15 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

15 March 2019 Current Affairs In Marathi

15 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 मार्च 2019)

WhatsApp मध्ये मिळणार Google चं खास फीचर:

  • जगभरातील पॉपुलर असलेले व्हॉट्सअ‍ॅपने आता नवीन फीचर आणले जाणार आहे. युजर्सना अधिक सजकतेने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता यावा. तसेच, फेकन्यूजवर प्रतिबंध ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जाहिरातींसोबतच व्हॉट्सअ‍ॅप आता फीचर्समध्येही काही बदल करत आहे.
  • तसेच फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी गुगलचे रिव्हर्स इमेज सर्च आहे, यानुसार फोटो खरे आहेत की मार्फ केले आहेत, याची माहिती कळणार आहे.
  • तर रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर फेक न्यूज आणि फोटो शेअर करण्यात येत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप सुद्धा गुगल सारखेच करण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच व्हॉट्सअॅप कंपनीने नवीन फीचरच्या माध्यमातून फेक माहिती आणि फोटोंवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यार आहे.
  • WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅन्ड्रॉईडसाठी व्हॉट्सअ‍ॅप 2.19.73 अपडेटमध्ये Search Image चा ऑप्शन दिसत आहे. यामध्ये कंपनीकडून गुगल API चा वापर करण्यात येईल अशी शक्यता आहे. कारण, रिव्हर्स
    सर्च केला जाऊ शकतो. जर असे झाले तर एखादा फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून गुगलवर रिव्हर्स सर्च करुन त्यातून फोटोची माहिती घेण्यात येईल. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देण्यात आलेले रिव्हर्स सर्च फीचर कसे काम करणार आहे,
    त्याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र, असे समजते की, फेक फोटोंना काहीप्रमाणात लगाम लावला जाणार आहे.
  • तर WABetainfo च्या माहितीनुसार, एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये Search Image चा ऑप्शन दिसत आहे. हे बीटा व्हर्जनमध्ये आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा वापरण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअ‍ॅप बीटा टेस्टिंग
    प्रोग्रॉमचा भाग बनवावा लागेल. दरम्यान, हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या फायलन बिल्डमध्ये कधी येणार आहे, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नाही.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मार्च 2019)

पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती राज्यात अव्वल:

  • पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात लाभार्थ्यांना ऑनलाईन माहिती मिळावी व त्यांना अर्जासह व कामांच्या प्रगतीवर मिळणारे अनुदानाचा तत्काळ लाभ व्हावा, यासाठी अमरावती महापालिकेच्या या विभागाने ऑनलाईन अंमलबजावणीसाठी एक सॉफ्टवेअर तयार केले. केंद्र शासनाच्या केंद्रीय शहरी गृहनिर्माण विभागाने याची दखल घेतली. ही यशोगाथा या विभागाच्या संकेतस्थळावर स्थानबद्ध झाली आहे
  • तसेच देशांतर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांतील प्रत्येकी एका शहराची यशोगाथा या संकेतस्थळावर आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती महापालिकेचा बहुमान या यशोगाथेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
  • विशेष म्हणजे या योजनेच्या अमलबजावणीसाठी अमरावती महापालिका राज्यात अव्वल ठरली आहे.
  • तर महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक चार अंतर्गत 637 लाभार्थ्यांच्या डीपीआरला केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत एकूण 5,369 लाभार्थ्यांच्या
    डीपीआरला आतापर्यंत मान्यता मिळाली आहे.

कर्तारपूर यात्रेकरूंना व्हिसामुक्त प्रवेश देण्याची भारताची मागणी :

  • पुलवामात करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि भारताने त्याला दिलेले चोख प्रत्युत्तर यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या शिष्टमंडळांमध्ये ही पहिलीच बैठक झाली.
  • कर्तारपूरमधील ऐतिहासिक शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्यासाठी पाकिस्तानने दररोज भारतातील पाच हजार यात्रेकरूंना व्हिसामुक्त प्रवेश द्यावा, अशी मागणी भारताने केली.
  • पंजाबच्या गुरदासपूरमधून सीमेपलीकडे असलेल्या कर्तारपूर साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गिका खुली करण्याबाबत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली, तेव्हा भारताने वरील मागणी केली.
  • सुरुवातीला किमान पाच हजार भारतीय यात्रेकरूंना दररोज शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आपल्या बाजूने करण्यात आल्याचे गृहविभागाचे सहसचिव एससीएल दास यांनी सांगितले.

रेल्वे अन् महापालिकेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल :

  • महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल काल सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, 30हून अधिक लोक जखमी झाले. जखमींची प्रकृतीही गंभीर आहे. या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • तर आझाद मैदान पोलिसांत कलम 304 एअंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
  • मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मंगळावर जाणारा पहिला मानव महिला असू शकेल;

  • मंगळ ग्रहावर होणारा मानवाचा पहिला पदस्पर्श कदाचित एका महिलेचा असू शकेल, असे अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेचे प्रशासक जिम ब्रायडेनस्टीन यांनी म्हटले आहे.

    NASA
    NASA
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयीच्या ‘सायन्स फ्रायडे’ या रेडिओ टॉक शोसाठी दिलेल्या एका मुलाखतीत ‘नासा’ एखाद्या महिलेला प्रथमच चंद्रावर पाठविणार आहे का, असे विचारता ब्रायडेनस्टीन यांनी ‘नक्कीच’ असे उत्तर देताना सांगितले
    की, ‘नासा’च्या आगामी अंतराळ मोहिमांमध्ये महिला आघाडीवर असतील. त्यामुळे यानंतर चंद्रावर पाठविला जाणारा पहिला माणूस महिला असू शकते.
  • तसेच अमेरिकेत सध्या राष्ट्रीय महिला मास सुरू आहे. त्याचे औचित्य साधून मार्चच्या अखेरीस अ‍ॅने मॅक्लीन व ख्रिस्तिना कोच या दोन महिला अंतराळवीरांना ‘स्पेस वॉक’ करण्यासाठी अंतराळात पाठविले जाईल. फक्त महिलांनी अंतराळात मारलेला तो पहिला फेरफटका असेल.

कन्नड, उर्दू भाषेतही होणार मतदारयाद्यांची छपाई :

  • लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोगाने मराठी व हिंदी भाषेत अंतिम मतदार यादी मतदारांसाठी जाहीर केली असली तरी, दक्षिण तसेच महाराष्टला लागून असलेल्या कर्नाटक राज्यात कन्नड भाषेत मतदारांची यादी जाहीर करण्याबरोबरच मुस्लीम मतदारांसाठी विशेषत: मालेगाव व भिवंडी येथील मुस्लीमबहुल मतदान केंद्रांसाठी उर्दू भाषेत यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.
  • देशातील प्रत्येक प्रांताची भाषा वेगळी असली तरी, त्यात बहुतांशी राज्यांमध्ये हिंदीचा प्रभाव अधिक आहे. त्याखालोखाल दक्षिणेत तामिळी, मल्याळम, कन्नडी भाषेचा प्रभाव आहे.
  • एकटा महाराष्ट्र वगळता मराठी भाषेचा वापर अन्य राज्यांमध्ये जवळपास नाहीच, अशावेळी त्या त्या राज्यातील मतदारांच्या मातृभाषेचा विचार करून निवडणूक आयोगाकडून मतदार यादी तयार केली जात असली तरी, महाराष्ट व कर्नाटक
  • राज्याच्या सीमेवरील काही गावांमध्ये अजूनही तेथील मराठी मतदार कन्नड भाषेचा वापर करतात, तर राज्यातील जवळपास 15 विधानसभा मतदारसंघ, असे आहेत की त्या ठिकाणी मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे. अशा वेळी
    त्या मतदारांना त्यांच्या भाषेच्या अडचणीमुळे मतदार यादीत नाव शोधणे कठीण तर होतेच, परंतु त्याचा परिणाम निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवरही होत असतो.
  • या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नांदेड, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीच्या निवडणूक अधिकाºयांना खास आदेशाद्वारे १५ विधानसभा मतदारसंघात उर्दू व पाच मतदारसंघात कन्नडी भाषेत मतदार यादीची छपाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दिनविशेष:

  • 15 मार्च : जागतिक ग्राहक हक्क दिन
  • 15 मार्च 1493 मध्ये भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
  • मुघल सम्राट अकबर याने 15 मार्च 1564 मध्ये हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.
  • 15 मार्च 1680 मध्ये शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
  • मेन हे अमेरिकेचे 15 मार्च 1820 मध्ये 23वे राज्य बनले.
  • 15 मार्च 1827 मध्ये टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मार्च 2019)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
2 Comments
  1. Rajendra Ahire says

    Very good, thanks

  2. Govind M Kurkute says

    I want to join us.

Leave A Reply

Your email address will not be published.