75.70 अंकांनी वाढ नोंदवत 11,540.15 वर उघडला.
- आजपासूनच संसदेच्या पावसाळी अधिवशनाला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर बाजाराची उत्साहाच्या वातारणात सुरुवात झाली.
- व्याजदरांवर अमेरिकन केंद्रीय बँकेचे निर्णय आणि चलनवाढीमुळे बाजाराला दिशा मिळू शकते.
- बाजार खुला होण्यापूर्वी सकाळी 9.10 वाजता सेन्सेक्स 218.96 अंकांसोबत म्हणजे 0.6 टक्क्यांच्या वाढीसह 39,076.51 स्तरावर होता. तर निफ्टीत 15.20 अंकांनी (0.13 टक्के) वाढ होत 11,464.45 वर पोहोचला होता.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आता एनर्जी वेपनच्या तंत्रज्ञानावर काम करत:
- हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी केल्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आता एनर्जी वेपनच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे.
- डीआरडीओ एनर्जी वेपनच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची योजना बनवत आहे.
- डायरेक्टेड एनर्जी वेपनमध्ये लेझर किरण आणि उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींचा समावेश होतो. हे भविष्यातील युद्ध लढण्याचे तंत्रज्ञान आहे.
- ज्यामध्ये मिसाइल, फायटर विमान लेझर किरणं किंवा उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींनी नष्ट करता येईल.
- अमेरिका, चीन आणि युरोपियन देश हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मोठया प्रमाणावर मेहनत घेत आहेत.
- भारतातही या कार्यक्रमावर काम सुरु आहे पण आता त्याची व्याप्ती आणखी वाढवण्यात येईल.
ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमची अलेक्झांडर झेवरेव्हवर मात:
- ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पहिले ग्रँडस्लॅम पदक मिळवले आहे.
- पहिल्या दोन सेटमध्ये पराभव झाल्यानंतर थिमने जोरदार पुनरागमन करत शेवटचे तीनही सेट जिंकले.
- जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. 4 तास 2 मिनिटे सुरु असलेल्या या सामन्यात सहा वर्षात पहिल्यांदाच युएस ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळला आहे.
- अलेक्झांडर थिमविरुद्धच्या सलामीच्या पहिल्या दोन सेटमध्ये 2-6, 4-6 अशी आघाडी घेतली होती, पण नंतर थीमने दमदार पुनरागमन करत 6-4, 6-3, 7-6 अशा फरकाने बाकीचे सेट जिंकले.
- तिसऱ्या सेटमध्ये क्लॅनने दमदार पुनरागमन केले आणि 3-6 असा सेट जिंकला.
दिनविशेष :
- भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा 15 सप्टेंबर 1861 मध्ये मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म झाला.
- 15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन, जागतिक लिंफोमा जागृती दिन तसेच राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
- सन 1935 मध्ये भारताचे पहिले पब्लिक स्कूल ‘द डून स्कूल’ सुरू झाले.
- सन 1935 मध्ये जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
- भारतीय सैन्याने सन 1948 मध्ये निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.
- सन 1953 मध्ये श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
- प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा सन 1959 मध्ये सुरू झाली.