15 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

15 September 2018 Current Affairs In Marathi

15 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 सप्टेंबर 2018)

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल:

 • भारत व अमेरिका यांच्यात दोन अधिक दोन संवादाची प्रक्रिया अलीकडेच दिल्लीत पार पडल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल हे ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनला गेले आहेत.
 • डोव्हल यांनी ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटीगाठी सुरू केल्या असून, त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या फॉगी बॉटम मुख्यालयात मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. ते त्यांचे समपदस्थ जॉन बोल्टन यांनाही भेटणार असून संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. डोव्हल यांच्या भेटीविषयी व्हाइट हाऊस व वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने काहीही सांगितलेले नाही. Ajit Doval
 • परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हिथर नोएर्ट यांनी सांगितले, की भारत हा अमेरिकेचा जवळचा मित्र आहे. हिथर या पॉम्पिओ यांच्यासमवेत गेल्या आठवडय़ात दिल्लीमध्ये दोन अधिक दोन संवादासाठी उपस्थित होत्या. त्यांनी एका सांगितले, की दोन्ही देशात लोकपातळीवर चांगला संपर्क आहे. त्यामुळे भेटीगाठी व संवाद होणार हे उघड आहे.
 • कम्युनिकेशन्स कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अ‍ॅरेंजमेंट म्हणजे कॉमकासा कराराबाबत त्यांनी सांगितले, की हा महत्त्वाचा करार बराच काळपासून प्रलंबित होता. या करारामुळे रोजगाराला प्राधान्य मिळणार असून लष्करी सहकार्यही वाढणार आहे. डोव्हाल यांच्या भेटीत द्विपक्षीय व सुरक्षा संबंधांवर चर्चा होणार असून, त्यात दहशतवादाच्या मुद्दय़ाचा समावेश राहील.

अवकाश मोहिमेत आता हवाई दलाचाही सहभाग:

 • मानवाला अवकाश मोहिमेवर पाठविण्याच्या निवड प्रक्रियेमध्ये भारतीय हवाई दलाचाही सहभाग असणार आहे. यासंबंधीच्या अभ्यासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 2022च्या अंतिम मुदतीपर्यंत यामध्ये यश येईल, असा विश्‍वास हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी व्यक्त केला.
 • एरोस्पेस मेडिसिन संस्था आधीपासूनच अंतराळवीरांच्या निवडीत सक्रिय सहभागी आहे. आम्हीही आता सहभागी होऊ. अतिशय कमी कालावधीत आम्ही ही कामगिरी बजावण्यात सक्षम होऊ याची मला खात्री आहे, असे त्यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
 • इंडियन सोसायटी ऑफ एरोस्पेस मेडिसिनच्या तीन दिवसांच्या 57व्या वार्षिक परिषदेत धनोआ बोलत होते. एरोस्पेस मेडिसिन तज्ज्ञ हे प्रत्यक्ष कार्यस्थळावर हवाई कर्मचाऱ्यांचे सर्वोत्कृष्ट मित्र असतात, असेही त्यांनी नमूद केले.
 • यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी केलेल्या भाषणात भारतीय अंतराळवीर 2022पर्यंत अंतराळात प्रवास करतील, असा विश्‍वास व्यक्त केला होता. याच मुद्द्यावर बोलताना भारतीय एरोस्पेस मेडिसिन कमांडंटचे एअर कमोडोर अनुपम अगरवाल यांनीही अंतरावीरांची निवड करण्यासाठी आम्हाला 12 ते 14 महिन्यांचा कालावधी लागेल, असे स्पष्ट केले. अवकाश प्रवासासाठी अंतराळवीर तयार करणे हे आमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2018ला सुरुवात:

 • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली असली तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी खास पर्वणी राहिली आहे. याच पाश्र्वभूमीवर 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे. Asia Cup 2018
 • गेल्या काही वर्षांत बागंलादेशने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2016 मध्ये मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच 2012 मध्येसुद्धा त्यांनी मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत मजल मारली होती. बागंलादेशची फलंदाजी अनुभवी तमिम इक्बाल आणि शकिब-अल-हसन यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे.
 • दुसरीकडे श्रीलंकेला गेल्या दोन वर्षांत भारताकडून तिन्ही प्रकारात सपशेल शरणागती पत्करावी लागली. अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगावर श्रीलंकेची भिस्त आहे. त्याशिवाय युवा खेळाडू अकिला धनंजया, दसून शनाका आणि कसुन रजिथा यांच्याकडे ही सर्वाच्या नजरा आहेत. कामगिरीतील सातत्य राखण्यात श्रीलंकेला मागील काही मालिकांपासून अपयश येत आहे. यावर त्यांना लवकरच योग्य तोडगा काढावा लागेल.

इराणकडून तेल आयातीत कपात:

 • अमेरिकेने इराणबरोबर 2015 साली केलेल्या अणुकरारातून माघार घेऊन इराणविरुद्ध निर्बंध लागू केल्याने भारताला तेथून आयात केल्या जाणाऱ्या खनिज तेलात कपात करावी लागणार आहे.
 • इराण अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवत नसल्याचे कारण देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी केलेल्या बहुराष्ट्रीय अणुकरारातून माघार घेतली.
 • तसेच इराणवर नव्याने आर्थिक निर्बंध लादले. त्यानुसार इराणशी तेल आणि अन्य व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशांवरही अमेरिका निर्बंध लादू शकते. इराणवरील तेलविषयक निर्बंध 4 नोव्हेंबरपासून लागू होत आहेत. Oil
 • अमेरिकेकडून होणारी संभाव्य कारवाई थोपवायची असेल तर तत्पूर्वी इराणमधून होणारी तेल आयात थांबवावी लागणार आहे.
 • या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताच्या तेल खात्याने सरकारी तेल कंपन्यांना त्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांत मोठय़ा प्रमाणात तेल आयात केली.
 • या काळात भारत इराणकडून दररोज 6,58,000 बॅरल तेल आयात करत होता; पण आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत त्यात 45 टक्के कपात होऊन ते प्रमाण 3,60,000 बॅरलवर येण्याची शक्यता आहे.

दिनविशेष:

 • भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा 15 सप्टेंबर 1861 मध्ये मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म झाला.
 • 15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन, जागतिक लिंफोमा जागृती दिन तसेच राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
 • सन 1935 मध्ये भारताचे पहिले पब्लिक स्कूल ‘द डून स्कूल’ सुरू झाले.
 • सन 1935 मध्ये जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
 • भारतीय सैन्याने सन 1948 मध्ये निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.
 • सन 1953 मध्ये श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
 • प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा सन 1959 मध्ये सुरू झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.