15 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

15 December 2019 Current Affairs
15 December 2019 Current Affairs

15 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2019)

सीमेवर जवानांच्या हाती आले घातक शस्त्र :

  • चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना अखेर 15 वर्षानंतर नवीन असॉल्ट रायफल्स मिळाल्या आहेत.अमेरिकन बनावटीच्या या नवीन रायफल्स दीर्घ पल्ल्याच्या असून सीमा रेषेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठीच खास या असॉल्ट रायफल्सची निर्मिती करण्यात आली आहे.
  • तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकन कंपनी सिग साउरसोबत भारत सरकारने 638 कोटी रुपयांचा रायफल्स खरेदीचा करार केला.
  • तसेच त्यातील 72,400 पैकी पहिल्या 10 हजार रायफल्स लष्कराला मिळाल्या आहेत.
  • 500 मीटरपर्यंत रेंज असलेल्या या सर्व असॉल्ट रायफल्स 2020 पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. करारानुसार, भारताला एकूण 72,400 SiG-716 असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.
  • तर त्यापैकी सैन्याला 66,400 इंडियन एअर फोर्सला चार हजार तर, नौदलाला दोन हजार रायफल्स मिळणार आहेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने या रायफल्स अत्याधुनिक असून त्यांची देखभाल करणेही सोपे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 डिसेंबर 2019)

‘सॅफ’ची पदकलूट :

  • काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या दक्षिण आशियाई (सॅफ) क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणेच भारताने विक्रमी पदकभरारी घेतली. 174 सुवर्ण, 93 रौप्य आणि 45 कांस्यपदकांसह एकूण 312 पदकांची कमाई करीत सलग 13व्या स्पर्धेत अग्रस्थानासह वर्चस्व गाजवले.
  • तर यंदाच्या ‘सॅफ’ स्पर्धेत नेपाळ, बांगलादेश, भूतान, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका या प्रतिस्पर्धी देशांचे भारतापुढे आव्हान होते.
  • म्हणजेच ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ हेच भारताचे ‘सॅफ’ स्पर्धेतील महत्त्वाचे स्थान असल्यामुळे हमखास पदकांच्या लयलुटीचा दक्षिण आशियाई क्रीडात्मक कार्यक्रम पुन्हा उत्साहात पार पडला; किंबहुना ‘सॅफ’ स्पर्धेपेक्षा भारतातील राज्य अजिंक्यपद स्पर्धा कित्येक पटीने स्पर्धात्मक असतात, असे म्हणता येईल.
  • जागतिक लोकसंख्येचा 21 टक्के भाग हा दक्षिण आशियाई म्हणजेच ‘सार्क’ देशांचा आहे. म्हणजेच एकपंचमांश लोकसंख्या असूनही, दक्षिण आशियाई देशांना क्रीडात्मक उंची हवी तशी गाठता आली नाही.
  • तसेच आतापर्यंत आठ ‘सॅफ’ देशांनी (अफगाणिस्तानसह) एकूण 42 ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यापैकी 28 भारताची आहेत, तर अन्य 14 पदके पाकिस्तान (10 पदके), बांगलादेश (2 पदके) आणि श्रीलंका (2 पदके) यांनी जिंकली आहेत.
  • ‘सॅफ’ स्पर्धेत भारताने अ‍ॅथलेटिक्स (48 पदके), जलतरण (52 पदके), तलवारबाजी (11 पदके) आणि तायक्वांदो (26 पदके) या क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची लयलूट केली

दिनविशेष:

  • 15 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन‘ आहे.
  • नागपूरकर भोसलेंनी सन 1803 मध्ये ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला होता.
  • स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 मध्ये झाला.
  • सन 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला.
  • चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना सन 1991 मध्ये ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.