15 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

15 August 2018 Current Affairs In Marathi

15 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2018)

शहीद जवान औरंगजेबला मरणोत्तर शौर्य चक्र :

  • शहीद जवान औरंगजेबला मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे.
  • 14 जूनला 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेब याची जवानांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.
  • तसेच मेजर आदित्य कुमार यांनाही शौर्य चक्र देण्यात येणार आहे.

पोलीस कर्मचारी आणि तुरुंगाधिकाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर :

  • स्वातंत्र्यदिनानिमित्त 942 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत.
  • यांपैकी 2 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक (पीपीएमजी), 177 कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्यपदके, 88 कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर 675 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत.
  • तर महाराष्ट्रातील 8 कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्यपदक, 3 कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर 40 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत.
  • पदक विजेत्यांची यादी www.mha.nic.in आणि pib.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
    तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील 36 तुरुंगाधिकाऱ्यांना सुधारक सेवा पदके प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
  • यात असामान्य सेवेसाठी राष्ट्रपती सुधारक सेवा पदक आणि उल्लेखनीय सेवेसाठी 31 सुधारक सेवा पदकांचा समावेश आहे.
  • तर महाराष्ट्रातील चौघांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारक सेवा पदके जाहीर झाली आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2018)

वीरपत्नींना आजीवन मोफत एसटी प्रवास :

  • एसटी महामंडळाच्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत’ आतापर्यंत राज्यातील 639BUSशहिदांच्या पत्नींना आजीवन मोफत एसटी पास देण्यात आले आहेत.
  • तसेच कारगील युद्धात शहीद झालेले सुधारक भट यांचा मुलगा इंद्रजीत याला महामंडळात नोकरी देण्यात आली आहे.
  • तर 1 मे 2018 पासून ‘शहीद सन्मान योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सैन्य दलासह अन्य सुरक्षा दलातील शहीद जवानांच्या वीरपत्नींना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी आजीवन मोफत प्रवास पास देण्यात येत आहे.

दिनविशेष :

  • 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.Indian-Flag
  • मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना 15 ऑगस्ट 1862 मध्ये झाली.
  • पं. नेहरू 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
  • 15 ऑगस्ट 1948 मध्ये दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
  • 15 ऑगस्ट 1960 मध्ये कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.