15 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
15 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 फेब्रुवरी 2020)
विकसनशील देशांच्या यादीतून ट्रम्प यांनी काढलं भारताला बाहेर :
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र या दौऱ्याआधी यूएस प्रशासनाने भारताला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
- अमेरिका-भारत यांच्यातील व्यापाराच्या दृष्टीकोनातून ही बाब महत्वपूर्ण मानली जात आहे.
- तर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी विकसनशील देशांच्या यादीतून भारताला बाहेर काढलं आहे.
- त्यामुळे भारताच्या निर्यात करावर अमेरिका सूट देणार नाही. या यादीत असणाऱ्यांना देशांना निर्यात करात सूट दिली जाते, या देशामुळे अमेरिकेच्या उद्योगांवर कोणता परिणाम होत नाही असं मानलं जातं. या यादीत ब्राझील, इंडोनेशिया, हॉंगकॉंग, दक्षिण अफ्रिका अशा देशांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल घेणार शपथ :
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाची धूळ चारुन 70 पैकी 62 जागा आपने जिंकल्या. यानंतर अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं.
- तर त्यांचा शपथविधी सोहळा उद्या दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे.
- तसेच अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर इतर सहा मंत्र्यांचाही शपथविधी त्यांच्यासोबत होणार आहे.
- तर या सहा मंत्र्यांमध्ये मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे.
आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धात मुकुंद आहेरला सुवर्ण :
- ताश्कंद येथे आयोजित आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत येथील छत्रे विद्यालयाच्या मुकुंद आहेरने सुवर्णपदक पटकावून नाशिक जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचे नाव वेटलिफ्टिंगमध्येही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले आहे.
- आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत भारतीय संघातून सहभागी झालेल्या छत्रे विद्यालयाच्या मुकुंदने 189 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले.
- तर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा मुकुंद हा नाशिक जिल्ह्यातील दुसरा वेटलिफ्टिंग खेळाडू ठरला आहे. याआधी मनमाडच्याच निकिता काळेने आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते.
- मागील महिन्यात गुवाहाटी येथे ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्यानंतर मुकुंदची भारतीय संघात निवड झाली होती.
यवतमाळच्या विद्यार्थ्याची हार्वर्ड विद्यापीठात निवड :
- येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याची जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाने संशोधनासाठी निवड केली आहे. चिन्मय सतीश हरिदास असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
- भारत सरकार आणि अमेरिकन सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना ‘खोराना स्कॉलर’ ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यात केवळ 50 जणांची निवड करण्यात येते.
- तर यंदा निवड झालेल्या देशातील 50 विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळच्या चिन्मयचीही निवड झाली आहे.
- चिन्मय 18 मे ते 31 जुलैपर्यंत अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात राहून तेथील संशोधकांसोबत संशोधन करणार आहेत. ‘न्यूरो सायन्स’ (मेंदूविकार शास्त्र) असा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
दिनविशेष :
- 15 फेब्रुवरी 399 मध्ये सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
- कॅनडाने नवीन ध्वज 15 फेब्रुवरी 1965 मध्ये अंगिकारला.
- 15 फेब्रुवरी 1710 मध्ये फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचा जन्म झाला.
- कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय मनोहर दिवाण यांचे 15 फेब्रुवरी 1960 मध्ये निधन झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
very nice, thank you.