15 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
15 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 जून 2019)
जनगणनेच्या माहितीचे पहिल्यांदाच ऑनलाइन संकलन :
- देशात 2021 मध्ये जनगणना करण्यात येणार असून पहिल्यांदाच जनगणनेच्या माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.
- जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 या कालावधीत देशातील काही ठराविक जिल्ह्यांतील गावांमध्ये आणि शहरांमध्ये याची प्री टेस्टदेखील करण्यात येईल.
- तर आगामी जनगणनेमध्ये काही मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांच्या पार्श्वभूमीवर 3 जून ते 11 जून या कालावधीत पुण्यातील यशदा येथे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
- तसेच पहिल्यांदाच जनगणनेच्या माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने होणार आणि त्याचीच चाचणी यादरम्यान होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
कवी सुशीलकुमार शिंदे, सलीम मुल्ला यांचा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरव :
- साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
- मराठी भाषेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला यंदाचा युवा साहित्य पुरस्कार मिळाला असून सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.
- साहित्य अकादमीने 22 भाषांमधील युवा साहित्यिकांच्या 11 काव्यसंग्रह, सहा कथा, पाच कांदबऱ्या आणि एका समीक्षेची पुरस्कारासाठी निवड केली. या वर्षी युवा साहित्यात कवितांचा अधिक प्रभावी ठरल्या. युवा साहित्य अकादमीचा तर पुरस्कार पन्नास हजार रुपयांचा आहे. 35 वर्षांच्या आतील साहित्यिकांसाठी युवा पुरस्कार दिला जातो.
- तसेच फक्त मैथिली भाषेतील पुरस्कार जाहीर झालेले नाहीत.
बिहार सरकारची वृद्धांसाठी नवी पेन्शन योजना :
- बिहार सरकारने वृद्धांसाठी एका नव्या सार्वत्रिक पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजना’ (एमव्हीपीवाय) असे या योजनेचे नाव आहे.
- तर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शिवाय माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या वयोवृद्ध पत्रकारांना देखील पेन्शन दिले जाणार आहे.
- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या योजनेची माहिती दिली. 1 एप्रिल 2019 पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच शासकीय सेवानिवृत्त असलेल्या वयोवृद्धांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- तर या योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वय व पात्र असलेल्या सर्वांना मासिक 400 रूपये पेन्शन तर 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्याना 500 रूपये प्रति महिना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- सध्या वृद्धांसाठी असलेली पेन्शन योजना केवळ मागास प्रवर्गालाच लागू आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पत्रकारांना सहा हजार रूपये पेन्शन जाहीर केले आहे. जे पत्रकार सध्या माध्यमांमध्ये कार्यरत आहेत आणि ज्यांना कोणतेही पेन्शन मिळत नाही ते ‘बिहार पत्रकार सन्मान योजने’च्या लाभास पात्र असणार आहेत.
- तसेच या योजनेची देखील या वर्षाच्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
फोर्ब्सच्या यादीत 57 भारतीय कंपन्यांना स्थान :
- जगभरातील 2000 मोठ्या कंपन्यांच्या यांदीत भारतातील 57 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत स्थान देण्यात आले असून पहिल्या 200 कंपन्यांमध्ये ही एकमेव भारतीय कंपनी आहे. फोर्ब्सच्या नुकतीच एक यादी जाहीर केली आहे.
- फोर्ब्सच्या जागतिक 2000 कंपन्यांच्या यावर्षीच्या यादीत चीनच्या इंडस्ट्रियल अँड कॉमर्शियल बँक ऑफ चायनाला (आयसीबीसी) पहिले स्थान देण्यात आले आहे. आयसीबीसी सलग सातव्यांदा फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
- तर पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत रियालंस इंडस्ट्रीज या एकमेव कंपनीला या यादीत स्थान देण्यात आले आहे. पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज 11 व्या स्थानावर आहे. तर रॉयल डच शेलला पहिले स्थान देण्यात आले आहे.
- पहिल्या 2000 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक 209 वे, ओएनजीसी 220 वे, इंडियन ऑईल 288 वे आणि एचडीएफसी लिमिटेड 332 वे स्थान देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त या यादीत टीसीएस, आयसीआयसीआई बँक, एल अँड टी,
भारतीय स्टेट बँक आणि एनटीपीसीला पहिल्या 500 कंपन्यांच्या यादीत स्थान दिले आहे. तर 2000 कंपन्यांच्या यादीत टाटा स्टील, कोल इंडिया, कोटक महिंद्रा बँक, भारत पेट्रोलियम, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, पावर ग्रिड, हिंदाल्को, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व, गेल, पंजाब नेशनल बँक, ग्रासिम, बँक ऑफ बडोदा, पावर फायनॅन्स आणि कॅनरा बँकेचा समावेश आहे. - तर या यादीत 61 देशांच्या कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे.
IIT-JEE प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर :
- Indian Institute of Technology (आयआयटी) प्रवेशसाठीची IIT-JEE Advanced प्रवेश परीक्षेचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्राच्या कार्तिकेय गुप्ताने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
- तर je&erdved.aced.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन निकाल पाहाता येणार आहे. 27 मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.
- जेईई मुख्य सामायिक प्रवेश परीक्षेत कार्तिकेय गुप्ता याने 100 पर्सेटाइल गुण घेत देशातील पहिल्या 20 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते.
- IIT-JEE Advanced परीक्षेत 100 एनटीए गुण घेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दिनविशेष :
- 15 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय हवा दिन‘ आहे.
- वैद्यकीय इतिहासात प्रथमच डॉ. जॉं बाप्तिस्ते डेनिस यांनी 15 जून 1667 मध्ये यशस्वी रक्तसंक्रमण केले.
- 15 जून 1869 मध्ये महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
- लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे ‘समाजसेवक अण्णा हजारे‘ यांचा जन्म 15 जून 1937 रोजी झाला.
- बा.पां. आपटे हे 15 जून 1970 रोजी पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा