15 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

15 November 2018 Current Affairs In Marathi

15 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 नोव्हेंबर 2018)

नेताजींच्या स्मरणार्थ सरकार आणणार 75 रुपयांचे नाणे:

 • मोदी सरकार लवकरच 75 रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे. सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेयरमध्ये तिरंगा फडकावलेल्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नेताजींच्या स्मरणार्थ 75 रुपयांचे नाणे चलनात आणले जाईल. अर्थ मंत्रालयाने याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे.
 • पोर्ट ब्लेयरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला, त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मरणार्थ केंद्र सरकार 75 रुपयांचे नाणे चलनात आणेल, असे अर्थ मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे.
  तसेच सध्या या नाण्याची निर्मिती सुरू आहे. या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल. यासाठी 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे आणि प्रत्येकी 5-5 टक्के निकेल आणि जस्त वापरण्यात येईल.
 • सेल्युलर जेलच्या समोर तिरंग्याला वंदन करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं चित्र या नाण्यावर असेल. त्या खाली 30 डिसेंबर 1943 या तारखेचा उल्लेख असेल. नेताजींनी याच दिवशी पोर्ट ब्लेयरच्या सेल्युलर जेलबाहेर तिरंगा फडकावला होता.
  सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान मोदींनी 21 ऑक्टोबरला लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला होता. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इस्त्रोकडून GSAT-29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण:

 • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने बुधवारी (14 नोव्हेंबर) संध्याकाळी GSLV-MK-III D2 या प्रक्षेपकाव्दारे GSAT-29 या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. जीएसएलएव्हीने संध्याकाळी 5.08 मिनिटांनी जीसॅट-29 उपग्रहासह अवकाशाच्या दिशेने उड्डाण केले.
 • आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे प्रक्षेपण झाले. जीसॅट-29ला अवकाश कक्षेत सोडल्यानंतर इस्त्रोने मोहिम पूर्ण झाल्याचे टि्वट केले. जीएसएलव्ही भारताचे सर्वात वजनदार रॉकेट असून त्याला बाहुबली सुद्धा म्हटले जाते.
 • कुठल्याही अडथळयाविना हे प्रक्षेपण पार पडले. गाजा वादळामुळे हे उड्डाण लांबणीवर जाण्याची शक्यता होती. पण सुदैवाने नियोजित प्रक्षेपणात कुठलीही अडचण आली नाही. श्रीहरीकोटोवरुन झालेले हे 67वे प्रक्षेपण होते. जीसॅट-29 हा भारताचा 33वा दळणवळण उपग्रह आहे.

नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष यांच्यात व्यापक चर्चा:

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यात संरक्षण आणि व्यापारातील सहकार्यासह व्यापक व्दिपक्षीय तसेच परस्पर हिताच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली. दहशतवादाचा सामना करण्याचे उपाय आणि भारत-पॅसिफिक क्षेत्र मुक्त व खुले ठेवण्याच्या आवश्यकतेबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.
 • येथे झालेल्या पूर्व आशिया परिषदेच्या (ईस्ट एशिया समिट) निमित्ताने दोन्ही नेत्यांची सौहार्दपूर्ण भेट झाली. प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांबाबत वाढत्या सहकार्यावर आधारित महत्त्वपूर्ण भागीदारीच्या सर्व मुद्दय़ांवर दोघांचीही उपयुक्त चर्चा झाली, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.
 • मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला 26 नोव्हेंबर रोजी दहा वर्षे पूर्ण होत असल्याचा संदर्भ देऊन पेन्स यांनी दहशतवादाला तोंड देण्याबाबत दोन्ही देशांच्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
 • तर मोदी यांनी पेन्स यांचे आभार मानतानाच, जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचे मूळ आणि त्यांचे उगमाचे ठिकाण एकच असल्याची कुठल्याही देशाचे किंवा संघटनेचे नाव न घेता आठवण करून दिली.
 • व्यापाराशी संबंधित व्दिपक्षीय मुद्दय़ांवरही दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या दोन वर्षांत अमेरिकेची भारतातील आयात 50 टक्क्यांनी वाढली आहे, याचा मोदी यांनी उल्लेख केला.

राज्य शासनाच्या महा-परिवर्तनमध्ये 6 प्रकल्प:

 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘महापरिवर्तन‘ मेळाव्यात पुणे महापालिकेच्या हद्दीत सीएसआर निधीतून राबविण्यात येणाऱ्या 6 प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांच्या या वेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर (एमओयू) सही करण्यात येणार आहे.
 • शासनाने उत्पन्न आणि वाढत्या अपेक्षा या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) माध्यमातून शासन व खाजगी भागीदारांनी एकत्र येऊन राज्यात महापरिवर्तन घडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.
 • तर यासाठी गतवर्षी मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात राज्यात आरोग्य, जलसंधारण, पोषण, कौशल्य विकास आदी विविध क्षेत्रांत अनेक खाजगी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यंदादेखील जानेवारी 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात ‘महा-परिवर्तन’ मेळावा घेण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेच्या हद्दीत खाजगी संस्थांच्या माध्यमातून सीएसआर निधीतून विविध प्रकल्प राबविण्यात येतात.
 • तसेच यापैकी 6 प्रकल्प या मेळाव्यात सादर करण्यात येणार असून, शासनासोबत याबाबत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी सांगितले.
 • नव्या कंपनी कायद्यामुळे ‘सीएसआर’वर खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंपन्यांनी मिळविलेल्या नफ्यातून काही हिस्सा सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी खर्च करायला हवा, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार टाटा, अक्षयपत्र, पिरामल स्वास्थ्य, रुबल नागी आर्ट फाउंडेशन, द फूट फाउंडेंशनच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेल्या सहा प्रकल्पांचा या महा-परिवर्तन मेळाव्यात सादर करण्यात येणार आहे.

हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती:

 • आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा दास हिची UNICEFची भारतीय युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 • हिमा मुलांचे अधिकार आणि गरजा यांच्याबाबत जागरुकता निर्माण करणे, मुले व युवकांच्या समस्या मांडणे यात कार्यरत असणार आहे आणि या निमित्ताने समाजाच्या विकासात आपले योगदान देणार आहे.
 • हिमा दासने IAAF वर्ल्ड अंडर 20 अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये तिने 400 मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली होती. 18 वर्षीय हिमाने 51.46 सेकंदात 400 मीटरचे अंतर पार करीत पहिली जागा मिळवली होती.

दिनविशेष:

 • 15 नोव्हेंबर 1949 रोजी महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसेनारायण आपटे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
 • सन 1971 इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप 4004 प्रकाशित केले.
 • भारतीय लॉन टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 मध्ये झाला.
 • सचिन तेंडुलकरने 15 नोव्हेंबर 1989 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले होते.
 • सन 2000 मध्ये झारखंड हे देशाचे 28वे राज्य तयार झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
 1. Zaheer Pathan says

  It’s my email id

Leave A Reply

Your email address will not be published.