15 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs
15 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 मे 2022)
संयुक्त अरब अमिरात अध्यक्षपदी शेख मोहम्मद बिन झायेद :
- संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- शुक्रवारी अमिरातीचे अध्यक्ष खलीफा बिन जायेद अल नाह्यान यांच्या निधन झाले.
- त्यानंतर सात अमिरातींच्या अबुधाबीतील अल मुश्रीफ महालात झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
- शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या घराण्याकडे संयुक्त अरब अमिरातीची वंशपरंपरेने सत्ता आहे.
- 1971 मध्ये या सात अमिराती एकत्र येऊन स्वतंत्र देशनिर्मितीनंतर अवघ्या तिसऱ्यांदा सत्तेचा खांदेपालट झाली.
Must Read (नक्की वाचा):
पंजाबमध्ये कारागृहातील व्हीआयपी कल्चर संपुष्टात :
- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कारागृहातील व्हीआयपी संस्कृतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
- तर त्यांनी कारागृहातील सर्व व्हीआयपी खोल्या कारागृह व्यवस्थापन ब्लॉकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच कारागृहात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
- यापूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना कडक इशारा दिला होता.
- कोणत्याही गाण्यात बंदूक संस्कृती आणि गुंड संस्कृती स्वीकारली जात नाही, असे ते म्हणाले होते.
मुंबईत नौदलाच्या दोन युद्धनौका ‘सूरत’ आणि ‘उदयगिरी’चे जलावतरण :
- भारतीय नौदलात ठारविक कालावधीनंतर विविध प्रकारच्या युद्धनौका या निवृत्त होत असतांना, त्यांची जागा नवीन युद्धनौका ( warships) घेत असते.
- काळानुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार, बदलत्या युद्धरणनितीनुसार अनेक बदल करत नव्या युद्धनौकांची उभारणी केली जाते.
- तर याचाच एक भाग म्हणून देशातील विविध गोदींमध्ये विविध क्षमतेच्या युद्धनौकांची बांधणी युद्धपातळीवर सुरु आहे.
- मुंबईतील माझागाव गोदीमध्ये ( Mazgaon Docks Limited) सध्या दोन महत्त्वाच्या युद्धनौकांची बांधणी सुरु आहे.
- तर यापैकी विनाशिका ( Destroyer) आणि फ्रिगेट प्रकारातील प्रत्येकी एक अशा एकुण दोन युद्धनौकांचे जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत 17 मे ला होणार आहे.
- विनाशिकेचं नाव सूरत ( INS Surat -D69) आहे तर उदगिरी ( Udaygiri ) असं फ्रिगेटचे नाव आहे.
- अर्थात या युद्धनौका प्रत्यक्ष नौदलाच्या सेवेत दाखल होतील तेव्हा त्यांना ही संबंधित नावे देण्यात येतील.
- सध्या सूरतला Yard No – 12707 या नावाने ओळखले जाते. तर उदगिरीला Yard No – 12653 या नावाने ओळखले जाते आहे.
विराट कोहलीने रचला नवा विक्रम :
- विराट कोहलीने पंजाबविरोधात खेळताना एक मोठा विक्रम केला आहे.
- आयपीएलमध्ये 6500 धावांपर्यंत मजल मारणारा तो पहिला खेळाडू ठरलाय.
- विशेष म्हणजे आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
- हरप्रीत ब्रारने टाकलेल्या चेंडूवर फटका मारताच त्याने 6500 धावांचा टप्पा ओलांडला.
- विराटनंतर 6000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये सध्या पंजाब किंग्जकडून खेळणारा शिखर धवन हा एकमेव खेळाडू आहे.
- त्यानंतर या रांगेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा डेविड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दिनविशेष :
- 15 मे : भारतीय वृक्ष दिन.
- 15 मे : जागतिक कुटुंब दिन.
- जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी 15 मे 1718 मध्ये घेतले.
- रॉबर्ट वॉल्पोल 15 मे 1730 मध्ये युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
- 15 मे 1811 मध्ये पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.
- सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्या बेलीज बीड्सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी 15 मे 1836 मध्ये सर्वप्रथम निरीक्षण केले.
- मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात 15 मे 1935 मध्ये झाली.
- 15 मे 1940 मध्ये दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.