15 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारताला हारपून ब्लॉक दोन एअर मिसाइल आणि टॉरपीडोसची विक्री
भारताला हारपून ब्लॉक दोन एअर मिसाइल आणि टॉरपीडोसची विक्री

15 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 एप्रिल 2020)

अमेरिका भारताला देणार घातक हारपून मिसाइल आणि टॉरपीडोस :

 • ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन काँग्रेसला भारताला हारपून ब्लॉक दोन एअर मिसाइल आणि टॉरपीडोसची विक्री करणार असल्याच्या निर्णयाची माहिती दिली.
 • तर हा एकूण व्यवहार 15 कोटी 50 लाख अमेरिकन डॉलर्सचा आहे.
 • तसेच भारत अमेरिकेकडून दहा एजीएम-84एल हारपून ब्लॉक दोन एअर मिसाइल विकत घेणार आहे. हा व्यवहार अंदाजे 9 कोटी 20 लाख अमेरिकन डॉलर्सचा आहे.
 • टॉरपीडोसच्या व्यवहारामध्ये भारताला अंदाजे 6 कोटी 30 लाख डॉलर्स मोजावे लागतील.
 • डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने दोन वेगवेगळया अधिसूचना काढून काँग्रेसला ही माहिती दिली. हारपून मिसाइल सिस्टिम P-8I विमानामध्ये बसवली जाते.
 • भारताने आपल्या नौदलासाठी ही विमाने अमेरिकेकडून आधीच विकत घेतली आहेत. सध्या टेहळणीसाठी या विमानांचा वापर सुरु आहे. P-8I विमानामधून पाणबुडीवर अत्यंत अचूकतेने हल्ला केला जाऊ शकतो.
 • बोईंग कंपनी हारपून मिसाइलची निर्मिती करणार आहे तर टॉरपीडोसचा रेथीऑन कंपनीकडून पुरवठा केला जाणार आहे. मागच्या आठवडयात भारताने अमेरिकेला HCQ या गोळयांचा पुरवठा केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 एप्रिल 2020)

देशभर टाळेबंदीत 3 मेपर्यंत वाढ :

 • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या टाळेबंदीचा कालावधी 3 मेपर्यंत म्हणजे आणखी 19 दिवसांसाठी वाढवण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणाद्वारे केली.
 • तर सहा दिवसांनंतर, 20 एप्रिल रोजी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतर काही क्षेत्रांमधील आर्थिक व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.
 • तसेच यासंदर्भात केंद्र सरकारकडून बुधवारी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठकही होणार आहे.
 • तीन आठवडय़ांच्या टाळेबंदीची मुदत मंगळवारी संपल्यामुळे वाढीव टाळेबंदीचा निर्णय मोदींनी जाहीर केला. गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत बहुतांश मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी किमान दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची मागणी केली होती. तसेच आर्थिक व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतही चर्चा केली गेली होती. त्यानुसार पुढील आठवडय़ापासून काही प्रमाणात हे व्यवहार पुनस्र्थापित केले जाऊ शकतात, याचे सूतोवाच मोदींनी भाषणात केले.

ऑनलाईन आगाऊ तिकीट आरक्षण करता येणार नाही :

 • देशात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित करून लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली.
 • तर यानंतर रेल्वेनंदेखील 3 मे पर्यंत प्रवासी रेल्वेसेवा सुरू न करण्याची घोषणा केली. याव्यतिरिक्त लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन आगाऊ तिकीट आरक्षण करता येणार नाही असंही रेल्वेनं स्पष्ट केलं.
 • यापूर्वी लॉकडाउनच्या कालावधीत ऑनलाइन तिकिट आरक्षणाची परवानगी देण्यात आली होती. परंतु आता लॉकडाउनच्या काळात रेल्वे तिकिटांचं ऑनलाइन आरक्षण करण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तसेच सर्व प्रवासी रेल्वेसेवा 3 मेच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये मेल, एक्स्प्रेस, प्रिमिअम ट्रेन, कोलकाता मेट्रो, रेल्वेची सबर्बन सेवा आणि कोकण रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे.

मोदी सरकारनं विमानसेवेबद्दल घेतला मोठा निर्णय :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाउन अजून 19 दिवसांनी वाढवत असल्याची घोषणा केली. यामुळे 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे.
 • तसेच लॉकडाउन वाढला असल्याने केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयलाने मोठा निर्णय घेतला असून प्रवासी विमान सेवादेखील 3 मे पर्यंत बंद ठेवण्याचं ठरवलं आहे.
 • केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर्व आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सेवा 3 मे मध्यरात्रीपर्यंत बंद असणार आहे.
 • याआधी करोनाचा फैलाव वाढत असल्याने परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यासापासून रोखत विमान सेवा बंद करण्यात आली होती. 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत ही सेवा बंद ठेवण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पण परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन वाढवला असून विमानसेवाही बंद ठेवण्यात येणार आहे.

दिनविशेष:

 • 15 एप्रिल हा दिवस ‘जागतिक कला दिन‘ तसेच ‘जागतिक सांस्कृतिक दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
 • शीख धर्माचे संस्थापक, पहिले गुरु ‘गुरु नानक देव‘ यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी झाला होता.
 • सन 1892 मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
 • आर.एम.एस. टायटॅनिक हे जहाज 1912 यासाली उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले होते.
 • 15 एप्रिल 2013 हा दिवस संत साहित्याचे अभ्यासक ‘वि.रा. करंदीकर’ यांचा स्मृतीदिन आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.