15 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
15 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2019)
अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातलं नोबेल जाहीर :
- अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
- तर हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मायकल क्रेमर अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- तसेच याआधी अर्थशास्त्रातला नोबेल देऊन अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना देण्यात आला होता. त्यांच्यानंतर प्रदीर्घ काळाने भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे.
- रविंद्रनाथ टागोर, सी. व्ही. रामन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यर्थी या पाचजणानंतर नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजित बॅनर्जी हे सहावे भारतीय आहेत. तर अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातले नोबेल मिळवणारे
अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय ठरले आहेत. - तसेच रविंद्रनाथ टागोर यांना साहित्यातील योगदानासाठी, सी. व्ही. रामन यांना भौतिकशास्त्रातील योगदानासाठी, मदर तेरेसा यांना शांततेचा, अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठी, कैलाश सत्यर्थी यांना शांततेचा तर आता
अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठीचा नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे. - आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी नोबेल पुरस्कार दिला जातो. नोबेल पुरस्कार हा जगातला सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार समजला जातो. आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांच्या पाचव्या पुण्यतिथीपासून म्हणजे 10 डिसेंबर 1901 पासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र, साहित्य आणि शांतता या विभागांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
Must Read (नक्की वाचा):
पीएमसी’ खातेधारकांना आता 40 हजार रुपये काढता येणार :
- पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने ‘पीएमसी’ बँकेच्या खातेधारकांसाठी खात्यातील पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.
- तर आता या बँकेचे खातेधारक सहा महिन्यांच्या कालावधीत 40 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. या अगोदर पैसे काढण्याची मर्यादा 25 हजार रुपये होती.
- तर याप्रकरणी ईडीने ‘एचडीआयएल’चे संचालक, प्रवर्तक यांच्यासह पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांची तब्बल 3 हजार 830 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे.
फायनलच्या सुपर ओव्हरवर आयसीसीचा नवा नियम :
- 2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र मर्यादीत षटकं आणि सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिल्यामुळे इंग्लंडला अधिक चौकारांच्या निकषावर विजेता जाहीर
- करण्यात आलं. आयसीसीच्या या निर्णयावर नंतर टीकाही करण्यात आली होती. अखेरीस आयसीसीने तो वादग्रस्त निर्णय रद्द केलेला आहे. आयसीसीवे यासंदर्भात पत्रक जाहीर करत माहिती दिली आहे.
- आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावण्यात येण्याचा निर्णय कायम असणार आहे. मात्र साखळी फेरीत जर सुपर ओव्हरवर सामना अनिर्णित राहिला तर तो अधिकृतरित्या अनिर्णित घोषित केला जाईल. मात्र उपांत्य किंवा अंतिम फेरीत सुपर ओव्हरवर सामना अनिर्णित राहिला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.आयसीसीने आपली बाजू स्पष्ट केली आहे.
दिनविशेष:
- 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ आहे.
- सन 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
- 15 ऑक्टोबर 1918 हा दिवस भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचा स्मृतीदिन आहे.
- वैज्ञानिक आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला.
- हरगोविंद खुराणा यांना सन 1968 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा